Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत.
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना अपघात झाल्यानंतर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर अपघातात जखमी झालेल्या क्रिकेटपटू ऋषभ पंतचं ऑपरेशन लंडनमध्ये केलं जाणार आहे. याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत. सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडीही इथे वाचायला मिळतील.
LIVE NEWS & UPDATES
-
चंद्रपूर : माझा घात-अपघात होऊ शकतो…
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली भीती
तुमच्या मागे चौकशी लावण्यासारखं काही नसल्याने घडविला जाऊ शकतो अपघात
अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्याचं सांगत सुषमा अंधारे यांनी केला गौप्यस्फोट
चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी सभागृहात सुषमा अंधारे यांनी व्याख्यान देतांना केलं वक्तव्य
महापुरुषांच्या स्वप्नातील भारत या विषयावर त्यांचे होते व्याख्यान
चंद्रपुरातील काही सामाजिक संघटनांनी एकत्र येत या व्याख्यानाचे केले होते आयोजन
-
अंबरनाथमध्ये भरधाव स्विफ्ट कार उलटली
अंबरनाथमध्ये भरधाव स्विफ्ट कार उलटली
लोकनगरी नवीन बायपास रोडवरील घटना
अतिवेगामुळे नियंत्रण सुटून स्विफ्ट कार उलटली
सुदैवाने अपघातात कुणालाही इजा नाही
-
-
मे महिन्यात राज्यात निवडणूका लागतील
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत मतं केलं व्यक्त,
निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे पवारांचे आदेश,
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात लवकरच शिबीराला सुरूवात करणार,
महापालिका ,जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कामाला लागा,
सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती.
-
हिंदू महादेव कोळी समाजाकडून हिंदू चालीरीतीचा त्याग, अनोखे आंदोलन
नांदेड : महादेव कोळी समाजाच्या शेकडो आदिवासी बांधवांनी केला हिंदू देव देवतांचा त्याग,
घरातील देव देवता तहसीलदाराकडे सुपूर्त करत केला देवांचा त्याग,
शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार किरण अंबेकर यांनी स्वीकारले देव देवतांच्या प्रतिमा,
जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने हिंदू धर्माच्या चालीरितीचा त्याग करण्याचा महादेव कोळी समाजाचा निर्धार.
-
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस
अवकाळी पावसामुळे कापूस पिकांचे मोठे नुकसान, अवकाळी पावसाने कापूस मोठया प्रमाणावर भिजला
अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, तूर, हरबरा पिकाला जबर फटका
पावसामुळे कापसाचे बोंडें सडण्याच्या मार्गावर
कालपासून अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण
खरीपानंतर आता रबी हंगामातही शेतपिकाचे नुकसान
-
-
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या आरोग्यासाठी सिद्धरामेश्वराला लोटांगण
सोलापूरमधील धनंजय मुंडे युवा प्रतिष्ठानने सिद्धरामेश्वराला घातले साकडे
ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात लोटांगण घालत दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना
सोलापुरातील युवा कार्यकर्ते एकवटले
-
सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या आरोग्यासाठी सिद्धरामेश्वराला लोटांगण
धनंजय मुंडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने सिद्धरामेश्वराला साकडे घालण्यात आले
ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात लोटांगण घालत दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना
सोलापुरातील युवा कार्यकर्ते एकवटले
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात तांत्रिक बिघाड
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद आणि पुण्याच्या दौऱ्यावर,
शिंदे-फडणवीस दोघेही एयरपोर्टच्या व्हीआयपी वेटींग रुममध्ये थांबले,
विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत साशंकता
महाराष्ट्र ऑलम्पिक स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या दौर्याकडे सगळ्यांच्या नजरा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाय रोड पुण्याला जाणार.
-
भाजप आमदार जयकुमार गोरे यांना 12 दिवसानंतर मिळाला रुग्णालयातुन डीचार्ज
पुणे : प्रकृती उत्तम असल्यामुळे जयकुमार गोरे यांना डॉक्टरांनी देण्याचा घेतला निर्णय,
जयकुमार गोरे यांचा 24 तारखेच्या पहाटे फलटणजवळ भीषण अपघात झाला होता,
12 दिवसांपासून जयकुमार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते,
जयकुमार गोरे काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा कामाला लागणार.
-
सोलापूर- बार्शी तालुक्यातील सुर्डी-मालवंडी गावाजवळ एसटी बसला अपघात
अपघातामध्ये एसटी बस पलटी झाल्याची माहिती
कुर्डुवाडी वरून वैरागला जाणारी बस पलटी झाली
बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती
उसाचे ट्रॅक्टर रस्त्याच्या मधोमध जात असल्याने एसटी ओव्हरटेक करताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात गेली
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही
-
आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह आठ मंत्री शहरात शहरात
आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह आठ मंत्री शहरात शहरात
पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन स्वरूपात करणारा महाअॅडवांटेज एक्सपोचं उद्घाटन
मसीआ या संघटनेच्या अडवांटेज महाराष्ट्र एक्सपो 2023 च्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती
या एक्स्पोच्या माध्यमातून एक हजार कोटींच्या उलाढालीचा अंदाज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औरंगाबाद प्रेम, एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबादच्या फेऱ्या वाढल्या
-
शाळकरी मुलीच्या छेडछाडीच्या निषेधार्थ आज दुसऱ्या दिवशीही कोल्हापुरातील आजरा बंदच
शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून घटनेचा निषेध
काल पोलीस आणि दोन्ही समाजाच्या समन्वय बैठकीत तीन दिवसीय पुकारलेला बंद मागे घेण्याचा झाला होता निर्णय
मात्र शहर तीन दिवस बंद ठेवण्यावर रात्री युवक कार्यकर्ते पुन्हा झाले आक्रमक
युवकांच्या आक्रमक पवित्र नंतर शहर तीन दिवस बंद ठेवण्याचा पुन्हा झाला निर्णय
आजरा शहर बंदमुळे शहर ठप्प, आजऱ्यात उद्या निघणार हिंदू आक्रोश मोर्चा
-
म्हाडाच्या घरांसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज करता येणार
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी महत्वाची बातमी
म्हाडाच्या घरांसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज करता येणार
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील 5 हजार 915 सदनिकांची म्हाडाकडून सोडत जाहीर
अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी या घरांची सोडत
-घरांची सोडत 17 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे
-
औरंगाबाद- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात ७०० जणांना विषबाधा
स्वीट डिश मधून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती
मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास वऱ्हाडी मंडळीला झाला उलट्या आणि जुलाबाचा त्रास
मध्यरात्री औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात वऱ्हाडी मंडळींना दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कदीर मौलाना यांच्या मुलाच्या लग्नात झाली विषबाधा
-
त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवस भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून 12 जानेवारी पर्यंत राहणार बंद,
ज्योतिर्लिंग पिंड संवर्धन आणि देखभाल दुरुस्तीचे काम,
हे काम भारतीय पुरातत्व खात्यामार्फत करण्यात येणार,
देवस्थानच्या त्रिकाल पूजा राहणार सुरूच.
-
कोल्हापुरातील श्रीक्षेत्र ज्योतिबासह 28 गावांसाठी होणार नवीन प्राधिकरण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार विनय कोरे यांच्यासह अधिकाऱ्यांमध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय
नवीन प्राधिकरणाचा प्रस्ताव 25 जानेवारीपर्यंत देण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना
नव्या प्राधिकरणामुळे ज्योतिबा मंदिर विकासाला मिळणार चालना
तिरुपती मंदिराच्या धर्तीवर जोतिबा डोंगरावर सुविधा देण्यावर बैठकीत चर्चा
आमदार विनय कोरे यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश
-
नागपूरात सरकारकडून मिळणारं स्वस्त धान्य पुर्णपणे मोफत
आधी दिला जाणारा 3 रूपये किलो गहू आणि 2 रूपये किलो तांदुळ मिळणार मोफत
नागपूरातील 32 लाख 57 हजार लोकांना मिळाणार फायदा
कोरोना काळातील योजना होणार बंद
-
पुणे शहरात PMPL बसची संख्या आपुरीच
पुणे : शहरात प्रवासी संख्येत मोठी वाढ,
PMPL ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पोहोचली 13 लाखांच्यावर,
पुणे शहराला प्रवासी वाहतुकीसाठी जवळपास 3500 बसची गरज,
पण प्रत्यक्षात धावत आहेत केवळ 1650 बसेस,
बसच्या कमतरतेचा फटका थेट प्रवाशांना.
-
कोल्हापूर जिल्ह्यात चोरट्यांचा उच्छाद
कोल्हापूर जिल्ह्यात चोरट्यांचा उच्छाद
मंगळवारी एकाच दिवशी जिल्हाभरात 12 चोरीच्या घटनांची नोंद
दागिने दुचाकीसह बोकड ही केला लंपास
शहरासह जिल्हाभरात पाच दुचाकींची चोरी
तर चंदगडच्या महिपाळगडमध्ये प्राथमिक शाळेतील साहित्य चोरट्यानी केल लंपास
चोरट्यांचं पोलिसांना आव्हान
-
कोल्हापूरच्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या 1346 सभासदांना तात्पुरता दिलासा
उच्च न्यायालयाने अपात्र ठरवलेल्या सभासदांना साखर सहसंचालकांसमोर पुन्हा म्हणणं मांडता येणार
सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश
अपात्र सभासदांना म्हणणं मांडण्यासाठी दोन महिन्यांची मुदत
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाडिक गटाला मोठा दिलासा
न्यायालयीन प्रक्रियेमुळे राजाराम कारखान्याची निवडणूक आणखी चार ते पाच महिने पुढे ढकलणार
-
कोकण रेल्वे मार्गावर उद्या धावणार अहमदाबाद मंगळूर विशेष एक्सप्रेस गाडी
अहमदाबाद जंक्शन ते मंगळूर अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष रेल्वे गाडी उद्या 6 जानेवारीला धावणार आहे
ही गाडी बडोदरा, सुरत, वापी, वसईरोड, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, करमाळी, मडगाव येथे थांबणार
मंगळूरच्या दिशेने जाईल एकूण 22 डब्यांची गाडी धावणार आहे
यामध्ये वातानुकूलित द्वितीय श्रेणी तसेच तृतीय श्रेणीच्या डब्यांचा समावेश आहे
-
मांढरदेवच्या काळूबाई देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील 9 गावांमध्ये कडक निर्बंध
यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी निर्बंध
4 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान लागू असणार निर्बंध
पशुहत्या, वाद्य बाळगणे, वाद्य वाजविणे, बळी देण्यासाठी प्राण्यांची वाहतूक, मद्य वाहतूक, मद्य विक्री, नारळ फोडणे, तेल वाहने अशा प्रकारच्या गोष्टींसाठी असणार पूर्णपणे बंदी
उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिले आदेश
आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आज एकाच मंचावर
पुण्यात ऑलम्पिक स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला लावणार हजेरी
आज सायंकाळी 4 वाजता बालेवाडीत होणार कार्यक्रम
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि अजित पवार एकत्र येणार
व्यासपीठावर राजकीय टोलेबाजी रंगणार?
-
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सोलर वॉटर हीटर बसवणे बंधनकारक
केडीएमसीच्या या निर्णयाचे आता वर्षभरानंतर सकारात्मक परिणाम
कल्याण डोंबिवली परिसरातील 37 इमारतींची सोलर पॅनलद्वारे वीजनिर्मितीमुळे वीज बिलामध्ये दरमहिना हजारो रुपयांची बचत
केडीएमसी परिसरात 1 हजार 814 इमारतींवर 1 कोटी लीटर क्षमतेचे सोलर वॉटर हीटर बसवण्यात आल्याने दरवर्षी तब्बल 18 कोटी युनिट वीज बचत
सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर होण्यासाठी केडीएमसी विद्युत विभागाकडून पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती
Published On - Jan 05,2023 6:16 AM