कुठे कार पुरात वाहून गेली, तर कुठे पूल पाण्याखाली; राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण

सध्या संततधार पावसामुळे भात, भुईमूग, सोयाबीनला फाटका बसण्याची शक्यता आहे. सध्या चांदोली धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणातून विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कुठे कार पुरात वाहून गेली, तर कुठे पूल पाण्याखाली; राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण
chandrapur rainImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 7:46 AM

चंद्रपूर | 29 जुलै 2023 : राज्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तर पूर आला आहे. खासकरून विदर्भात पावसाने मोठा कहर केला आहे. पुरामुळे अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. संसार उघड्यावर पडले आहेत. कुणाची कार पुरात वाहून गेलीय, तर कुठे पूल पाण्याखाली गेला तर कुठे घरं पाण्यात बुडाली, अशी स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक हादरून गेले आहेत. जगायचं कसं? असा प्रश्न या लोकांना पडला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पोंभुर्णा- आक्सापूर मार्गांवर बेरडी नाल्यात एक कार वाहून गेली आहे. सुमारे एक किलोमीटर अंतरावर एका बंधाऱ्यापाशी कार सापडली. पण कारचालक बेपत्ता आहे. कारचालक अमित गेडाम पोंभुर्णा येथील तहसील कार्यालयात पुरवठा सहाय्यक म्ह्नणून कार्यरत आहेत. गोंडपिपरीच्या शासकीय गोदामाचा त्यांच्याकडे प्रभार होता. तो गायब झाल्याने त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे लोक त्याचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

पुरावर सीसीटीव्हीचा वॉच

नागपूरसह विदर्भात आजही मुसळाधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपुरातील पुरस्थितीवर 3600 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवण्यात येत आहे. नागपुरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर 24 तास वॉच ठेवण्यात येत आहे. नागपूरातील स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटरमधून 3600 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरावर वॅाच ठेवण्यात येत आहे. ज्या भागात पाणी साचलं तिथे तात्काळ उपाययोजना करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. सीटी ऑपरेशन सेंटरमध्ये फायरब्रिगेड आणि पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.

सतर्कतेचा इशारा

विदर्भात पावसाची दाणादाण असतानाच पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. एवढा मोठा पूर सांगलीत आला आहे. गेल्या काही दिवसापासून सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार आणि चांदोली धरणातील विसर्गामुळे वारणा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून वारणा नदीवरील ऐतवडे खुर्द येथील पूल पाण्याखाली गेला आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पूल पाण्याखाली

दरम्यान वारणा नदीवरील चिकुर्डे, कुंडलवाडी, मांगले आदी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा दुवा साधणाऱ्या ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने वारणा उद्योग समूहासह कोल्हापूरकडे जाणारा प्रवासीवर्ग चिकुर्डे मार्गे जात आहे. सध्या संततधार पावसामुळे भात, भुईमूग, सोयाबीनला फाटका बसण्याची शक्यता आहे.

सध्या चांदोली धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणातून विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वारणा नदीच्या पुराची पाणी पातळी वाढत असल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. या दरम्यान कोणीही ग्रामस्थांनी पुलावरून ये जा करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.