APMC Election Result : परळीत पहिल्यांदाच असं घडलं… पंकजा मुंडे यांना जबर धक्का; भाकरी फिरली?

बीड जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रचंड मोठं यश मिळवलं आहे. या निवडणुकीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा पराभव आहे.

APMC Election Result : परळीत पहिल्यांदाच असं घडलं... पंकजा मुंडे यांना जबर धक्का; भाकरी फिरली?
dhananjay munde Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 4:19 PM

बीड : बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, गेवराई, बीड, वडवणी, आष्टी बाजार समितीचे निकाल आले आहेत. या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. तर राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. अंबाजोगाई आणि परळीत पंकजा मुंडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यामुळे बहीण हरली आणि भाऊ जिंकला अशी चर्चा या मतदारसंघात सुरू झाली आहे. तर इतर बीड जिल्ह्यातील इतर बाजार समित्यातही राष्ट्रवादीनेच मुसंडी मारली आहे. बीड जिल्ह्यात प्रीतम मुंडे या भाजपच्या खासदार आहेत. तर पंकजा मुंडे यांचं मोठं वर्चस्व आहे. तरीही राष्ट्रवादीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याची जोरदार चर्चा आहे.

अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलने निवडणूक लढवली. या पॅनलला 18 पैकी 15 जागा मिळाल्या आहेत. तर परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या आहेत. परळीत पंकजा मुंडे यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

गेवराई, वडवणीत पैकीच्या पैकी

गेवराईतही भाजपला मोठा धक्का बसला आहे. अमरसिंह पंडित यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलने गेवराईत 18 पैकी 18 जागा जिंकल्या आहेत. काही ठिकाणी तर विरोधकांचे डिपॉझिटही जप्त केले आहे. वडवणी बाजार समितीत आमदार प्रकाश सोळंके आणि माजी आमदार केशवराव आंधळे यांनी एकत्रित येऊन भाजपला टक्कर देत भाजपचा सुपडा साफ केला आहे. वडवणीतही राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीने मिळून 18 पैकी 18 जागा विजयी झाल्या आहेत.

काकांना पराभूत केलं

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठा चमत्कार घडवला आहे. त्यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना धूळ चारली आहे. त्यांनी 18 पैकी 15 जागा निवडून आणल्या आहेत. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांची 35 वर्षांपासूनची सत्ता पालटण्यात संदीप क्षीरसागर यांना यश आलं आहे.

आष्टीत बिनविरोध

आष्टी बाजार समितीची निवडणूक याआधीच बिनविरोध झाली आहे. या समितीत सुरेश धस गटाचे 11, राष्ट्रवादीचे 3, भीमराव धोंडे गटाचे 3 तर शिंदे सेनेचा 1 उमेदवार विजयी झाला आहे. केज बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र भाजपला 14 जागा मिळाल्या असून, जिल्ह्यातील केवळ एका विजयावर समाधान मानावे लागले आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.