Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Dec 06, 2022 | 7:29 AM

राजकीय बातम्या, महत्त्वाच्या शहरांमधील ताज्या अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज वाचा एका क्लिकवर...

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
live blogImage Credit source: tv9 marathi

आज सोमवार , 5 डिसेंबर 2022. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात आज बैठक होणार आहे. युती करण्यासाठी या दोन्ही नेत्यांची बैठक होत आहे. तब्बल पाच दशकानंतर शिवशक्ती-भीमशक्तीमध्ये मोठं राजकीय समीकरण होण्याची शक्यता असल्याने या बैठकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. यासह पुणे, नाशिक, नागपूर आणि अन्य शहरात आज काय घडतंय? यासह मनोरंजन आणि क्रिडाविश्वातील घडामोडींचे अपडेट तुम्हाला लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळतील एका क्लिकवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Dec 2022 04:24 PM (IST)

    नवी दिल्ली- मुख्यमंत्र्यांचा सीमा प्रश्नाबाबत बोलण्यास नकार

    महाराष्ट्र सदनामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रपती भवनाकडे रवाना

    थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जी ट्वेंटी शिखर परिषदे संदर्भात होणार बैठक

  • 05 Dec 2022 01:05 PM (IST)

    महत्त्वाची अपडेट! ग्रॅन्ड हयातमध्ये ठाकरे-आंबेडकर बैठक

    मुंबई : वंचित आणि ठाकरे गट एकत्र येणार का, याकडे राज्याचं लक्ष, ठाकरे आणि आंबेडकर यांची आज ग्रॅन्ड हयातमध्ये बैठक होणार असल्याची माहिती, बैठकीकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष

  • 05 Dec 2022 01:03 PM (IST)

    सुरगाणा तालुक्याचे ग्रामस्थ पोहोचले गुजरातच्या तहसील कार्यालयात

    नाशिक : महाराष्ट्राच्या सुरगाणा तालुक्याचे ग्रामस्थ पोहोचले गुजरातच्या तहसील कार्यालयात, सुरगाणा तालुक्यातील गावांना गुजरात मध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी

  • 05 Dec 2022 12:51 PM (IST)

    नाशिकमधील पाथर्डी गावातील ऊसाच्या शेतात आढळले तीन बछडे

    वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या बछड्यांना याच ठिकाणी ठेवले सुरक्षित

    रात्रीच्या सुमारास या बछड्यांना आपल्या जबड्यात धरून घेऊन जाताना बिबट्याची मादी कॅमेऱ्यात कैद

    पाथर्डी गावातील मळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी

    याच परिसरात 20 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास नर बिबट्या झाला होता जेरबंद

  • 05 Dec 2022 12:21 PM (IST)

    ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ईव्हीएम मशीनची कमतरता

    कोल्हापूर जिल्ह्यासाठी सध्या 3001 ईव्हीएम मशीन उपलब्ध

    आणखी 739 ईव्हीएम मशीन लागणार

    वाढीव ईव्हीएम मशीनसाठी जिल्हा निवडणूक विभागाने केली सोलापूरकडे मागणी

    जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतीची 18 डिसेंबरला होतेय निवडणूक

  • 05 Dec 2022 12:15 PM (IST)

    लॉकअप मधून चार ते पाच आरोपी पळाले

    नंदुरबार : नवापूर पोलिस स्टेशनच्या लॉकअप मधून चार ते पाच आरोपी खिडकी तोडून पळाल्याची माहिती, सकाळी आठच्या सुमारास घडली घटना

  • 05 Dec 2022 11:22 AM (IST)

    एकनाथ शिंदे यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट

    नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट, भेटी दरम्यान दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा

  • 05 Dec 2022 10:45 AM (IST)

    साखरपुड्याच्या जेवणातून 100हून अधिक जणांना विषबाधा

    अमरावती : साखरपुड्याच्या जेवणातून 100हून अधिक जणांना विषबाधा, अचानक अनेकांना सुरु झाला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास

  • 05 Dec 2022 10:15 AM (IST)

    मुंबई एअरपोर्टवर 4712 ग्रॅम्स सोनं जप्त

    मुंबई एअरपोर्टवर 4712 ग्रॅम्स सोनं जप्त

    सोन्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये

    याप्रकरणी तीन जणांना अटक

  • 05 Dec 2022 10:10 AM (IST)

    शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा मनसे उधळून लावणार

    सुषमा अंधारे यांची उस्मानाबाद येथील महाप्रबोधन यात्रा मनसे उधळणार

    उद्या सायंकाळी 6 वाजता सुषमा अंधारे यांची उस्मानाबाद येथे सभा

    मनसेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गपाट यांनी दिला इशारा

    राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यावरून मनसे आक्रमक, माफी मागायची मागणी

  • 05 Dec 2022 10:09 AM (IST)

    शुभेच्छा देताना “तुका म्हणे” असा शब्दप्रयोग केल्यास कडक कारवाई होणार

    देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांचा इशारा

    तरुण वर्गातून संताच्या अभंगाची तोडमोड करून शुभेच्छा पत्र तयार केलं जाते

    संताच्या नावाचा वापर करून चुकीचे विडंबन करू नये

    असं केल्यास देहू संस्थाच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाणार, संस्थानची माहिती

  • 05 Dec 2022 09:25 AM (IST)

    दुचाकी चालकाची रिक्षा चालकाला बेदम मारहाण

    औरंगाबाद : दुचाकी चालकाची रिक्षा चालकाला बेदम मारहाण, दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद

  • 05 Dec 2022 09:22 AM (IST)

    मोदी मतदान करण्यासाठी रवाना

    अहमदाबाद : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदानासाठी रवाना, थोड्याच वेळात बजावणार मतदानाचा हक्क

  • 05 Dec 2022 08:00 AM (IST)

    कोल्हापूर परिवहन विभागाच्या ताब्यात लवकरच दाखल होणार इलेक्ट्रिक बस

    खासदार धनंजय महाडिक यांनी केली 65 सीटर डबल डेकर इलेक्ट्रिक बसची पाहणी

    मुंबईहून चेन्नईकडे निघालेल्या डबल डेकर बसची कोल्हापुरात घेतली माहिती

    शहरात 75 इलेक्ट्रिक डबल डेकर बस मिळवण्यासाठी महाडिक यांचा प्रयत्न

    मुंबईत तयार झालेली बस कोल्हापूर मार्गे गेली चेन्नईला

  • 05 Dec 2022 07:21 AM (IST)

    42 वर्षीय महिलेवर कुर्ला परिसरात सामूहिक बलात्कार

    मुंबई : 42 वर्षीय महिलेवर कुर्ला परिसरात सामूहिक बलात्कार, घरात घुसून महिलेवर हल्ला करुन तिच्यावर बलात्कारादरम्यान दिले सिगारेटचे चटके, तिघांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींची शोध सुरु

  • 05 Dec 2022 07:21 AM (IST)

    पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला

    एका वर्तमानपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आयुक्त सहभागी झाले होते

    या वेळी उत्साहात असलेल्या आयुक्तांनी झिंगाट गाणे लागताच भांगडा स्टेप करत एकच माहौल निर्माण केला

  • 05 Dec 2022 06:39 AM (IST)

    एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यामधून रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात प्रदूषित हवा सोडली जात आहे

    कोपऱखैरणे, महापे, बोनकोडे, कोपरी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त प्रदूषित वायूचा नागरिकांना त्रास

    नागरिकांना मळमळ तसेच श्वास घेण्यास अडचणी येत आहेत

    त्यामुळे अशा प्रकारे वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होईल का हे पाहणे महत्वाचे असेल

  • 05 Dec 2022 06:34 AM (IST)

    गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान

    93 जागांसाठी आज होणार मतदान

    पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावणार

    दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 833 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

    8 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार

  • 05 Dec 2022 06:32 AM (IST)

    भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसचे नवे अभियान

    हात से हात जोडो अभियान देशभरात राबवलं जाणार

    राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 24 डिसेंबरला दिल्लीत पोहोचणार

    26 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात हात से हात जोडो अभियान

    आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस करणार जोरदार तयारी

Published On - Dec 05,2022 6:20 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.