Gadchiroli Rain | गडचिरोली जिल्हात पूरस्थिती कायम, भामरागड राष्ट्रीय महामार्ग बंद…
गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्हात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे घरे, रस्ते आणि शेतींचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचा धोका पाहता प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी देखील हालवले आहे. पावसाचा जोर जरी कमी झाला असेल तरीही पुराचा धोका जिल्हात कायम आहे.
गडचिरोली : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) सुरूयं. यामुळे नद्यांच्या पाणी पातळी मोठी वाढ झालीयं. गडचिरोली भागात सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून गडचिरोली (Gadchiroli) जिल्हात पुराचा जास्त फटका बसलायं. अजूनही गडचिरोली जिल्हात पूरस्थिती कायम असल्याने चिंता व्यक्त केली जातयं. पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान (Damage) झाले असून अनेक घरे पुराच्या विळख्यात अडकली आहेत. भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद करण्यात आलायं.
भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी
गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्हात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे घरे, रस्ते आणि शेतींचे मोठे नुकसान झाले. पुराचा धोका पाहता प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी देखील हालवले आहे. पावसाचा जोर जरी कमी झाला असेल तरीही पुराचा धोका जिल्हात कायम आहे. या पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याचे चित्र बघायला मिळते. इतकेच नाही तर अनेक भागांमध्ये लाईट नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
अहेरी मोयाबीनपेठा वटरानाल्यापासुन राज्यमार्ग बंद
गेंडनुर नाल्यावर पुराचे पाणी असल्यामुळे लाहेरीपासून भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग सध्या बंद करण्यात आलायं. अहेरी मोयाबीनपेठा वटरानालापासुन हा राज्यमार्ग बंद आहे. गडचिरोली जिल्ह्यात हे दोन मार्ग सध्या बंद असून उर्वरीत पूर्ण मार्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. मात्र, हे दोन महत्वाचे मार्ग बंद असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोयं. मात्र, अजूनही गडचिरोली जिल्हातील पूरस्थिती कायम आहे.