Fact Check: मोदी नावाचा गावगुंड खरंच आहे का?, नाना पटोलेंच्या गावात ‘टीव्ही9’ची शोध मोहीम; काय आहे सत्य?

मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असं वादग्रस्त विधान असलेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे.

Fact Check: मोदी नावाचा गावगुंड खरंच आहे का?, नाना पटोलेंच्या गावात 'टीव्ही9'ची शोध मोहीम; काय आहे सत्य?
nana patole village
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 2:15 PM

भंडारा: मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असं वादग्रस्त विधान असलेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजपने ठिकठिकाणी आंदोलन सुरू करून पटोलेंना कोंडीत पकडलं आहे. हे सर्व प्रकरण अंगलट आल्यानंतर, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोललोच नाही. गावातील एका गावगुंडाबाबत मी ते विधान केलं आहे, अशी सारवासारव नाना पटोले यांनी केली. पण आमच्या टीमने खरंच मोदी नावाचा गावगुंड आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून जे समोर आलं, त्यावरून अनेक प्रश्नचिन्हं दिसून निर्माण झाले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक विधान केलं. त्यानंतर त्याची सारवासारव करणारं दुसरं विधान केलं. मी मोदींबाबत बोललो नाही. गावातील मोदी नावाच्या गावगुंडाबाबत बोललो. भंडाऱ्यातील देवनाळा या गावात त्यांनी हे विधान केलं होतं. पटोलेंच्या सुकळी या गावाशेजारीच हे गाव आहे. याच गावात त्यांनी विधान केलं होतं. त्यामुळे मोदी नावाचा खरंच कोणी गावगुंड सुकळीत आहे का? या गावगुंडाबाबत पटोलेंकडे ग्रामस्थांनी खरंच तक्रार केली होती का? याचा शोध घेण्यासाठी टीव्ही9 मराठीची टीम थेट भंडाऱ्यातील सुकळीत पोहोचली. तरुण ग्रामस्थांपासून ते 80 वर्षाच्या स्थानिक ग्रामस्थांबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. मोदी नावाचा गावगुंड कुठे आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

ग्रामस्थ नेमकं काय म्हणाले?

एका तरुणाने मोदी नावाचा गावगुंड सुकळीत राहत नसल्याचं सांगितलं. तर, एका 80 वर्षाच्या आजोबांना मोदी नावाचा गावगुंड गावात राहतो का? असं विचारलं. तर नाय जी, नाय जी, असं म्हणून त्यांनी असा गावगुंड गावात राहत नसल्याचं सांगितलं. आपलं वय 80 वर्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच 80 वर्षात या नावाचा गावगुंड कधी दिसला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

गावगुंड कधी नाय दिसला ना

केवळ दोन लोकांना विचारूनच आमची टीम थांबली नाही. टीमने अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. मोटारसायकलवर आलेल्या एका तरुणाला आमच्या टीमने थांबवलं. तो याच गावचा असल्याची खात्री करून घेतली. नंतर त्याला या गावात मोदी नावाच गावगुंड कधी दिसला का? असा थेट सवाल केला. त्यावर, गावगुंड कधी नाय दिसला ना आम्हाला, असं उत्तर या तरुणाने दिलं. नंतर एका 16-17 वर्षाच्या मुलालाही मोदी नावाचा गावगुंड दिसला का? असं विचारल्यावर त्यानेही नन्नाचा पाढा वाचला. एकाने तर देशद्रोहीच बोलत आहेत तसे. पण गावात गावगुंड तर नाहीये, असं दुसऱ्या एका तरुणाने सांगितलं.

पटोले नेमके काय म्हणाले?

“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.

संबंधित बातम्या:

‘नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही…’ फडणवीसांचं प्रत्युत्तर, तर चंद्रकांतदादांचे सर्व जिल्हाध्यक्षांना महत्वाचे आदेश

Video : ‘मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो!’, नाना पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल, भाजपचा जोरदार हल्लाबोल

नाना पटोलेंवर उपचारासाठी पुणे भाजपची 1 हजाराची मनी ऑर्डर! तर पटोलेंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, बावनकुळे आक्रमक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.