भरोसा सेलने संसार सावरले, सहा महिन्यात बुलडाण्यात 72 कुटुंबांतील कलह मिटले

महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक अन्याय अत्याचाराच्या संदर्भात महिलांना न्याय देण्यासाठी भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे

भरोसा सेलने संसार सावरले, सहा महिन्यात बुलडाण्यात 72 कुटुंबांतील कलह मिटले
करोडपती प्रॉपर्टी डिलरच्या पत्नीचे 13 वर्षांनी लहान रिक्षाचालकासोबत पलायन
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 12:41 PM

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात कौटुंबिक कलह कमी करण्यात पोलिसांच्या भरोसा सेलला यश आलं आहे. बुलडाणा शहर पोलीस ठाणे परिसरात असलेल्या भरोसा सेलमध्ये 2020 मध्ये 446 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी 132 कुटुंबांचे समुपदेशन करुन महिलांचे संसार पुन्हा सुरळीत सुरु झाले आहेत, तर यावर्षी 72 कुटुंबांचा समझोता करुन कौटुंबिक वादाचा निपटारा केला आहे. (Buldana Bharosa Cell pacifies 72 Couples)

बुलडाणा जिल्ह्यात कौटुंबिक कलहाचे प्रमाण नगण्य

देशात आलेल्या कोरोना महामारीने सर्वांनाच चांगली शिकवण दिली आहे. ज्याचे सर्वांच्याच मनावर चांगले-वाईट परिणाम झाले आहेत. सकारात्मक दृष्टीने विचार केल्यास या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच कुटुंबातील व्यक्तींनी एकत्र राहून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला आहे. तर दुसरीकडे पती-पत्नीसह सर्वच कुटुंबातील व्यक्ती एकत्रित असल्याने कौटुंबिक कलह देखील वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लॉकडाऊन काळात बुलडाणा जिल्ह्यात कौटुंबिक कलहाचे प्रमाण नगण्य असल्याचे भरोसा सेलच्या माध्यमातून समोर आले आहे.

कौटुंबिक वादाचा निपटारा

महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक अन्याय अत्याचाराच्या संदर्भात महिलांना न्याय देण्यासाठी भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे, त्या माध्यमातून बुलडाणा शहर पोलीस ठाणे परिसरात असलेल्या भरोसा सेलमध्ये 2020 मध्ये 446 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 132 कुटुंबांचे समुपदेशन करुन त्या महिलांचे संसार पुन्हा सुरळीत सुरू केले आहेत. तर 2021 मध्ये 207 तक्रारींपैकी 72 कुटुंबांचा समझोता करुन कौटुंबिक वादाचा निपटारा केला आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन काळात सर्व कुटुंब एकत्रित असल्याने त्याचा परिणाम हा कौटुंबिक वादात झाल्याने या तक्रारींचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे. मात्र त्या तुलनेत बुलडाण्यात लॉकडाऊनमध्ये कुठल्याही प्रकारे परिणाम झाला नसून इतर काळामध्ये ज्या पद्धतीने कुटुंबात विविध समस्यांना घेऊन वाद निर्माण होत होते, तसेच वाद या काळात देखील पाहायला मिळाले आहेत.

भरोसा सेलकडे संपर्क साधण्याचं आवाहन

वैवाहिक जीवनात वावरत असताना महिलांना कुठल्याही प्रकारचा छळ किंवा शोषण होत असल्यास त्यांनी भरोसा सेलकडे संपर्क करावा, असे आवाहन भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका निकाळजे यांनी केले आहे. कुटुंबात कलह निर्माण झाल्याने त्यांचे समुपदेशन करण्यासाठी अलका सरदार, कल्पना हिवाळे, सुर्यकिरण साबळे हे महत्वाची भूमिका बजावत असून अनेक संसार यांनी पुन्हा सुरळीत फुलवण्याचे काम केले आहे.

संबंधित बातम्या :

कौटुंबिक कलहाला कंटाळून औरंगाबादेत विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

(Buldana Bharosa Cell pacifies 72 Couples)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.