Madhya Pradesh Bus Accident: इंदूर अपघातात बसचा चक्काचूर, केवळ सांगाडाच उरला, त्या शेवटच्या काही मिनिटात काय घडलं?

Madhya Pradesh Bus Accident: घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले. बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेणेचे काम सुरु आहे.

Madhya Pradesh Bus Accident: इंदूर अपघातात बसचा चक्काचूर, केवळ सांगाडाच उरला, त्या शेवटच्या काही मिनिटात काय घडलं?
इंदूर अपघातात बस आणि चालकाचाही मृत्यू, त्या शेवटच्या काही मिनिटात काय घडलं?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 2:58 PM

इंदूर: मध्यप्रदेशातील इंदूरहून जळगाव जिल्ह्याच्या अमळनेरकडे जाणारी बस  (Indor Amalner Bus Accident) खरगोन येथे नर्मदा नदीत (Narmada River) कोसळली. या भीषण अपघातात बसच्या वाहनचालक आणि वाहकांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. या अपघातानंतर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. प्रशासनाने बसचा सांगाडा (ST Bus) नदीतून बाहेर काढला आहे. अपघातातील 13 मृतांपैकी 10 जणांची ओळख पटली आहे. तर अजूनही अपघातातील काहीजण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. वाहनचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून ही बस थेट दुथडी भरून वाहणाऱ्या नर्मदा नदीत कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

एसटी महामंडळाची अमळनेर आगाराची इंदूर- अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज सकाळी 07.30 वा. इंदूर येथुन अमळनेरकडे रवाना झाली. आज सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेशमधील खलघाट आणि ठिगरीमधील नर्मदा नदीच्या पुलावर सदर बस अपघातग्रस्त होऊन नर्मदा नदीत कोसळली. अमळनेर बस आगाराच्या या बसमध्ये एकूण 55 प्रवासी प्रवास करत होते. खरगोन येथे ही बस नर्मदा नदीत कोसळली. हा पूल धार आणि खरगोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. ही बस नदीत कोसळल्याने तिची चक्काचूर झाला आहे. हा अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. अनेकांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. काही प्रवासी बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यापैकी 10 जणांची ओळख पटली आहे.

हे सुद्धा वाचा

हेल्पलाईन क्रमांक जारी

घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले. बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेणेचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात आहे. अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. या दुर्घटनेतील मृत आणि जखमींच्या नातेवाईकांसाठी 09555899091, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193 हे क्रमांक ही हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केली आहे.

मृतांची नावे

1. राम गोपाल जांगीड, नांगल कला, गोविंदगढ़ जयपूर, राजस्थान 2. हेमराज जोशी, वय 70 वर्ष, मल्हारगढ़ उदयपूर, राजस्थान 3. श्रवण चौधरी, वय 40 वर्षे,शारदा कॉलनी अमळनेर, जळगाव 4. आनंदा पाटील, वय 60, पिळोदा अमळनेर 5. निबाजी पाटील, वय 55 वर्षे, पिळोदा, अमळनेर 6. एकनाथ पाटील, वय 45 वर्षे, अमळनेर (वरील 1 से 6 पर्यंतच्या मृतांची ओळख आधार कार्डव्दारे केलेली आहे), 7. मुर्तजा बोरा, वय 27 वर्षे, मूर्तिजापुर अकोला (नातेवाईकांनी ओळख पटवली) 8. अब्बास, नूरानी नगर, (इंदूर नातेवाईकांकडून ओळख पटलेली आहे) 9. चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक) 10) प्रकाश श्रावण चौधरी (वाहक)

त्या शेवटच्या 10 मिनिटात काय झालं?

सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेशमधील खलघाट आणि ठिगरीमधील नर्मदा नदीच्या पुलावर हा अपघात झाला. बस पुलावर आली तेव्हा अनियंत्रित झाली होती. त्यामुळे बसने पुलावरील कठड्याला जोरदार धक्का दिला आणि काही कळायच्या आतच बस नदीच्या वाहत्या पाण्यात कोसळली. त्यामुळे अनेक प्रवाशांना नदीत बुडालेल्या बसमध्येच जलसमाधी मिळाली. तर काही प्रवाशांनी पोहत पोहत स्वत:चा बचाव केला. बस नदीत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत करण्यास सुरुवात केली. जखमींना तातडीने बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.