किती बदलल्या पिढ्या, किती बदलली सरकारं, वाढली फक्त उष्णता आणि पाण्यासाठी चिमुकल्यांची पायपीट

गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या धरणापासून अवघ्या 70 किलोमीटर दुरावर असलेल्या झिंगानुर गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. नागरिकांची अवस्था किती बिकट आहे हे कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झालं आहे. यामध्ये एक लहान चिमुकला त्याच्या खांद्यावर पाणी आणताना दिसतोय.

किती बदलल्या पिढ्या, किती बदलली सरकारं,  वाढली फक्त उष्णता आणि पाण्यासाठी चिमुकल्यांची पायपीट
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 10:28 PM

गडचिरोली : हे महाराष्ट्राचं चित्र आहे, आजही राज्यात अशी अनेक गावं आहेत, जिथे पाण्यासाठी सर्वात जास्त उष्णतेत चिमुकल्यांना पाण्यासाठी वणवण करावीच लागतेय. अनेक ठिकाणी नदीवरुन पाणीपुरवठा योजना देखील मंजूर झाल्या आहेत, त्याची कामे देखील वेगात आहेत, पण या योजना कशा फस्त करता येतील, कमी जाडीचे आणि निकृष्ट पाईपं कशी वापरता येतील, अशी बहुतांश ठिकाणी गिधाडांची नजर आहे, या गिधाडांच्या या पापामुळेच या पुढील पिढीच्या इवल्याशा लेकरांना या तडपत्या उन्हात पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. ही आपल्या पिढीने त्यांच्या खांद्यावर दिलेली जबाबदारी नाही. तर हे पापाचं ओझं दिलं आहे, पुढील पिढीला जबाबदारीचं म्हणजेच आपण केलेल्या विकासाचं ओझं द्याव लागतं, विकासाचा दाखला दाखवून द्यावा लागतो, पण आपण पापच देत आहोत. तेच तेच आणि पाण्यासाठी तिचं भटकणारी पावलं आणि पिढी.

जगात तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठी होईल, असं म्हणतात. पण खरंच सर्वसामान्य, गरीब, होतकरु नागरिकांकडे पाण्यासाठी युद्ध करण्याची ताकद आहे का? हा मुळात प्रश्नच आहे. सर्वसामान्य माणूस आजच्या घडीला फक्त सोसू शकतो. हेच एक वास्तविक सत्य आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावांमधील नागरिकांची पाण्यासाठी होणारी दुरावस्था.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी आपल्या भाषणात हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, असं म्हणतात. त्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक महत्त्वाचेदेखील निर्णय घेतले आहेत.त्यामुळे आम्ही या वृत्ताच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील सीमावासीयांचा पाण्यासाठी होणारा त्रास पोहोचवत आहोत.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्रातील गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला. ही गावं पाण्यासाठी आक्रमक झाली होती. त्यांनी पाण्यासाठी कर्नाटक राज्यात विलीन होण्याचा आक्रमक पवित्रा घेतलेला. विशेष म्हणजे कर्नाटक सरकारनेही त्यांना पाणी पुरवठा करण्यास सहमती दिलेली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावकऱ्यांची मनधरणी केली आणि तिथल्या पाण्याचा प्रश्न सोडवला. गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील गावांचीदेखील अशीच काहीशी दुरावस्था आहे.

झिंगानुर गावात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांची हाक मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावी म्हणून एक माध्यम असल्याची जबाबादारी म्हणून आम्ही ‘टीव्ही 9 मराठी’ हे वृत्त प्रदर्शित करत आहोत. गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या धरणापासून अवघ्या 70 किलोमीटर दुरावर असलेल्या झिंगानुर गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे.

सिरोंचा तालुक्यातील शेवटच्या झिंगानुर गावासोबत असलेले रामाजी गुडम येलसेंडी या गावात नेहमीच पाण्याची कमतरता उन्हाळ्यात भासून येते. या भागात जवळपास 20 किलोमीटर अंतरापर्यंत कुठेही 500-600 मीटर खोदकाम करुन हातपंप किंवा बोरपंप पाणीच लागले नाही.

30 हजार लोकसंख्या असलेल्या अनेक गावांत हीच समस्या

झिंगानुर परिसरात जवळपास 30 हजार लोकसंख्या असलेल्या अनेक गावांत पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांना भटकावं लागत आहे. नागरिकांना होणाऱ्या कसरतीचे दृश्य कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. या व्हिडीओत एक कुटुंब पाणी आपल्या खांद्यावर आणत आहे.

कुटुंबातील लहान मुलंही पाणी आणण्यासाठी कसरती करत आहेत. अतिशय मन हेलावणारं हे दृश्य आहे. या नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड गैरसोय होतेय. त्यामुळे या गावकऱ्यांची प्रशासनाकडे पाण्याची व्यवस्था करण्याची विनंती आहे.

मुख्यमंत्र्यांकडून Tv9 मराठीच्या बातमीची दखल, गावकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन

संबंधित बातमीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून याप्रकरणी गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती देण्यात आली आहे. “या विषयी गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. संजय मीना हे सध्या गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आहेत आणि सध्या ते प्रशिक्षणासाठी मसुरी येथे आहेत. पण ते म्हणाले की, ते ZP CEO आणि अतिरिक्त कलेक्टर यांना या प्रकरणाची पाहणी करून नागरिकांना दिलासा देण्यास सांगतील”, अशी माहिती मुख्यनमंत्र्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...