जिल्हाधिकारीपदी रुजू होण्यासाठी बाळासह परभणीत, आंचल गोयल यांनी अखेर पत्राद्वारे पदभार स्वीकारला

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी आयएएस अधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. परभणी येथे रुजू होण्यासाठी आंचल गोयल 27 जुलै रोजी आपल्या बाळासह परभणीत आल्या होत्या.

जिल्हाधिकारीपदी रुजू होण्यासाठी बाळासह परभणीत, आंचल गोयल यांनी अखेर पत्राद्वारे पदभार स्वीकारला
Aanchal Goyal
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 1:35 PM

प्रशांत चालिंद्रवार, टीव्ही 9 मराठी, परभणी : आयएएस अधिकारी आंचल गोयल (Aanchal Goyal) यांनी अखेर परभणी जिल्हाधिकारी पदाचा पदभार पत्राद्वारे स्वीकारला. रुजू होण्याच आधीच गोयल यांची बदली अचानक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे परभणीतील नागरिकांनी आंदोलनही छेडलं होतं. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेताना परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आंचल गोयलच जिल्हाधिकारीपदी असतील, असं जाहीर केलं. त्यानंतर आंचल गोयल यांनी पदभार स्वीकारला.

गोयल यांची बदली अचानक झालेली रद्द

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी आयएएस अधिकारी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. 13 जुलै रोजी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले होते. विशेष म्हणजे परभणी येथे रुजू होण्यासाठी आंचल गोयल 27 जुलै रोजी आपल्या बाळासह परभणीत आल्या होत्या. त्यामुळे मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी गोयल पदभार घेणे अपेक्षित होते. मात्र नियुक्तीच्या दिवशीच गोयल यांना मुंबईत परत बोलवण्यात आल्याने त्या पदभार न स्वीकारता परतल्या.

या सर्व प्रकारानंतर परभणीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. समाज माध्यमांतूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. आंचल गोयल परभणीत रुजू होऊ नयेत, यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत त्यांना पदभार घेण्यापासून दूर ठेवल्याचे म्हटले जाते.

जागरूक नागरिक आघाडीच्या माध्यमातून संताप

एका महिला अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिली गेली. त्यामुळे परभणीकरांनी या निर्णयाविरूद्ध जागरूक नागरिक आघाडीच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने केली होती. यानंतर हा प्रश्न राज्यभर गाजला. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल याच राहतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.

जनतेचा विजय झाल्याची भावना परभणीकरांतून व्यक्त होत आहे. मंगळवारी सायंकाळी नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून परभणी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्याचे कळवले. त्यानंतर आज परभणीत जागरूक नागरिक आघाडी संघर्ष समितीच्या वतीने एकमेकांना पेढे देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

संबंधित बातम्या :

आम्हाला डॅशिंग अधिकारी आंचल गोयल याच जिल्हाधिकारी हव्यात, परभणीकरांचं आंदोलन, सरकार दखल घेणार?

डॅशिंग अधिकारी आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी, नवाब मलिक यांचं स्पष्टीकरण

पदभार स्वीकारण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच परभणीत, डॅशिंग अधिकारी आंचल गोयल यांची ऐनवेळी बदली रद्द

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.