Palghar Accident : पालघरमध्ये भरधाव ट्रकने दोन बालकांसह तिघांना चिरडले, एकाची प्रकृती चिंताजनक

जव्हार नाशिक रस्त्याला मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी गाव हे मुख्य रस्त्यावर आहे. महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी वाहने भरधाव ये जा करीत असतात. दुपारी  जव्हारहून नाशिकच्या दिशेने हा ट्रक जात होता. ट्रकचा चालक नशेत होता. त्याने वाहन हयगयीने चालवीत विरुद्ध दिशेने, तेथे खेळत असलेल्या बालकांना तथा प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली.

Palghar Accident : पालघरमध्ये भरधाव ट्रकने दोन बालकांसह तिघांना चिरडले, एकाची प्रकृती चिंताजनक
महावितरणचा भोंगळ कारभार दोन भावंडांच्या जीवावर बेतलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 6:27 PM

पालघर : मोखाडा तालुक्यातील नाशिक जव्हार महामार्गावर असलेल्या मोरचुंडी येथे दुपारी एका भरधाव ट्रक (Truck)ने विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात दोन बालकां (Two Children)चा समावेश असून त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपाचारासाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. आरोही नकुल सोनार (5), पायल भालचंद्र वारघडे (9) अशी अपघातात ठार झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. (In Palghar, a truck crushed three people including two children, The condition of one is serious)

जव्हार नाशिक रस्त्याला मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी गाव हे मुख्य रस्त्यावर आहे. महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी वाहने भरधाव ये जा करीत असतात. दुपारी  जव्हारहून नाशिकच्या दिशेने हा ट्रक जात होता. ट्रकचा चालक नशेत होता. त्याने वाहन हयगयीने चालवीत विरुद्ध दिशेने, तेथे खेळत असलेल्या बालकांना तथा प्रवाशांना चिरडत झाडाला धडक दिली. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मोखाडा पोलिस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही मोखाडा पोलिस करीत आहेत.

धुळ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू

नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी लहान मुलाला सोबत घेऊन मोटरसायकलने जात असताना अज्ञात वाहनाचा आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात मोटरसायकलस्वार पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात मोटरसायकलस्वाराचे धड वेगळे आणि शिर वेगळे झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील विखरण या गावातील विनोद राजपूत हे नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी आपल्या लहान मुलाला घेऊन विक्रीतून चिमठाणे मोटरसायकलने जात होते. यावेळी भडणे फाट्याजवळ भडगाव येथे अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला. यात विनोद राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. (In Palghar, a truck crushed three people including two children, The condition of one is serious)

इतर बातम्या

Missing Girl : बोरिवली येथून हरवलेली मुलगी इगतपुरी रेल्वे स्थानकात सापडली, पोलिसांनी पालकांकडे केले सुपूर्द

Video: गॅरंटी, असं महाकाय जनावर वळवळत जाताना तुम्ही पाहिलं नसेल, कमजोर दिलवाले ना देखे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.