पंकजा मुंडे यांना आजवरचा सर्वात मोठा धक्का, धनंजय मुंडे यांनी गड राखला; परळी, अंबाजोगाईचा निकाल काय?

बीडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली होती. मात्र, त्यांचे फक्त तीनच उमदेवार निवडून आले आहेत.

पंकजा मुंडे यांना आजवरचा सर्वात मोठा धक्का, धनंजय मुंडे यांनी गड राखला; परळी, अंबाजोगाईचा निकाल काय?
pankaja mundeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 1:31 PM

बीड : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर मुख्यमंत्रीपद असलेल्या शिंदे गटाची मात्र दारुण अवस्था झाली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलं होतं ते बीडकडे. परळी आणि अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीच्या निमित्ताने मुंडे भाऊ-बहीण पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. पंकजा मुंडे या परळीतच ठाण मांडून होत्या. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आपआपलं पॅनल निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं. मात्र, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पंकजा मुंडे यांना धक्काच बसला आहे. पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे सर्वात कमी उमेदवार निवडून आले आहेत. पंकजा यांचा बाजार समितीतील हा सर्वात मोठा पराभव असल्याचं मानलं जात आहे.

अंबाजोगाई बाजार समितीत पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. अंबाजोगाई बाजार समितीत 18 पैकी 15 जागांवर धनंजय मुंडे यांनी आपले उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचा हा सर्वात मोठा विजय आहे. 15 जागा जिंकून धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली आहे. तर पंकजा मुंडे यांना अवघ्या तीनच जागांवर विजय मिळाला आहे. त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपसाठीही हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपने ही निवडणूक पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात लढली होती. आणखी एका जागेचा निकाल यायचा बाकी आहे.

हे सुद्धा वाचा

जल्लोष… जल्लोष

अंबाजोगाई बाजार समितीची मतमोजणी आज होती. त्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघेही मतदान केंद्रावर हजर झाले होते. यावेळी दोघांनी एकमेकांना भेटून विचारपूस केली. त्यानंतर दोघेही आपआपल्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळले. दोन्ही भाऊ बहीण एकमेकांची विचारपूस करणारं चित्र सुखावणारं होतं. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली अन् दुपारपर्यंत अंबाजोगाई बाजार समिती धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे मतदान केंद्रावरच धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत, ढोलाच्या तालावर ठेका धरत एकच जल्लोष केला. यावेळी पेढे वाटून एकमेकांचं अभिनंदनही करण्यात आलं.

परळीतही पराभव

दरम्यान, परळी बाजार समितीत धनंजय मुंडे यांचे 14 उमेदवार आघाडीवर आहेत. तर पंकजा मुंडे यांचा एकच उमदेवार आघाडीवर आहे. परळी बाजार समितीही धनंजय मुंडे यांच्या ताब्यात जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. दरम्यान, मतमोजणीच्यावेळी परळी मतमोजणी केंद्रावरील कर्मचऱ्यावर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घेतला आक्षेप होता. उमेदवाराच्या ताब्यातील संस्थेत काम करणारा कर्मचारी प्रशासनाने मतमोजणीसाठी ठेवल्याचा आरोप करत आक्षेप घेण्यात आला होता. अखेर त्या मतमोजणी करणाऱ्या कर्मचऱ्याला हटवण्यात आल्यानंतर पुन्हा मतमोजणी सुरू झाली.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.