VIDEO: कुडाळ नगरपंचायतीच्या आवारात धुमशान, शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा; दंगल नियंत्रण पथक तैनात

कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. नगरपंचायतीच्या आवारात वाहने नेण्यास मनाई असतानाही शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी गाडी आत घुसवल्याने त्याला भाजप कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमकी उडाल्या.

VIDEO: कुडाळ नगरपंचायतीच्या आवारात धुमशान, शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा; दंगल नियंत्रण पथक तैनात
कुडाळ नगरपंचायतीच्या आवारात धुमशान, शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा; दंगल नियंत्रण पथक तैनात
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 1:53 PM

कुडाळ: कुडाळ नगर पंचायतीच्या (kudal nagar panchayat) निवडणुकीपूर्वीच शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये (Shiv sena vs Congress) जोरदार राडा झाला. नगरपंचायतीच्या आवारात वाहने नेण्यास मनाई असतानाही शिवसेना आमदार वैभव नाईक (vaibhav naik) यांनी गाडी आत घुसवल्याने त्याला भाजप कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमकी उडाल्या. प्रकरण धक्काबुक्कीवर आलं. शेकडो कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणावाचे वातावण निर्माण झालं. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटात पुन्हा राडा होऊ नये म्हणून या परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं. दरम्यान, कुडाळच्या नगराध्यपदी काँग्रेसच्या आफ्रिन करोल या विजयी झाल्या आहेत. त्यांना 9 मते मिळाली तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकरांना 8 मते मिळाली आहेत. त्यामुळे नारायण राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक असल्याने नगरपंचायतीबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पंचायतीच्या परिसरात वाहने आणण्यास मनाई करण्यात आली होती. भाजपचे कार्यकर्तेही गाडीने पंचायतीच्या आवारात येत असताना त्यांना लांबच रोखण्यात आलं होतं. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना त्यांची वाहने निषिद्ध क्षेत्राच्या बाहेर ठेवाव्या लागल्या होत्या. मात्र, शिवसेना आमदार वैभव नाईक हे घटनास्थळी आले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवकही होते. त्यांच्या दोन गाड्या नगरपंचायतीच्या आवारात आल्याने त्याला भाजपने जोरदार आक्षेप घेतला. आमच्या गाड्या रोखल्या मग शिवसेनेच्या का रोखत नाही? असा सवाल भाजपने केला. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही गटाकडून एकमेकांना धक्काबुक्की केली. शेकडो कार्यकर्ते एकाच ठिकाणी जमल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही बाजूला कार्यकर्ते जमले

जमावाला पांगवण्यात यंत्रणा कमी पडत असल्याने पोलिसांनी तात्काळ दंगल नियंत्रण पथकाला घटनास्थळी पाचारण केलं. यावेळी डीवायएसपी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, पोलीस कुमक आल्यानंतरही या परिसरात तणावाची स्थिती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उभे होते. त्यानंतर निवडणुकीचा निकाल काँग्रेसच्या बाजूने येताच शिवसैनिक, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात एकच जल्लोष केला. त्यामुळे पोलीस पुन्हा एकदा अॅलर्ट झाले होते.

शांतात कशी राखणार?

महाविकास आघाडीला बहुमत मिळाले होते. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी पैशाचा बाजार मांडला. आमिषे दाखवली. पण नगरसेवकांनी अमिषाला जुगारले होते. मतदानाला जाऊ नये म्हणून अडवलं गेलं. पण शिवसेनेने हा प्रयत्न हाणून पाडला. दबावाचं आणि दादागिरीचं राजकारण शिवसेना कदापि होऊ देणार नाही, असं आमदार वैभव नाईक म्हणाले. शांतता नांदावी आम्हालाही वाटतं. पण राणे केंद्रीय मंत्री आहेत. ते जबाबदार नेते आहेत. त्यांनीच त्यांच्या कार्यकर्त्यांना आवरलं पाहिजे. त्यांचे कार्यकर्तेच आमचा रस्ता रोखत होते. त्यामुळे शांतता कशी राखणार? असा सवाल नाईक यांनी केला.

संबंधित बातम्या:

VIDEO: नाना पटोले नौटंकीबाज, मोदी नव्हे काँग्रेसनेच देशाची माफी मागावी, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

मै लिंक नही खोलूंगा…! नागपूर पोलिसांच्या क्रीएटीव्हीटीला तोड नाय, पुष्पाचा फोटो शेअर करत काय म्हणाले बघा

VIDEO: हमने बहोत बर्दाश्त किया, बर्बादही हम करेंगे; शिवसेना नेते संजय राऊतांची डरकाळी

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.