Gram Panchayat Election 2022 Voting Live : ग्रामपंचायतीचा गुलाल कुणाचा? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावगाडा सज्ज

| Updated on: Dec 18, 2022 | 6:04 AM

Maha Vikas Aghadi Morcha Today Live Updates : ग्रामपंचायतीचा गुलाल कुणाचा? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावगाडा सज्ज

Gram Panchayat Election 2022 Voting Live : ग्रामपंचायतीचा गुलाल कुणाचा? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावगाडा सज्ज
Gram Panchayat Election Image Credit source: tv9 marathi

मुंबई: उद्या रविवार 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होणरा आहे. त्याचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी ग्रामीण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. या ग्रामपंचायतीत कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Dec 2022 05:39 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर

    पुणे : 

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर

    राज ठाकरे २८ डिसेंबरला पुण्यात

    राज ठाकरे यांच्या हस्ते होणार पुण्यातील तीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

    पुणे शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयाचे होणार उद्घाटन

    आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेची मोर्चेबांधणी सुरु

    शिवाजीनगर, कसबा, खडकवासला मतदारसंघात मनसे ताकद वाढवणार

  • 17 Dec 2022 04:23 PM (IST)

    सांगली जिल्ह्यातील नरवाड येथे भरारी पथकाचा छापा

    सांगली जिल्ह्यातील नरवाड येथे भरारी पथकाचा छापा

    मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साड्या नि पाचशेच्या नोटा जप्त

    भरारी पथकानं पोलिसांच्या स्वाधीन केले साहित्य

    साड्यांमध्ये लपवून ठेवल्या होत्या पाचशेच्या नोटा

  • 17 Dec 2022 10:58 AM (IST)

    उस्मानाबादेत मतदानाच्या साहित्य वाटपाला सुरुवात

    उस्मानाबाद जिल्ह्यातील 165 ग्रामपंचायतसाठी उद्या मतदान होत आहे

    मतदानासाठी लागणारे साहित्य वाटप सुरु करण्यात आले आहे

    बॅलेट मशीन, मतपेटी यासह अन्य साहित्य देण्याचे काम सुरू झाले आहे

    कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी वाहन व्यवस्था व पोलिस बंदोबस्त पाठवला जात आहे.

    उस्मानाबाद जिल्ह्यातील 658 मतदान केंदावर 3 लाख 65 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    जिल्ह्यातील 39 मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली असून 2 हजार 752 कर्मचारी व 37 झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलीय

  • 17 Dec 2022 09:06 AM (IST)

    ग्रामपंचायतीचा प्रचार संपताच दोघांवर तलवारीने हल्ला, बीडमध्ये खळबळ

    बीडच्या दगडी शाहजनापूर इथं ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे

    निवडणूक प्रचारावरून विठ्ठल मस्के आणि एकावर तलवारीने हल्ला झाल्याने बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे.

    हल्ला करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहे

  • 17 Dec 2022 08:07 AM (IST)

    रत्नागिरीत उद्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुट्टी जाहीर

    मतदान क्षेत्रातील खासगी आस्थापनांच्या कामगारांना मिळणार सुट्टी

    कामगार आयुक्तांचा निर्णय, जिल्ह्यात उद्या 222 ग्रामपंचायतींसाठी मतदान

    मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सुट्टी किंवा भरपगारी सुट्टीचे आदेश

  • 17 Dec 2022 07:36 AM (IST)

    ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गालबोट, प्रचाराच्या ट्रॅक्टरवरून पडून वृद्धाचा मृत्यू

    भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील असोला येथे घडली घटना

    चिमण देवाजी गजभिये वय 65 वर्ष, राहणार आसोला असे मृतक इसमाचे नाव

    पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला

    एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळूहळू व्यक्त केल्या जात असून लाखांदूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

  • 17 Dec 2022 07:28 AM (IST)

    सांगली जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायती आणि 409 सरपंच पदासाठी उद्या मतदान

    या निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री, आजी-माजी आमदार, खासदार आणि स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

    जिल्ह्यातील 447 ग्रामपंचायतींपैकी 31 ग्रामपंचायत आणि 38 सरपंच बिनविरोध निवडून आलेले आहेत

    सांगली जिल्ह्यात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठं प्राबल्य

    महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, बाजार समिती या ठिकाणी या तिन्ही पक्षांची बलाबल मोठ्या प्रमाणात

  • 17 Dec 2022 07:25 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

    गावकी आणि भावकीसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या गाव कारभाऱ्याच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष

    तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका या प्रामुख्याने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थकांच्या पॅनलमध्ये होत आहेत.

    त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत

  • 17 Dec 2022 07:22 AM (IST)

    अकोला जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतींसाठी आज मतपेट्या रवाना होणार

    अकोला जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतींसाठी उद्या रविवारी मतदान होणार

    मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

    जिल्ह्यातल्या 833 मतदान केंद्रावर मतपेट्या रवाना होणार

    उद्या सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरवात होणार आहे

  • 17 Dec 2022 07:20 AM (IST)

    नांदेडच्या आदिवासी बहुल असलेल्या किनवट तालुक्यातील दुर्गम भागात ग्रामपंचायत निवडणुकीचा निरुत्साह

    उद्या मतदान असूनही कोणत्याही उमेदवाराने मतदारांशी संपर्कच केला नाही

    उमेदवार फिरकले नसल्याचं वाडी तांड्यावरच्या ग्रामस्थानी सांगितलंय

    त्यामुळे या भागात ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करून घेण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान

    मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक विभाग वाडी तांड्यावरच्या नागरिकांशी संवाद साधतायत

  • 17 Dec 2022 07:16 AM (IST)

    गोंदियात एका गावाचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

    दुसऱ्या ग्रामपंचायतीत परस्पर नावं घातल्याने नाराज मतदार करणार मतदानावर बहिष्कार

    पूर्वीच्या ग्रामपंचायतीत नाव नसल्याने 36 मतदार नाराज

    नाव पूर्वीच्या ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्याची मागणी

    अन्यथा ग्रामपंचायत निवडणूक बहिष्काराचा निर्णय

    पूर्वी माहिती देऊनही प्रशासनाने केले दुर्लक्ष

Published On - Dec 17,2022 7:10 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.