कोल्हापूरमध्ये पोल्ट्रीत ओढ्याचं पाणी घुसलं, शेतकऱ्याचं 8 ते 10 लाखांचं नुकसान
पोल्ट्री फर्ममध्ये ओढा फुटून पाणी जावून सुमारे 2 त 3 हजार पक्षी मरण पावले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षी दगावल्यानं पोल्ट्री व्यावसायिकाचं तब्बल 8 ते 10 लाख रुपये नुकसान झाले आहे.
कोल्हापूर: महाराष्ट्रात गेल्या चार दिवसात झालेल्या अतिवृष्टी झाली. रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी दुर्घटना घडल्या असून अनेकांनी जीव गमावला आहे. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची माहिती आता समोर येत आहे. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर येथील शेतकऱ्याच्या पोल्ट्रीमध्ये ओढ्याचं पाणी घुसल्यानं तब्बल 8 ते 10 लाखांचं नुकसान झालंय.
2 ते 3 हजार पक्षी मृत्यूमुखी
श्री नारायण सगन धामणेकर पोल्ट्री फार्म शेतकरी श्री राजू मरागळे यांच्या इब्रहिमपूर ता चंदगड जिल्हा कोल्हापूर यांच्या शेतामधील पोल्ट्री फर्ममध्ये ओढा फुटून पाणी जावून सुमारे 2 त 3 हजार पक्षी मरण पावले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षी दगावल्यानं पोल्ट्री व्यावसायिकाचं तब्बल 8 ते 10 लाख रुपये नुकसान झाले आहे.
8 ते 10 लाखांचं नुकसान कसं भरून काढायचा हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. नुकसान शेतकऱ्यानी कशाप्रकारे सहन करावे हे असा सवाल उपस्थित झाला आहे. शासनाने लवकरात पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सांगलीच्या वाळवा तालुक्यात पोल्ट्री व्यावसायिकाचं 25 लाखांचं नुकसान
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मुल्ला यांच्या पोल्ट्रीमध्ये पाणी शिरले होते. यावेळी पोल्ट्री मधील तब्बल 16 हजार कोंबड्या मृत्यू मुखी पडल्या आहेत. त्याामुळे पोल्ट्रीचे व्यावसायिकाचे 25 लाखांचे नुकसान झाले आहे.या पुरात शेती बरोबर जनावरे आणि कोंबड्यानं ही फटका बसला आहे. शासनाने मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
पोल्ट्री व्यावसायिकाचं तब्बल 25 लाखांचं नुकसान
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी गावातील शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरल्यानं पोल्ट्री व्यावसायिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पोल्ट्रीत पाणी शिरल्यानं तब्बल 16 हजार कोंबड्या मृत झाल्या आहेत. तर, व्यावसायिकाचं एकूण 25 लाखांचं नुकसान झालं आहे.
शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांचं स्थलांतर
2019 नंतर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसलाय. त्यातही शिरोळ तालुक्यात परिस्थिती गंभीर बनली असून या एकाच तालुक्यातील जवळपास दहा ते बारा हजार लोकांना स्थलांतर करावे लागलय. इतकच नाही तर शेकडो जनावरांचा देखील स्थलांतर करण्यात आलय. शिरोळ तालुक्यातील राजापूर, राजापूरवाडी,टाकळी,अकोला या भागातील पूरग्रस्तां बरोबरच त्यांच्या जनावरांना टाकळीवाडी इथल्या गुरुदत्त शुगर कारखाना परिसरात निवारा देण्यात आलाय.. गुरुदत्त शुगर्स कडून सगळ्या जनावरांच्या चार्याची सोय देखील करण्यात आलीय. शेकडोंच्या संख्येने जनावरे असल्याने दत्त शुगर कारखाना परिसराला छावणीचे स्वरूप आलय. या आसरा केंद्रामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.
इतर बातम्या:
मत्स्यपालनासाठी बिनव्याजी कर्ज, शेतीचा दर्जा मिळणार, ‘या’ राज्याचा मोठा निर्णय
(Kolhapur Flood Update Poultry Businessman loss of ten lakh rupees due to water lodging )