MVA Mumbai Rally | तुमचे भोकं पडलेली तीनपाट बोलतात तेव्हा का बोलत नाहीत? : उद्धव ठाकरे
Maharashtra Breaking and Marathi News Live : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्याच्या घडीला मुंबईत घडत आहेत. मुंबईच्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेसाठी शेकडो कार्यकर्ते दाखल झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमाचं आंदोलन. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांचं मुंबईच्या हुतात्मा चौकात जनआक्रोश आंदोलन. अनेकांची धरपकड. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री 12 वाजता हुतात्मा चौकात जाऊन केलं शहिदांना अभिवादन. आज महाविकास आघाडीची बीकेसी मैदानावर वज्रमूठ सभा. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार. महाराष्ट्र दिनानिमित्ताने आजपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मेट्रोमधून सवलतीत प्रवासाची मुभा. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
तुमचे भोकं पडलेली तीनपाट बोलतात तेव्हा का बोलत नाहीत? : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :
सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा. ही राजधानी लढून मिळवलेली राजधानी आहे.
आंदण नाही तर मुंबई लढून मिळवली आहे
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा सर्वसामान्यांनी दिला होता. मोरारजी देसाई नावाचा एक नरराक्षक सत्तेत बसला होता. मुंबई, गुजरातमध्ये गोळीबार केला होता. अनेक जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी संपूर्ण गिरणगाव पेटला होता. पोलीस एवढे मातले होते की इमारतींवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. अनेकजण गुदरमरले. महिला रणरागिनी, तान्ही बाळं घेऊन रस्त्यावर उतरल्या आणि हिंमत असेल तर गोळ्या घाला, पण मुंबई घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाहीत. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असं महिला म्हणाल्या होत्या.
मला मिंदेंना सांगायचं आहे, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. सर्व जाती धर्माची लोकं माझ्यासमोर बसले आहेत.
कर्नाटकची निवडणूक जवळ आली आहे. पंतप्रधान म्हणाले काँग्रेसने त्यांना 91 वेळा शिव्या दिल्या. मी शिव्या देण्याचं समर्थन करत नाही. पण तुम्हाला ज्यावेळेला वाटतं की शिव्या देतात तेव्हा तुमचे भोकं पडलेली तीनपाट बोलतात तेव्हा का बोलत नाहीत? आम्ही तुमचा मान ठेवतो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तीनपाटांना आवरा. तुमचे काही बोलतील तर आम्ही ऐकून घेणार नाही.
मी येत्या 6 तारखेला बारसूत जाऊन बोलणार आहे. बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. मी बारसूला जाणार. 6 तारखेला बारसूला जाणार मग महाडच्या सभेला जाणार.
महाराष्ट्राने रक्त सांडून बलिदान देऊन आपली स्वतःची हक्काची ही राजधानी मिळवली आहे. ही लढून मिळवलेली राजधानी आहे. काल मध्यरात्री बारा वाजताच मी आदित्य आणि आपले शिवसैनिक हुतात्मा स्मारकाला हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करून आलो. पण मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा सर्व शिवसैनिक जमले होते. अरविंद सावंत होते.
महाराष्ट्र दिवस एकवेळेस सुरू झाला की साधारणपणे मध्यरात्रीपासून आपण तिकडे सजावट करतो, घोषणाही करतो, पण काल आम्ही तेव्हा पोहोचलो तोपर्यंत सरकारकडून आणि महापालिकेकडून कोणी तिकडे फिरकलेला नव्हता. संपूर्णपणे फुलांची जी काही सजावट होती ती आपल्या शिवसैनिकांनी केली होती. तिकडे हुतात्मा स्मारकाला मानवंदना देत असताना अभिवादन करताना मला एक सांगायचे की, त्यांनी लढा दिला नसता, संघर्ष केला नसता तर आज गद्दारी करून का होईना पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला नसता
उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले तर मी हिदुत्व सोडलं, पण संघचालक मोहन भागवत मशिदीत जातात तेव्हा काय बोलणार?
-
शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईत राहिला : अजित पवार
अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे :
महाराष्टाचं हित जपण्याची धमक, महाराष्ट्राच्या सन्मानासाठी भिडणाऱ्या मविआच्या सभेला एवढ्या प्रचंड संख्येने आपण जमलात यासाठी स्वागत करतो
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो
मुंबई महाराष्ट्राची राजधानी असली तरी ती सहजासहज मिळाली नाही. त्यासाठी खूप लोकांनी बलिदान दिलं. तेव्हा आपण 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्राचा यशस्वी कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला
मुंबई आणि मराठी माणसासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काम केलं. हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही.
काही लोकांना फोडण्याचं राजकारण झालं. अशाप्रकारचं राजकारण केल्याने संविधान राहणार आहे का? याचा विचार आपण केला पाहिजे
हे सरकार आल्यापासून निवडणुकांमध्ये जनतेने आपल्याला मत दिलं आहे,
-
-
तुम्हारे पास क्या है? हमारे पास उद्धव ठाकरे है : अशोक चव्हाण
अशोक चव्हाण यांच्या भाषणातील मुद्दे :
आजचा दिवस ऐतिहासिक दिवस
मविच्या सभांना जनतेचा प्रतिसाद
बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचं भविष्य आपण घडवू शकतो, असा मत शेतकऱ्यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांनी अडचणींच्या काळात मविआच्या बाजूने कौल दिला. आपण हॅट्र्रीक साधली. विधान परिषदेचे निकाल, अंधेरी पोटनिवडणूक आणि बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल हॅट्र्रीक आहे. आपल्याला आगामी काळात सिक्सर मारायचा आहे. ही मुंबई महापालिका आपणच आणणार आहोत हा निर्धार करण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. आपल्यावर मविआ म्हणून जबाबदारी पार पाडायची आहे
आयाराम गयाराम लोकांना जवळ करयचं कारण नाही
राजकारणात जे चाललं आहे त्याबद्दल लोकांच्या मनात नाराजी हे सगळं पाहिल्यानंतर दिवार चित्रपटाचा डायलॉग आठवतो. हमारे पास गाडी, बंगला, पैसा है, तुम्हारे पास क्या है? हमारे पास उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित दादा है
आपलं इंजिन ताकदवान आहे, आपण तिघं एकत्र येऊन स्वबळावर चांगलं सरकार स्थापन करु शकतो हे येत्या महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ
यांना मुंबई महापालिका कशाला हवीय? तर 92 हजार कोटींची फिक्स डिपोझिट तोडायची आहे.
यांचं इंजिन चीनची घुसखोरी, महागाईवर बोलत नाही. मग यांच्या डबल इंजिन सरकारचा उपयोग काय?
यांच्या ट्रिपल इंजिनला लाल सिग्नल दिलं पाहिजे आणि मविआला ताकद दिली पाहिजे
कर्नाटकात आज चांगल्या पद्धतीने काँग्रेसला प्रतिसाद मिळतोय. कर्नाटकाचा निकाल हा देशाचं भविष्य बदलणारं असणार आहे
सत्तेत येणं किंवा बाहेर जाणं हे लोकांच्या हातात आहे. लोकांनी सत्तेच्या बाहेर बसवलं तर आम्ही लोकांचा कल मान्य केलं. विद्यमान सरकार सत्तेवर आला तेव्हा त्यांना हार घालण्यासाठी जी लोकं मंत्र्यांच्या गाठीभेट घेतल्या त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा हजारो लोकं त्यांच्या भेटीसाठी आले होते ते महाराष्ट्राने पाहिलं.
राजकारणात एकमेकांना संपवण्याचं काम सुरु आहे. राजकारणात दिवस सारखे राहत नाहीत.
-
उद्धव ठाकरे मंचावर दाखल
मुंबई :
उद्धव ठाकरे मंचावर दाखल
कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
मविआ नेत्यांकडून भारत मातेची पूजा,
मविआ नेते संविधानासमोर नतमस्तक
-
वज्रमूठ सभेची सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती : नाना पटोले
नाना पटोले यांच्या भाषणातील मुद्दे :
हम तुम्हारे साथ है
ही तिसरी वज्रमूठ सभा आपण घेतो. जेव्हा वज्रमूठ सभा जवळ येते तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होते. आपण सत्तेच्या बाहेर जाऊ, लोकं आपल्याला विरोध करतील, अशी भीती सत्तेची मलई खाणाऱ्या सत्ताधाऱ्यांना वाटते
काल-परवा बाजार समितीच्या निवडणुका झाल्या. भाजप शेतकरी विरोधी आहे. बाजार समितीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने आला
हे घाबरुन निवडणुकाही घेत नाहीयत
खारघर सभेला अमित शाह दोन दास उशिराने आले, लोकं उन्हामध्ये तडफडत होते. यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते. पण गुन्हे दाखल झाले नाहीत. आप्पासाहेब धर्माधिकारींवर हे सरकार आरोप करत आहे. ज्यादिवशी निवडणुका येतील तेव्हा हे सरकार सत्तेबाहेर जाईल.
कोकणाला संपवण्याचं काम सुरु आहे. विकास कोकणाचा नाही तर यांच्या बगलबच्यांचा होतोय. बाहेरच्या परप्रांतीयांच्या नावाने जमिनी घेतल्या आहेत. सरकारला परिणाम भोगावे लागतील
हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरु झालाय. विधानसभेत आम्ही प्रश्न उपस्थित केले. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायला तयार नाही. सरकारला शेतकऱ्यांची मदत करायची नाही.
हे सरकार मूठभर लोकांसाठी काम करतंय, संविधान संपवायला सरकार निघालं आहे.
आम्ही महाविकास आघाडीबरोबर आहोत. राज्यातलं आणि केंद्रातील हे जुलमी सरकार बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाहत
-
-
अजित दादा यांच्याबद्दल वेगळं आकर्षण आहे : संजय राऊत
संजय राऊत यांच्या भाषणातील मुद्दे :
आपल्या महाराष्ट्राला प्रणाम करण्यासाठी ही वज्रमूठ सभा आहे
या सभेने निकाल दिलाय, मुंबई महाराष्ट्राची, आमच्या बापाची
देशाचे गृहमंत्री अमित शाह काल आले होते, आता आहेत का माहिती नाही, बहुतेक सभेत येऊन बसले असतील. पाहा ही ताकद, निष्ठा आणि वज्रमूठ पाहा. हम सब एक है
अजित दादा इथे बसले आहेत. दादा सगळ्यांना तुमचे आकर्षण आहे. सकाळपासून दादा येणार ना? आम्ही म्हटलं दादा येणार, बोलणार आणि जिंकणार
मगाशी आदित्य ठाकरे आले, बोलले आणि सभेला जिंकून गेले
देशात काल आणखी एक इव्हेंट झाला, मन की बात, गर्दीत माधुरी दिक्षित ऐकतेय. या देशाचा एकमेव पंतप्रधान मी पाहिला की, जो नऊ वर्ष मन की बात करतो काम की बात करत नाही. पण महाराष्ट्राची वज्रमूठ सभा काम की बात करेल
मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची, कमजोर करायची असं षडयंत्र रचलं जातंय. त्यासाठी शिवसेनेवर घाव केला. शिवसेना जोपर्यंत मजबूत आहे तोपर्यंत आपल्याला मुंबईवर घाव करता येणार नाही ही भीती दिल्लीश्वरांना आहे, पण शिवसेना पाय रोवून उभी राहिल, कारण मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर आहे
चोर, भ्रष्टाचारी तुमच्या वॉशिंगमशीनमध्ये टाकायचे आणि स्वच्छ करायचे. सुबह का भ्रष्टाचारी देशद्रोही, गद्दार जब भाजप में सामील होता हे तो उसे भ्रष्टाचारी नहीं तो देशप्रेमी कहते है.
हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अशी ही वज्रमूठ राहील. २०२४ मध्ये महाराष्ट्रात हीच वज्रमूठ सत्तेत येईल
-
उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल
मुंबई :
उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल
महाविकास आघाडीच्या भव्य सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे राज्याचं लक्ष
-
खारघर घटनेप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : भाई जगताप
काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या भाषणातील मुद्दे :
आम्ही पाठीत खंजीर खुसणार नाही
मी मुंबईचा अध्यक्ष म्हणून आश्वासित करु इच्छितो
बोक्याचं लक्ष शिक्यावर, या बोक्यांचं लक्ष 90 हजार कोटी रुपयांच्या ठेवीवर आहे
देशाच्या पंतप्रधानांनी देशाचं राजकारण करावं, असं वाटतं, पण पंतप्रधानांनी सुद्धा या ठेवींचा उल्लेख केला होता, असं दुर्देवाने सांगावसं वाटतं
युती सरकारने तयार केलेल्या आपला दवाखान्यात कोण जातं? या दवाखान्यासाठी महापालिकेचे 43 कोटी रुपये पैसे देण्यात आलाय. हा पैसा सर्वसामान्यांचा आहे. त्यावर तुम्हाला डोळा ठेवण्याचा अधिकार नाही
मविआत बिघाडीची चर्चा होते. तुम्ही काळजी करु नका, तुम्ही महाराष्ट्राची काळजी करा. खारघारमध्ये 13 लोकांचाच मृत्यू झालेला नाही. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
-
लोकशाहीमध्ये लोकांचं मन जिंकायाचं असतं, धडपशाही नसते : जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणातील मुद्दे :
– लोकशाहीमध्ये लोकांचं मन जिंकायाचं असतं, धडपशाही नसते – खारघरच्या सभेत काय झालं? ज्यांचा जीव गेलं त्यांच्या घरी कोणी मंत्री गेले नाहीत – कोकणाचा स्वास्थ्य बिघडत असेल, स्थानिकांच्या विरोध असेल तर आम्ही त्यांच्यासोबत असणार – आम्ही प्रकल्पाच्या विरोधात नाही – प्रकल्प बाहेर जावू नये, इतर ठिकाणी प्रकल्प होवू शकते – एका मुलाने रॅप केला, त्याला अटक केलं – पच्चास खोका स्वतः वर तुम्ही काय घेता? – महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र राहिलं तर कोणाचा बापही आम्हाला हरवू शकत नाही – आमच्या dna विचारलं गेलं मी सांगतो माझा dna मध्ये गद्दारी नाही
-
उद्धव ठाकरे सभास्थळाकडे रवाना
मुंबई :
उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानाबाहेर निघाले
उद्धव ठाकरे सभास्थळाकडे रवाना
-
आमच्याकडे खुर्च्या मोकळ्या राहत नाही : आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :
आमच्याकडे खुर्च्या मोकळ्या राहत नाही, ही गद्दारांची सभा नाही, लोकं अजून येत आहेत
इथे जात, धर्म, प्रांताचे मतभेद नाहीत. सर्व संविधानाचे रक्षक आहेत
आजची तारीख महत्त्वाची आहे
मविआची बैठक झाली तेव्हा मी हट्ट धरला की 1 मे ची सभा मुंबईत महाराष्ट्राच्या राजधानीत झाली पाहिजे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे
संयुक्त महाराष्ट्राची आठवण खूप महत्त्वाची आहे
महाराष्ट्राची आजची परिस्थिती काय आहे? महाराष्ट्र अंधकारात गेला आहे त्याला आपण सुवर्णकाळात न्यायचं आहे
कोरोना काळात अर्थचक्र बंद पडलं होतं तेव्हा साडेसहा कोटींची गुंतवणूक राज्यात आणली होती. तेव्हा कुणावरही अन्याय झाला नाही. काळजी घेऊन काम होत होतं.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घटनाबाह्य सरकार बसलं आहे. हे सरकार कोसळणारच.
या सरकारच्या पूर्ण मंत्रिमंडळात एक तरी महिला आहे का? मुंबईचा कोणी आहे का? मुंबई-पुण्याचं ना शेतकऱ्यांचा आवाज आहे
सरकार बिल्डरांचा कॉन्ट्रॅक्टर झाला आहे
जी कर्जमुक्ती मविआ काळात झाली ती मिळाली की नाही? हे मी शेतकऱ्यांना विचारतो तेव्हा ते मिळाली असं सांगतात
कोरोना काळात साडे चौदा कोटींची मदत शेतकऱ्यांना केली
सुप्रिया ताईंना शिवी देणार मंत्री अजूनही मंत्रिमंडळात आहेत
या लोकांवर कारवाई होत नसेल तर बाकीच्या महिलांना काय करावं?
वर्जमूठ एकत्र करुन पुढे जायचं आहे
गुजरातला सध्या दोन मुख्यमंत्री आहेत, एक तिकडचे आणि एक आपले
जी काही सरकारं आम्ही पाहिलं होतं कधी मुंबईला झुकवण्याचं काम पाहिलं नव्हतं, या सरकारला मुंबईला महाराष्ट्रापासून मोडायचं आहे, दिल्लीसमोर झुकवायचं आहे. पण मी ते होऊ देणार नाही. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही.
-
मविआचे दिग्गज नेते सभास्थळी
मुंबई :
महाविकास आघाडीचे नेते अजित पवार, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, अनिल परब, सुषमा अंधारे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ इत्यादी महत्त्वाचे नेते सभास्थळी दाखल
-
महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेला सुरुवात
मुंबई :
महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेला सुरुवात
महाराष्ट्र गीताने वज्रमूठ सभेला सुरुवात
-
उद्धव ठाकरे काय बोलणार? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष
मुंबई : छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वर्जमूठ सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाविकास आघाडीची मुंबईत आज तिसरी वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेला आज विशेष महत्त्व आहे. कारण आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस आहे. त्यामुळे या सभेत संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे फक्त उद्धव ठाकरे यांचंच भाषण नाही तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचंही भाषण महत्त्वाचं आहे.
-
अजित पवार यांच्याकडून मुंबईतील हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला जाण्यापूर्वी मुंबईतील हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार सुनील भुसारा, प्रमोद हिंदुराव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-
महाविकास आघाडीचे दिग्गज नेते सभास्थळी दाखल
मुंबई :
महाविकास आघाडीचे दिग्गज नेते सभास्थळी दाखल
मविआची मुंबईतली वज्रमूठ सभा थोड्याच वेळात सुरु होणार
-
पुणे : वाहतूक पोलिसांच्या कर्मचाऱ्याकडून दुकानदाराला मारहाण
पुण्यातील हडपसर भागात घडला धक्कादायक प्रकार
नो पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने उचलण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्याने केली मारहाण
स्थानिक दुकानदाराला आज दुपारच्या सुमारास कर्मचाऱ्याकडून शिवीगाळ आणि मारहाण
रमेश बराई असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव
-
पवार साहेब महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत – प्रविण दरेकर
महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात सकारात्मक भूमिका राहिली आहे
रिफायनरीमुळे बारसूचा विकास होत असेल तर राष्ट्रवादीची समर्थनाची भूमिका आहे
पवार साहेबांना भेटणं, यात काही राजकीय लपलंय का असं वाटत नाही
कोकणचा विकास व्हावा या भूमिकेतून उदय सामंतांनी पवारांची भेट घेतली असेल
-
पुण्यात वाहतूक पोलिसांच्या कर्मचाऱ्याकडून दुकानदाराला मारहाण
पुण्यातील हडपसर भागात घडला धक्कादायक प्रकार
नो पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने उचलण्यासाठी वाहतूक शाखेने नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी केली दुकानदाराला जबर मारहाण
स्थानिक दुकानदाराला कर्मचाऱ्याकडून शिवीगाळ आणि मारहाण
रमेश बराई असं मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव
घटनेचा सीसीटीव्हीत कैद
घटनेची माहिती घेऊन दोषींवर कारवाई करण्याचं पुणे पोलिसांच आश्वासन
-
पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती
शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई 15/3 ने विजयी
राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला 3 जागांवर समाधान
-
कराड कृषी उत्पन्न बाजार समिती
काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या रयत पॅनलचा गट 12/6
मंत्री बाळासाहेब पाटील, डॉक्टर अतुल भोसले यांना शेतकरी विकास पॅनलचे 6 जागांवर समाधान
-
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती
राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील 17/1 ने विजयी
भाजपच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनलला 1 जागेवर मानावे लागले समाधान
-
वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती
खटाव तालुका विकास आघाडीला 13/5 ने विजयी
राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना 5 जागांवर समाधानी
-
वाई कृषी उत्पन्न बाजार समिती
राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील 17/1 ने विजयी
भाजप नेते मदन भोसले 1 जागेवर समाधान
-
फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती
राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर 14 जागांवर विजयी
राष्ट्रवादीच्या 4 जागा बिनविरोध
रासप आणि शिवसेनेचा गटाचा मोठा पराभव
-
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे 16/2 ने विजयी
शिवसेनेचे आ. महेश शिंदे 1 जागेवर समाधान
अपक्ष 1
-
सातारा जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती
आमदार शिवेंद्रराजे भोसले गट 18/0 ने विजयी
स्वाभिमानी शेतकरी संघटना (उदयनराजे गट पराभूत)
-
विकासाबाबात पवार साहेबांची भूमिका राज्याला माहित आहे – जितेंद्र आव्हाड
ग्रामस्थांना विश्वासात घेतलं पाहिजे, हीच भूमिका असते
प्रकल्पाबद्दल लोकांना समजावून सांगितलं पाहिजे
लोकांना तडीपार का करता? दडपशाहीने लादून प्रकल्प करता येणार नाही
भाषणाबाबत मला माहिती नाही
-
मोहिनी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला चंदन उटीचा लेप
पुण्यातील देहू देवस्थानने साकारले होते हे रूप
मोहिनी एकादशीनिमित्त विविध फळांची आरास करण्यात आली
-
महाविकास आघाडीच्या सर्वांनी एकत्रित येत ही निवडणूक लढवली – समीर भुजबळ
अत्यंत महत्वाची निवडणूक मोठ्या फरकाने लढलो
खऱ्या अर्थाने मतदारांचे आभार
परिवर्तन पॅनल पॅनलमध्ये पुढील हवा असलेला कल दिसतोय
दडपशही आणि धुंडशहीच्या विरोधात हा निकाल आहे
नांदगावमध्येही आम्ही विजय मिळवला असता पण आमची त्या ठिकाणी तयारी नाही
उमेदवारीचा निर्णय पवार साहेब घेतील
आमदारांनी राजीनामा द्यावा
आगामी काळात देखील मविआ कायम राहील
मतदार कुणाच्या बाजूने आहेत ते समोराच्यांना कळले असेल त्यांनी आता शहाणे व्हावे
वज्रमूठ सभा हे गिफ्ट समजायचे
चांगल्या दिवशी परिवर्तन घडलेलं आहे
लोकांना संयमी भूमिका आवडते
-
सावळ्या विठुरायाच्या खजिन्यात दोन किलो सोन्याचे दान
विठ्ठलाला सोन्याचे धोतर चंदनाचा हार आणि कंठी, जालन्याच्या भक्ताकडून दान
नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर भाविकाने दिले सव्वा कोटी रुपयांचे दान
यापूर्वी या भाविकाने दिले होते सुमारे एक कोटी 80 लाख रुपयांचे दान आता परत सव्वा कोटीचे दान
गरिबांचा देव असणाऱ्या विठुरायाची श्रीमंती वाढली
विठ्ठलाच्या खजिन्यात एकाच भक्ताकडून सुमारे तीन कोटींचे दान
-
स्वच्छ मुंबई व सुंदर स्थानक अभियान स्पर्धा सुरु करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ई शिवनेरी या बसचा शुभारंभ
आता या ताफ्यात 100 गाडया येत असून आणखी 5000 गाडया येतील
आरामदायी प्रवास प्रवाशांना करता येईल
ST ने मोठ पाऊल पुढे टाकल आहे. इलेक्ट्रीक बस असल्याने प्रदूषणही होणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
स्वच्छ मुंबई व सुंदर स्थानक अभियान स्पर्धा सुरु करणार
विजयी स्थानकांना हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोध चिन्ह दिलं जाणार
-
आज वज्रमुठ सभा
बीकेसीत महाविकास आघाडीची आज वज्रमुठ सभा आहे
या सभेसाठी नवी मुंबईतील ठाकरे गटाचे कार्यकर्ते निघण्यास सुरुवात
-
मनसे आणि आरपीआय पदाधिकाऱ्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
मनसे आरपीआय या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे,
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश झाला आहे,
राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक पातळीवर मोर्चा बांधणी केली जात आहे,
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्ष प्रवेशाला महत्त्व मानलं जातंय
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ‘एक मिनिट महाराष्ट्रासाठी एक मिनिट स्वच्छतेसाठी’ या मोहीमेचं होणार भुभारंभ
ठिक ठिकाणी महाराष्ट्र स्वच्छ व्हावा कचरा घाण नाहीशी व्हावी यासाठी सीएम करणार राज्यातील नागरीकांना आवाहन
स्वच्छ भारत अभियानाशी प्रेरणा घेत , पंतप्रधान मोदींशी प्रेरणा घेत या मोहिमेचा शुभारंभ…
-
पिंपरी चिंचवड | वाढत्या उन्हाचा देवांना त्रास होवू नये म्हणून देवांना लावण्यात आली चंदनाची उटी
वाढत्या उन्हाचा नागरिकांना मोठा त्रास
वाढच्या उन्हाचा देवांना त्रास होवू नये म्हणून देवांना लावण्यात आली चंदनाची उटी
चिंचवडच्या काळभैरव मंदिरात भावीक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात
-
Maharashtra Din 2023 : वज्रमूठ सभेवर आशिष शेलार यांची टीका, मैदान छोटे, आकडे खोटे, संजय राऊतांचे भोंगे मात्र मोठे
– आवाज मोठा असला तरी लोक जमवण्यामध्ये सपशेल फेल ठरले आहेत.
– मूठभर मैदान, मूठभर संख्या आवाज मात्र मोठा अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
– छोटे मैदान घेऊन मोठी संख्या दाखविण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे.
– महाविकास आघाडीला मुंबईत जनसमर्थन नाही म्हणून छोटे मैदान घ्यावे लागले.
– भविष्यात महाविकास आघाडीच्या सभा नरेपार्कातच होतील.
-
Maharashtra Din 2023 : अजित पवार यांच्याबद्दल शिवसेना नेत्याचा सुचक इशारा, दोन दिवसात कळेल…
– राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याचा चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
– शिवसेनेचे ( शिंदे गटाचे ) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी याबाबतचे सुचक विधान केलंय.
– दोन दिवसात अजितदादा कुठे आहेत ते कळेल असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
– महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होत आहे. त्या मैदानावर अनेक सभा झाल्या. पण, आज सर्व पक्षांना एकत्रित आणून सभा घ्याव्या लागतात हे दुर्दैव असल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
-
Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे ‘आपला महाराष्ट्र’
– महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्षांत महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे 75 टुर पॅकेज सुरु केले.
– राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच देशांतर्गत विदेशी पर्यटकांना मोठया प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी हे टुर पॅकेज सुरु करण्यात आले आहे.
– महाराष्ट्र राज्याला 6 जागतिक वारसा स्थळ लाभले आहेत. राज्यात पर्यटन स्थळांचा खजिना आहे. 900 पेक्षा जास्त कोरीव लेण्या असून 400 च्या आसपास गड किल्ले आहेत.
– निसर्गरम्य, संदुर समुद्र किनारा, वाघ्र प्रकल्प, जैविक विविधतानी नटलेला महाराष्ट्र असून इथे प्रत्येकांसाठी काहीना काही आहेच. त्यामुळे हे टुर पॅकेज सुरु करण्यात आले आहे.
– पर्यटन कौशल्य विकास आणि उद्योजकता महिला आणि बाल विकास मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या टुर पॅकेजची आखणी करण्यात आली आहे.
-
Maharashtra Din 2023 : आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, उद्धव ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार
– छत्रपती संभाजीनगर, नागपूर नंतर आता महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज मुंबईत होत आहे.
– दोन्ही सभांना मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर होत आहे.
– महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या या सभेत महाविकास आघाडी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.
– आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीचे रणशिंग या सभेतून फुंकले जाणार आहे.
– राज्यसरकार आणि विशेषतः मुंबईच्या कारभारावरून शिंदे – भाजप सरकारला तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून टीकेचे लक्ष्य केले जाईल.
– या सभेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची तोफ पुन्हा धडाडणार असून आज कोणत्या मुद्यावरून सरकारला घेरणार याची उत्सुकता आहे.
-
Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांनी सांगितलं, महाराष्ट्र कसा अपेक्षित आहे ?
– महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
– हुतात्मा चौक येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री तर सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौक येथे जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
– दुसरीकेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी एक खास पोस्ट ट्विट केली आहे.
– राज ठाकरे यांनी त्यांच्या आवाजातील भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
– मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज ६३ वर्षे पूर्ण झाली आहेत.
– यानिमित्त महाराष्ट्र कसा अपेक्षित आहे हे या व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
– तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
-
Maharashtra Din 2023 : राज ठाकरे हुतात्मा चौकात दाखल
राज ठाकरे हुतात्मा चौकात दाखल
काही वेळातच मनसेचा कामगार मेळावा होणार
राज ठाकरेंकडून हुतात्म्यांना अभिवादन
-
पुण्यातील परिवहन बससेवा अडचणीत
ठेकेदारांचे पैसे न दिल्याने बससेवा अडचणीत
न्यायालयाच्या आदेशानुसार मालमत्तेचा लिलाव होण्याची शक्यता
-
रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरे बारसूवर भुमीका मांडणार
रत्नागिरीमध्ये 6 मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणारराज ठाकरे यांच्या सभेकडे सगळ्यांचे लक्ष
-
भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 8 वर
ठिगाऱ्याखालून दहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे
बचावकार्य अजूनही सुरूच
इमारतीवर असलेले मोबाईल टाॅवर अणि गोदामामधील माल दुर्घटनेसाठी कारणीभूत
-
मुंबई : मनसेचा आज कामगार मेळावा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजमध्ये होणार कामगार मेळावा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष
-
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी होणार
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, डॉ. अतुल भोसले यांचे पॅनल समोरासमोर आहेत.
निवडणुकीसाठी चुरशीने 97.19% मतदान झाले आहे
7 टेबलवर मतमोजणी होणार आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होईल.
-
पुण्यातील जम्बो कोविड सेन्टर घोटाळ्याप्रकरणी एकाला पुणे पोलिसांकडून अटक
– राजू नंदकुमार साळुंखे यांना जम्बो कोविड सेन्टरच्या गैरव्यवहार प्रकरणी अटक
– साळुंखे हे संजय राऊतचे पार्टनर, सुजित पाटकर यांचा लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार असल्याचा सोमय्यांचा आरोप
– भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती
-
नवी दिल्ली – देशातील वातावरणात प्रचंड मोठा बदल
उत्तर भारतात मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा
कालपासून राजधानी दिल्लीत ढगाळ वातावरण
मध्य महाराष्ट्र , मध्य प्रदेश मध्येही गारपीट होण्याची शक्यता
उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेशातही पावसाचा इशारा
-
जळगाव ब्रेकिंग – वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे साडेपाचशे मेंढ्या मृत्युमुखी
काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात सोनाळा शिवारात सुमारे साडेपाचशे मेंढ्या मृत्युमुखी पडल्या.
यामुळे मेंढपाळ व्यावसायिकांचे सुमारे एक कोटी रुपयांचा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गेल्या काही दिवसांपासून नांदगाव तालुक्यातील मेंढपाळ जामनेर तालुक्यात मेंढ्या चराईसाठी आलेले होते.
काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास वादळी वाऱ्याच्या पावसासह जोरदार गारपिटीमुळे एकापाठोपाठ एक अशा शेकडो मेंढ्यांचा मृत्यू झाला.
आज दुपारी महसूल विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती
-
संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींवर आरोप
रडणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदा पाहिला.
मोदींच्या 100 व्या ‘मन की बात’ वरून संजय राऊत यांचा टोला
तुमच्या पासून दूर होणाऱ्या ‘जन की बात’ ऐका, राऊत यांचा सल्ला
मला देशाचा नव्हे एका पक्षाचा पंतप्रधान दिसत आहे.
-
हुकूमशाही वृत्तीमुळे महाराष्ट्र अस्थिर – संजय राऊत
राज्य सरकार हे गेंड्याच्या कातडीचं झालं आहे, संजय राऊत यांचा आरोप
सरकारला मन आणि हृदय असतं, तर पालघरचं प्रकरण दडपलं नसतं.
-
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस उर्जादायी – संजय राऊत
महाविकास आघाडीची सभा ही संविधान आणि महाराष्ट्र रक्षणासाठी
महाराष्ट्रात कायद्याचं राज्य मोडून काढला जात आहे, संजय राऊत यांचा आरोप
-
चंद्रपूर : काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका
बाजार समितीच्या निकालानंतर जिल्ह्यातील काँग्रेस मधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला बाहेर
काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका
खासदाराने जर आपलं क्षेत्र सांभाळलं नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही लोकसभा लढा मी ब्रम्हपुरी पाहून टाकतो…
धानोरकर यांनी वडेट्टीवार यांना दिले आव्हान, सोबतच त्यांनी विजय वडेट्टीवार फक्त माझ्या मुळे विरोधी पक्षनेते आणि मंत्री झाल्याचा केला दावा,
मात्र वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात कोणत्याच कार्यकर्त्यांचं काम केलं नाही, आमदाराला निधी दिला नाही, कार्यकर्ते मजबूत केले नाही असा केला आरोप
-
मुंबई : महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा
महाविकास आघाडीची आज होणार वज्रमूठ सभा
बीकेसी येथे आज होणार वज्रमूठ सभा
-
जोरदार वादळाच्या तडाखा मध्ये सापडून साडेपाचशे मेंढ्या बकऱ्या जागीच मृत्यू
जोरदार वादळाच्या तडाखा मध्ये सापडून साडेपाचशे मेंढ्या बकऱ्या जागीच मृत्यू
झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील पिंपळगाव, नांद गाव भागात घडल्याने खळबळ उडाली आहे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी.मागणी केली आहे
-
MI vs RR IPL 2023 : Suryakumar Yadav कडून मैदानात शिवीगाळ? XXXX, VIDEO व्हायरल
MI vs RR IPL 2023 : खरंतर, टिम डेविडच्या बरोबरीने सूर्यकुमार यादव सुद्धा मुंबई इंडियन्सच्या विजयाचा हिरो आहे. पण सूर्यकुमारची बाद झाल्यानंतरची कृती अनेकांना खटकली. वाचा सविस्तर….
-
MI vs RR IPL 2023 : 6,6,6, मुंबईच्या विजयाचा हिरो Tim David ची तुफान खेळीनंतर पहिली प्रतिक्रिया
MI vs RR IPL 2023 : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात विजय शक्य झाला, ते फक्त टिम डेविडमुळे. वाचा सविस्तर….
-
मुंबईत आज करोना लसीकरण राहणार बंद
महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने मुंबईतील महानगरपालिकेच्या सर्व करोना लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी सार्वजनिक सुट्टी आहे.
त्यामुळे १ मे रोजी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व करोना केंद्रांवर करोना लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे.
२ मेपासून करोना लसीकरण पूर्ववत सुरू राहील.
त्यामुळे नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
-
पुण्यातील पीएमपी प्रशासनावर मालमत्तेचा लिलाव करण्याची नामुष्की
पुण्यातील पीएमपी प्रशासनावर मालमत्तेचा लिलाव करण्याची नामुष्की
न्यायालयाच्या आदेशानं कोथरूड आणि डेक्कन बसस्थानकामधील मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले होते.
ठेकेदारांना दंड ठोठावल्याप्रकरणी न्यायालयाने व्याजासहित पैसे परत करण्यासाठी सांगितलं होतं.
मात्र पीएमपी प्रशासनाने पैसे न दिल्यानं ट्रॅव्हल टाईम ऑपरेटर यांनी न्यायालयात धाव घेतली.
आता 20 कोटीचा भुर्दंड पीएमपीला सहन करावा लागणार आहे
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
ट्विट करत राज ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा
आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाराष्ट्र दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा, राज ठाकरे यांचं ट्विट
राज ठाकरे यांनी व्हिडीओही केला ट्विट
आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाराष्ट्र दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! #अखंडमहाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #AkhandMaharashtra #MaharashtraDin #MaharashtraDharma #HindaviSwarajya pic.twitter.com/9P6bVxW4Jf
— Raj Thackeray (@RajThackeray) May 1, 2023
-
पुण्यात पुणे – सातारा रस्त्यावर असलेल्या 4 ते 5 दुकानांना भीषण आग
सिलेंडर चा स्फोट झाल्याने लागली भीषण आग, या घटनेत दोन जण जखमी
होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स व मोबाईल शॉपी अशी तीन दुकानात लागली होती आग
आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास लागली आग
घटनास्थळी आग लागून मोठे स्फोट झाल्याने बरीच पडझड होऊन रस्त्यावर काचा, दगडे, विटा यासह इतर गोष्टींचा साठा
अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांनी घेतली घटनास्थळी धाव, आज विझवण्यात अग्निशमन दलाला यश
-
महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेपूर्वी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अजून एक धक्का
महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ सभेपूर्वी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अजून एक धक्का
उबाठा गटाचे सचिव खासदार अनिल देसाई यांचे निकटवर्तीय मारुती साळुंखे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
उबाठा गटासह संघटनेची इत्यंभूत माहिती असलेला मोहरा शिंदेंच्या गळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हुतात्म्यांना अभिवादन
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौकात जाऊन मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण केले
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडूनही अभिवादन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिल्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा
-
मुंबईच्या हुतात्मा चौकात शेतकऱ्यांचं जनआक्रोश आंदोलन; बीड आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन
आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पाणी प्रश्नावरून शेतकऱ्यांचं सकाळी सकाळीच आंदोलन
आंदोलनात महिलांचाही सहभाग
ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना व्हॅनमध्ये टाकून नेलं
Published On - May 01,2023 7:00 AM