AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sudhir Kalingan: कोकणचो दशावतारी हरवलो; ‘लोकराजा’, ‘नटसम्राट’ सुधीर कलिंगण यांचं निधन

कोकणची शान आणि दशावतारातील लोकराजा शिवराम ऊर्फ सुधीर कलिंगण यांचं आज निधन झालं. पहाटे 3 वाजता त्यांनी गोव्यातील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुधीर कलिंगण यांनी वयाच्या अवघ्या 49व्या वर्षी एक्झिट घेतल्याने दशावतार क्षेत्रातील कलाकार आणि रसिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Sudhir Kalingan: कोकणचो दशावतारी हरवलो; 'लोकराजा', 'नटसम्राट' सुधीर कलिंगण यांचं निधन
कोकणचो दशावतारी हरवलो; 'लोकराजा', 'नटसम्राट' सुधीर कलिंगण यांचं निधन
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 11:40 AM
Share

सिंधुदुर्ग: कोकणची शान आणि दशावतारातील लोकराजा शिवराम ऊर्फ सुधीर कलिंगण (sudhir kalingan) यांचं आज निधन झालं. पहाटे 3 वाजता त्यांनी गोव्यातील (goa) खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुधीर कलिंगण यांनी वयाच्या अवघ्या 49व्या वर्षी एक्झिट घेतल्याने दशावतार क्षेत्रातील कलाकार आणि रसिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कोकणातील दशावतारी (dashavatar) परंपरा जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं. कलिंगण म्हणजे दशावतारातील हिरा होते. त्यांच्या जाण्याने दशावतार पोरके झाले आहे, अशी प्रतिक्रिया दशावतारी कलावंत व्यक्त करत आहेत. सुधीर कलिंगण हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते सांस्कृतिक संचनालय मुंबई लोककला समितीचे सदस्य होते. तसेच दशावतार चालक-मालक संघाचे सचिव होते.

sudhir kalingan

sudhir kalingan

प्रसिद्ध दशावतारी कलाकार बाबी कलिंगण यांचे ते पूत्र होते. बाबी कलिंगण यांनी दशावतारी कला नुसतीच जिवंत ठेवली नाही तर समृद्ध केली. त्यांनी 1983 मध्ये स्वतंत्र कलेश्वर दशावतार नाट्य कंपनी काढली होती. त्यापूर्वी 1984-85मध्ये त्यांनी खानोलकर दशावतार कंपनी चालवण्यास घेतली होती. त्यात सुधीर कलिंगण आणि त्यांचा भाऊही काम करायचा. कधी कधी सुधीर स्त्री पात्रही रंगवायचे. वडिलांनी जिवंत ठेवलेली ही कला सुधीर यांनी पुढे नेली. दिवसभर एसटी विभागात चालक म्हणून काम करायचं आणि त्याचबरोबर दशावतारी नाट्य प्रयोगही करायचे अशी तारेवरची कसरत त्यांनी केली होती.

sudhir kalingan

sudhir kalingan

सुधीर यांची वनराज नाटकातील बाल वनराजाच्या भूमिकेपासून रंगभूमीवर सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी चिलियाबाळ आणि रोहिदास आदी भूमिकाही केल्या. नवोदित कलाकारांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं.

sudhir kalingan

sudhir kalingan

सुधीर यांनी ही कला केवळ कोकणापूरती मर्यादित ठेवली नाही. तर सिंधुदुर्ग, मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरं आणि गोव्यात दशावतारी प्रयोग करून रसिकांची मने जिंकली. प्रत्येक कोकणी माणसाच्या ओठी सुधीर कलिंगण यांचं नाव होतं. इतके ते कोकणी माणसात प्रसिद्ध होते. कोकणात तर ते लोकराजा आणि नटसम्राट म्हणून लोकप्रिय होते.

sudhir kalingan

sudhir kalingan

सुधीर कलिंगण यांची श्रीकृष्णाची भूमिका विशेष गाजली. जेव्हा ते रंगभूमीवर अवतरायचे तेव्हा ते श्रीकृष्ण असल्याचाच भास व्हायचा. इतकं ते या भूमिकेत समरसून जायचे. त्यांची कर्ण, राजा हरिश्चंद्र, वेडा चंदन आणि वृंदा जालंधर आदी भूमिका रसिकांनी उचलून धरल्या होत्या. ट्रिकसीन युक्त नाट्यप्रयोग करून त्यांनी रसिकांना वेडावून सोडलं होतं.

sudhir kalingan

sudhir kalingan

संबंधित बातम्या:

Shegaon Attack Photos : कायद्याचे तीन तेरा, गजानन महाराजांच्या शेगावात थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला, नेमकं काय घडलं?

ढगात आहे आपण, खालनं किती बी दगडं मारा, ‘थेरगाव क्वीन’ची मस्ती उतरेना, पिंपरी पोलिसांना व्हिडीओतून चॅलेंज

Owaisi | सलामत रहे नेता हमारा, ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी हैदराबादमध्ये दिली 101 बकऱ्यांची कुर्बानी आणि…

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.