‘गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणविरोधी; भाजप आणि त्यांच्या संबंधांचा तपास करा’

गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी सातत्याने मराठाविरोधी काम करत आहेत. त्यांचे आणि भाजपचे काही संबंध आहेत का | gunratan sadavarte Hasan Mushrif

'गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणविरोधी; भाजप आणि त्यांच्या संबंधांचा तपास करा'
हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडणार?
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 10:58 AM

कोल्हापूर: गुणरत्न सदावर्ते यांनी शिवस्वराज्य दिनाला विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलण्याचा धाडस या राज्यात कोण करू शकतो. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना भाजपचा पाठिंबा आहे का, याचा तपास केला पाहिजे, असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले. (NCP leader Hasan Mushrif take a dig at gunratan sadavarte)

ते शनिवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी सातत्याने मराठाविरोधी काम करत आहेत. त्यांचे आणि भाजपचे काही संबंध आहेत का, हे तपासण्याची गरज आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले.

‘भारताने जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचे आभार मानायला पाहिजेत’

भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे आभार मानले पाहिजेत. अमेरिकेने भारताला 25 कोटी लसी दिल्या आहेत. मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार केला असतानाही बायडन यांनी भारताला लसी पुरवल्या. कमला हॅरिस यांनीही बरीच मदत केली, असे मुश्रीफ यांनी म्हटले.

‘नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे मोदींशी चांगले संबंध असल्यानेच कारवाई नाही’

बँकांना कोट्यवधी रुपयांना ठकवून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चौक्सीवरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी धक्कादायक विधान केलं आहे. नीरव मोदी आणि चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच या दोघांवर कारवाई केली जात नाही, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधताना हे धक्कादायक विधान केलं आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही गुजरातचे आहेत. त्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोघांवरही कारवाई केली जात नाही, असं सांगतानाच चोक्सीला अटक केल्यानंतर देखील आपली तपास यंत्रणा हात हलवत परत येणार हे मला माहीत होतं, असं धक्कादायक विधान मुश्रीफ यांनी केलं आहे.

पथक परतलं

चोक्सीला आणण्यासाठी भारतातून एक आठ सदस्यांचं पथक डोमिनिकाला गेलं होतं. मात्र, डोमिनिका हायकोर्टाने चोक्सीच्या प्रकरणावरील सुनावणी स्थगित ठेवली. त्यामुळे त्याचं भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकलं नाही. परिणामी भारतीय पथकाला परत यावं लागलं आहे.

संबंधित बातम्या:

PNB Scam | ‘पीएनबी’ घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेड्या, नवा फोटो पाहिलात?

PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक

(NCP leader Hasan Mushrif take a dig at gunratan sadavarte)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.