मोठी बातमी! अखेर आमदार संतोष बांगर यांच्यासह 40 जणांवर गुन्हे दाखल; काय आहे प्रकरण?
आमदार संतोष बांगर यांच्या अखेर गुन्हा दाखल झाला आहे. प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली: नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असलेले शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संतोष बांगर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांच्यासह 35 ते 35 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे बांगर आता काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आमदार संतोष बांगर यांच्या अखेर गुन्हा दाखल झाला आहे. प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दूध का दूध, पानी का पानी करून दाखवावे
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच संतोष बांगर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मीडिया सातत्याने संतोष बांगरची दादागिरी म्हणतोय. मात्र तुम्ही तिथे जाऊन दूध का दूध पानी का पानी करून दाखवावे. उपमुख्यामंत्र्यांना मी त्या महिलेची क्लिप ऐकवली त्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली, असा दावा बांगर यांनी केला होता.
खपवून घेणार नाही
प्राध्यापकाला मारहाण केल्याचं प्रकरण आठ दिवसांपूर्वीच असून त्यावेळी ते शिक्षक का समोर आले नाहीत? त्या महिलेने उपमुख्यमंत्र्यांना घडलेला प्रकार सांगितला आहे. महिलांना कुणी अपशब्द वापरल्यास मी असे अनेक गुन्हे घ्यायला तयार आहे. चौकशीला समोर जायला तयार आहे, असंही ते म्हणाले होते.
महिला प्राध्यापक काय म्हणाल्या?
दरम्यान, आम्हीच आमदार संतोष बांगर यांना मोठ्या भावाप्रमाणे हा सगळा प्रकार सांगितला होता. म्हणून ते या कॉलेजमध्ये आले होते. महिलांची पिळवणूक करणाऱ्या प्राचार्यावर कडक कारवाई करण्यात यावी. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं, अशी मागणी प्राध्यापक महिलांनी केली होती. यापूर्वी या महिला प्राध्यापकानी महिला आयोगाकडे तक्रार केली होती.