पंकजा मुंडे यांचा एक विजय आणि धनंजय मुंडे यांचं मोठं विधान; ‘त्या’ विधानाची बीडमध्ये का होतेय चर्चा?

पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन धनंजय मुंडे यांनी बाजार समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. बाजार समिती निवडणुकीसाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दोन पॅनलमध्ये लढत आहे.

पंकजा मुंडे यांचा एक विजय आणि धनंजय मुंडे यांचं मोठं विधान; 'त्या' विधानाची बीडमध्ये का होतेय चर्चा?
pankaja mundeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 12:42 PM

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या जवाहर एज्युकेशन संस्थेवर बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं या सोसायटीवर वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या या विजयाने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. मात्र, पंकजा मुंडे यांच्या या विजयावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. पंकजा मुंडे बिनविरोध निवडून आल्या नसत्या तर अनेकांचा कार्यक्रमच झाला असता, असं मोठं विधान धनंजय मुंडे यांनी केलं आहे. धनंजय मुंडे यांच्या या विधानाची बीडमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक प्रचाराच्यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांची काय अवस्था आहे? त्यांच्या पॅनलची काय अवस्था आहे? कशासाठी ते निवडणूक लढले…? खरं सांगू समोरचा पॅनल उभा राहिला आहे, तो का राहिला आहे? फक्त त्यांची चोरी लपवण्यासाठी. दुसरा काही प्रॉब्लेम नाही. कदाचित एक उमेदवार बिनविरोध निघाला नसता तर बऱ्याचजणांचा कार्यक्रमच उरकला असता. अनेकजणांनी फॉर्मच मागे घेतले असते. त्यामुळे विजय आपला निश्चित आहे. काहीच काळजी करू नका, असं धनंजय मुंडे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड

दरम्यान, परळीतील जवाहर एज्युकेशन संस्थेवर पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पंकजा मुंडे यांचं वर्चस्व असलेल्या या संस्थेवर काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांची देखील बिनविरोध निवड झाली होती. आता त्याच संस्थेवर पंकजा मुंडे यांची देखील निवड झालीय. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर पंकजा मुंडे यांचे या संस्थेवर वर्चस्व आहे. संचालक मंडळाच्या 34 जागांसाठी सध्या निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी हितचिंतक सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात बालाजी गित्ते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गित्ते यांनी अर्ज मागे घेतल्याने पंकजा मुंडे यांची ही बिनविरोध निवड झाली आहे.

प्रचाराचा शुभारंभ

दरम्यान, जवाहर एज्युकेशन सोसायटीसह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचारातही धनंजय मुंडे व्यस्त आहेत. परळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचारास धनंजय मुंडे यांनी सुरुवात केली. ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या पायऱ्यावर नारळ फोडून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला.

यावेळी या निवडणुकीतील उमेदवार, पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्यापारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान परळी बाजार समिती निवडणुकीसाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दोन पॅनलमध्ये समोरासमोर लढत होत असून मुंडे बहीण भावासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....