Khamgaon tiger : खामगावमध्ये सीसीटीव्हीत वाघसदृष्य प्राणी कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

खमगावमध्ये वाघाचे दर्शन झाल्याच्या वृत्ताने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे पहायला मिळाले. शहरातील केशव नगर परिसरात असलेल्या एका घरासमोरील सीसीटीव्हीमध्ये वाघसदृष्य प्राणी कैद झाला. सीसीटीव्ह फुटेजमध्ये दिसणारा हा प्राणी अस्पष्ट दिसत असल्याने नेमका हा वाघच आहे की, अन्य प्राणी याबाबत अद्याप खात्री झालेली नाही.

Khamgaon tiger : खामगावमध्ये सीसीटीव्हीत वाघसदृष्य प्राणी कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 8:07 AM

बुलडाणा: खमगावमध्ये वाघाचे दर्शन झाल्याच्या वृत्ताने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे पहायला मिळाले. शहरातील केशव नगर परिसरात असलेल्या एका घरासमोरील सीसीटीव्हीमध्ये वाघसदृष्य प्राणी कैद झाला. सीसीटीव्ह फुटेजमध्ये दिसणारा हा प्राणी अस्पष्ट दिसत असल्याने नेमका हा वाघच आहे की, अन्य प्राणी याबाबत अद्याप खात्री झालेली नाही. मात्र तो प्राणी वाघच असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या प्रकारानंतर शहरात दिवसभर वाघाचीच चर्चा रंगली.

वाघाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, खामगाव शहरातील केशव नगर परिसरात एका गल्लीत वाघसदृष्य प्राणी घुसताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पहाटे चारच्या सुमारास हा प्राणी गल्लीत घुसताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आला. या फुटेजमुळे शहरात खळबळ उडाली असून,  संबंधित प्राणी हा वाघच असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. वाघ पाहण्यासाठी नागरिकांनी परिसरात गर्दी केली. मात्र कुठेही वाघ आढळून आला नाही.

वनविभागाकडून वाघाचा शोध

दरम्यान या घटनेबाबत  अमरावती वनविभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शनिवारी दिवसभर वाघाचा शोध घेण्यात आला. मात्र कुठोही वाघ आढळून आला नाही. अखेर रात्र झाल्याने वाघाची शोधमोहीम थांबवण्यात आली, आज पुन्हा एकदा सकाळपासून वाघाच्या शोधमोहिमेला सुरुवात झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा प्राणी वाघच आहे का? याबाबत अद्याप खात्री पटलेली नाही. मात्र तरी देखील खबरदारीचा उपय म्हणून नागरिकांनी घराबाहेर  पडणे टाळावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

घरगुती सिलिंडरचा रिक्षासाठी वापर; मुर्तिजापूरमधून तीन जणांना अटक

Omicron update : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासन सतर्क; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा

भरधाव वेगात गाडी, अचानक समोर बिबट्या आला अन् चंद्रपुरात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....