बिंदू चौकात घडामोडी वाढल्या, पोलिसांचा मोठा फौजफाटा, महाडिक VS पाटील, संघर्ष तापणार की निवळणार?

बिंदू चौकात सध्याच्या घडीला मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा संघर्ष होऊ नये यासाठी तयारी केली आहे. पोलीस वाद मिटवण्यासाठी सज्ज आहे.

बिंदू चौकात घडामोडी वाढल्या, पोलिसांचा मोठा फौजफाटा, महाडिक VS पाटील, संघर्ष तापणार की निवळणार?
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 8:24 PM

कोल्हापूर : माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी दिलेलं चॅलेंज आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या गटाने स्वीकारल्याने कोल्हापुरातील घडामोडींना वेग आला आहे. अमल महाडिक यांनी बिंदू चौकात (Bindu Chowk) येऊन समोरासमोर चर्चा करण्याचं आव्हान सतेज पाटील यांना दिलं होतं. या चर्चेसाठी महाडिंकांनी आज संध्याकाळी साडेसात वाजेची वेळ दिली होती. त्यांचं हे आव्हान सतेज पाटील यांनी स्वीकारलं. त्यामुळे आता पाटील गटही बिंदू चौकात दाखल होणार हे निश्चित झालं. दोन्ही गट बिंदू चौकात जमले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आधीच घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता पोलीस कसं हाताळतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बिंदू चौकात सध्याच्या घडीला मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा संघर्ष होऊ नये यासाठी तयारी केली आहे. पोलीस वाद मिटवण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे पोलीस दोन्ही गटांना बिंदू चौकावर येऊच देणार नाही. या दोन्ही गटांना बिंदू चौकापासून काही अंतरावर अडवलं जाणार आहे. पण तरीही बिंदू चौकात एक फलंक लागलं आहे. ‘आमदार सतेज पाटील यांचं एकदा ठरलं की ठरलं’, अशा आशयाचा फलक बिंदू चौकात लागला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं प्रकरण काय?

कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीवरुन आमदार सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्यातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना दिसत आहे. माजी आमदार अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना बिंदू चौकात खुल्या चर्चेसाठी येण्याचं आव्हान दिलंय. तेच आव्हान सतेज पाटील यांच्या गटाने स्वीकारला आहे. आमदार ऋतुराज पाटील वाजत गाजत संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात येणार असल्याची माहिती समोर आलेली. याशिवाय बिंदू चौकात सध्याच्या घडीला घडामोडी वाढताना दिसत आहेत.

तेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांच्यामध्ये चांगलंच शीतयुद्ध सुरू झालेलं आहे. काल एका सभेमध्ये सतेज पाटील यांनी व्यासपीठावरून भ्याले…भ्याले… महाडिक भ्याले असं म्हणत त्यांना खुले आव्हान दिलं होतं.

सतेज पाटील यांनी दिलेल्या या आव्हानाचा स्विकार करत श्री राजाराम साखर कारखान्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे घेऊन मी आज संध्याकाळी साडेसात वाजता बिंदू चौकात हजर आहे. तुम्ही देखील डी वाय पाटील साखर कारखान्याची कागदपत्र घेऊन बिंदू चौकात यावं, असं प्रति आव्हान माजी आमदार अमल महाडिक यांनी माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना दिलं आहे. आता अमल महाडिक यांच्या आव्हानाला सतेज पाटील काय उत्तर देतात याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.