उद्धव ठाकरे यांच्या सभेला किती गर्दी होती?, खुर्च्या किती अन् मैदानाची क्षमता किती?; गुलाबराव पाटील यांनी आकडाच सांगितला

संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जळगाव जिल्ह्यात यावं. कोण मर्द आणि कोण नामर्द हे दाखवून देऊ. तुम्हाला चारी मुंड्या चीत करून बाळासाहेबांचा भगवा नाही घातला तर नावाचा गुलाबराव पाटील नाही, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांच्या सभेला किती गर्दी होती?, खुर्च्या किती अन् मैदानाची क्षमता किती?; गुलाबराव पाटील यांनी आकडाच सांगितला
gulabrao patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 6:34 AM

खेमचंद कुमावत, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल पाचोऱ्यात सभा झाली. ही सभा प्रचंड होणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात होता. या सभेला काही लाख लोक येतील असं सांगितलं जात होतं. सभा संपल्यानंतरही हाच दावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात या सभेला गर्दी कमी होती, असा दावा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांनी तर पाचोऱ्यातील मैदानाची क्षमता आणि मैदानात ठाकरे गटाने लावलेल्या खुर्च्यांचा आकडाच सांगितला. तसेच संपूर्ण जळगावात एक लाख लोक बसतील एवढ्या क्षमतेचं मैदानच नसल्याचा दावा करत ठाकरे गटाच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. कालच्या पाचोऱ्याच्या सभेत एक लाख खुर्च्या नव्हत्या. त्या मैदानाची क्षमताच 25 हजाराची आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला 18 हजार खुर्च्या होत्या आणि सभेला 12 हजाराच्यावर लोकं नव्हते. एक लाख संख्या बसेल एवढं ग्राउंड जळगाव जिल्ह्यात नाही. मग पाचोऱ्यामध्ये कसं असणार? असा सवालच गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंवर राग नाही

यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. मी जे सांगितलं तेच उद्धव ठाकरे सभेत बोलले. उद्धव ठाकरे नवं काहीच बोलले नाहीत. राऊतही काय बोलले? गुलाबो गँग म्हणाले आणि खाली बसले. कालच्या भाषणात या नेत्यांमध्ये कोणतंही व्हिजन नव्हतं. उद्धव ठाकरेंविषयी आम्हाला राग नाही हे आम्ही आधीच सांगितलं होतं. परंतु ज्यांनी शिवसेना फोडली त्यांच्याविषयी आमच्या मनात राग आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या कानात सांगितलं असेल शांत राहा म्हणून संजय राऊत तीन मिनिट बोलले असावेत, असा टोला पाटील यांनी लगावला.

राऊतांची लायकी नाही

संजय राऊत, राजाराम वाघमारे कोण आहेत? आमच्या मतावर मोठे झालेले हे लोक यांचा काय संबंध? उलट स्वाभिमानी असाल तर त्यांनी राजीनामा द्यावा. आमची 41 मत घेऊन ते विजयी झाले आहेत. त्यांनी राजीनामा द्यायचा नाही आणि हलकटपणांनी वागायचं. राजीनामा देण्या इतपत संजय राऊत यांची लायकी नाही आणि ते राजीनामा देणार पण नाही, अशी जहरी टीकाही त्यांनी केली.

मला कुठं तपासलंय?

मर्द आणि इतर गोष्टी या तपासून करावे लागतात. नामर्द म्हणायला मला कुठं तपासलं आहे? असं म्हणणं चुकीचं आहे. भाषणाची तुलना करा. भाषणामधील नामर्द सारखे वाक्य वापरत आहेत याचा अर्थ काय होतो? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.