Nanded | दोन जलकुंभ उभारूनही 14 वर्षांपासून बंद अवस्थेत, नागरिकांचे पाण्यासाठी हाल…
गेल्या अनेक दिवसांपासून सिडको- हडकोची वाढती लोकसंख्या पाहता या भागात 20 लाख लिटर क्षमतेच्या दोन मोठ्या टाक्या 2008 साली बांधन्यात आल्या . पण गेल्या 14 वर्षापासून या टाक्यांना पाणी नाही. आताही जुन्या टाक्यातून पाणी पुरवठा केला जातो.
नांदेड : नांदेडच्या (Nanded) सिडको- हडको भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने दोन जलकुंभ चौदा वर्षापूर्वी उभारले होते. मात्र, आजही ते बंदच अवस्थेत असल्याने महापालिकेचे करोडो रूपये पाण्यात गेल्याचे चित्र आहे. महापालिकेकडून दोन जलकुंभ उभारण्यात आले, पण 14 वर्षांपासून जलवाहिनी (Aqueduct) टाकण्यात आली नाहीयं. यामुळे हे दोन जलकुंभ धूळ खात पडून आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्चून बांधलेले जलकुंभ शोभेची वस्तू ठरत आहेत. नवीन जलवाहिनी टाकून या दोन्ही जलकुंभाव्दारे पाणी पुरवठा (Water supply) करावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक करत आहेत.
दोन जलकुंभ उभारून कोट्यावधी रूपये पाण्यात
सिडको- हडको भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने दोन जलकुंभ उभारून देखील पाणीपुरवठा केला जात नसल्याने नागरिकांनाकडून संताप व्यक्त केला जातोयं. या टाक्यातून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. सिडको- हडको भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाच लाख लिटरच्या जुन्या दोन टाक्या आहेत आणि अजूनही जुन्या टाक्यातूनच नागरिकांना पाणीपुरवठा होत असल्याने पुरेसे पाणी नागरिकांना मिळत नाही.
सिडको- हडकोची वाढती लोकसंख्या आणि अपुरा पाणी पुरवठा
गेल्या अनेक दिवसांपासून सिडको- हडकोची वाढती लोकसंख्या पाहता या भागात 20 लाख लिटर क्षमतेच्या दोन मोठ्या टाक्या 2008 साली बांधन्यात आल्या . पण गेल्या 14 वर्षापासून या टाक्यांना पाणी नाही. आताही जुन्या टाक्यातून पाणी पुरवठा केला जातो. पण लोकसंख्या जास्त आणि पाणी कमी असल्याने पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत. महापालिकडे सतत पाठपुरावा करूनही केवळ अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे जलवाहिनीचे काम झाले नाही असा लोकप्रतिनिधीचा आरोप आहे.