Parbhani | परभणी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट, वाहनचालक त्रस्त!
शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीची समस्या ही निर्माण होत आहे. शिवाय भर रस्त्यात अनेकदा या जनावरांची आपसातल्या भांडणांमुळे अनेक वाहनांचे नुकसान देखील होते. या मोकाट जनावरांना नियंत्रित करण्याचं काम असणाऱ्या परभणी महानगरपालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष करणेच सोईची समजले आहे.
परभणी : परभणी (Parbhani) शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर जनावरे सर्रासपणे वावरतांना दिसतायंत. त्यामुळे वाहनधारकांना याचा प्रचंड त्रास (Trouble) सहन करावा लागतोयं. शहरातून जाणाऱ्या जिंतूर रोड, गंगाखेड रोड, वसमत रोड, पाथरी रोड या प्रमुख रस्त्यांसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर नेहमीच या मोकाट जनावरांचा वावर असतो. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून (Roads) गाडी चालवायला अडचणींचा सामना करावा लागतो. कारण ही मोकाट जनावरे अचानकच वाहनधारकांकडे आपला मोर्चा वळवतात.
मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीची समस्या
शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीची समस्या ही निर्माण होत आहे. शिवाय भर रस्त्यात अनेकदा या जनावरांची आपसातल्या भांडणांमुळे अनेक वाहनांचे नुकसान देखील होते. या मोकाट जनावरांना नियंत्रित करण्याचं काम असणाऱ्या परभणी महानगरपालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष करणेच सोईची समजले आहे. अनेकदा ही मोकाट जनावरे शाळकरी विद्यार्थ्यांच्या मागे देखील लागतात. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोकाट जनावरांच्याविरोधातील मोहिमेचे वाजले तीन तेरा
परभणी महानगरपालिकेकडून यापूर्वी अनेक वेळा मोकाट जनावरांच्याविरोधात मोहिम राबवली गेली. इतकेच नाही तर मोकाट जनावरे ठेवण्यासाठी कोंडवाडे स्थापन करून त्यात मोकाट जनावरांना ठेवण्यात आले. मात्र आता या योजनेचे तीन तेरा वाजले असून आता शहरातील मोकाट जनावरांकडे दुर्लक्ष केले जातेयं. त्यामुळे अनेक वेळा परभणीत वाहतूक कोंडीची समस्या मोकाट जनावरांमुळे निर्माण होत आहे . महानगरपालिकेकडून मोकाट जनावरांच्या विरोधात त्वरित ठोस कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे .