Maharashtra LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Dec 17, 2022 | 6:51 AM

Maharashtra Pune Bandh Live Update in Marathi : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
maharashtra politics Image Credit source: tv9 marathi

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी शाह यांनी बोम्मई यांना फटकारल्याचं वृत्त आहे. फ्रिडम फ्रॅक्चर्ड या पुस्तकाला देण्यात आलेला पुरस्कार काढून घेण्यात आल्यानंतर साहित्यिकांनी राजीनामा देण्याचं सुरू केलेलं सत्र अजूनही थांबलेलं नाही. भारत आणि चीन सीमाप्रश्न पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. सोमवारी भारत आणि चीन सैन्यात पुन्हा एकदा झटापट झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर सीमाप्रश्नावर आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Dec 2022 09:45 PM (IST)

    समृद्धी महामार्गाहून पहिली बस शिर्डीसाठी रवाना

    नागपूर :

    हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाहून पहिली बस शिर्डीसाठी रवाना

    नागपूर ते शिर्डी पहिली बस 9 वाजता शिर्डी साठी झाली रवाना

    पहिल्या दिवशी 21 प्रवाशी शिर्डी साठी रवाना

    75 वर्षावरील 6 जेष्ठ नागरीक प्रवाशांना नागपूर ते शिर्डी मोफत प्रवास

    उद्या पहाटे 5-30 वाजता बस शिर्डीत दाखल होणार

  • 15 Dec 2022 09:03 PM (IST)

    धारावी पुनर्विकास प्रकल्पाला हायकोर्टात आव्हान

    Marathi News LIVE Update धारावी पुनर्विकास प्रकल्पाला हायकोर्टात आव्हान

    अदाणींच्या कंपनीला धारावी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी

    सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

    अदाणींच्या कंपनीला काम दिल्याने आव्हान

  • 15 Dec 2022 07:57 PM (IST)

    यवतमाळ : वणीतील 24 नगरसेवकांविरुद्ध गुन्हे

    वणीच्या तत्कालीन नप अध्यक्षांसह 24 नगरसेवकांविरुद्ध गुन्हे

    बेकायदेशीर ठराव पारित केल्या प्रकरणी गुन्हे दाखल

    न्यायालयाच्या आदेशाने वणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

    नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, मुख्याधिकारी संदीप बोरकर यांचा समावेश

    वणी नगर परिषदेच्या 24 नगरसेवकांवर गुन्हे दाखल

  • 15 Dec 2022 07:30 PM (IST)

    महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण

    महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण

    पुण्यातील केसरी कुस्ती स्पर्धेला मुख्यमंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता

    संस्कृती प्रतिष्ठान मुरलीधर मोहोळ यांच्यावतीनं भरवली जातीये महाराष्ट्र केसरी स्पर्धा

    मुंबईत आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही दिलं निमंत्रण

  • 15 Dec 2022 06:49 PM (IST)

    पुण्यातील सायन्स इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार

    पुण्यातील सायन्स इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार

    स्वच्छतागृहात मोबाईल ठेवून महिलेचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न

    चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

    परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू

    या घटनेची राज्य महिला आयोगांनं घेतली दखल

    पुणे पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश

  • 15 Dec 2022 05:42 PM (IST)

    लोकशाहीत प्रत्येकाल मोर्चा काढण्याचा अधिकार

    Marathi News LIVE Update लोकशाहीत प्रत्येकाल मोर्चा काढण्याचा अधिकार

    कोणत्याही मोर्चाला सरकार आडकाठी आणणार नाही

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

    सीमावादाला राजकीय मुद्दा बनवू नये

    सरकारकडून समाजहिताचे निर्णय

    कोस्टल रोडबाबात उपमुख्यमंत्र्याविषयी फडणवीस यांच्याशी चर्चा

  • 15 Dec 2022 05:13 PM (IST)

    वंचितच्या युवा जिल्हाध्यक्षाला अटक

    शिक्षक आत्महत्या प्रकरणात भगवंत वायबसे यांना अटक

    वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम युवा जिल्हाध्यक्षाला अटक

    वायबसे हे कासारी गावातून सरपंच पदाचे उमेदवार

    22 गावात त्यांनी वंचितचे पॅनल उभे केले

    न्यायालयाने वायबसे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

  • 15 Dec 2022 05:12 PM (IST)

    महामोर्चात अनेक राजकीय पक्ष,संघटना सहभागी होणार

    Marathi News LIVE Update महामोर्चात अनेक राजकीय पक्ष,संघटना सहभागी होणार

    सीमाप्रश्न, महापुरुषांवरील वक्तव्याविरोधात महामोर्चा

    17 डिसेंबर रोजी मुंबईत हल्लाबोल मोर्चा

    मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक

    बैठकीनंतर मविआ ची पत्रकार परिषद

    विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भूमिका केली विषद

  • 15 Dec 2022 04:41 PM (IST)

    महापुरुषांच्या बदनामीविरोधात मविआचा महामोर्चा

    Marathi News LIVE Update महापुरुषांच्या बदनामीविरोधात मविआचा महामोर्चा

    अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक

    उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सचिन आहिर है बैठकीत उपस्थित

    17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा

  • 15 Dec 2022 04:16 PM (IST)

    तयारी हिवाळी अधिवेशनाची

    १९ तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन

    विधिमंडळ परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था

    अधिवेशनावर ५५ पेक्षा जास्त मोर्चे येणार

    प्रत्येक वाहन, व्यक्तीची कसून चौकशी

  • 15 Dec 2022 04:00 PM (IST)

    पुण्यात होणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

    पुणे : देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं निमंत्रण

    शेवटच्या किताबाच्या लढतीसाठी देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

    भाजपा नेते आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलं निमंत्रण

  • 15 Dec 2022 11:17 AM (IST)

    घरकूल घोटाळ्यात नियमित जामीन मंजूर झाल्यानंतर माजी मंत्री सुरेश जैन हे तीन वर्षांनी जळगावत परतले

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरेश जैन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली

    मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरेश जैन यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली

    जळगाव महापालिकेसह जिल्हाभरातील विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली

  • 15 Dec 2022 11:06 AM (IST)

    मुंबईतील वन अविघ्य इमारतीच्या 35व्या मजल्याला आग

    मुंबईतील वन अविघ्य इमारतीच्या 35व्या मजल्याला आग

    रहिवाशांमध्ये खळबळ

    आगीचे प्रचंड लोट येत असल्यानं घबराट

  • 15 Dec 2022 11:05 AM (IST)

    उद्धव ठाकरे गटाला शिंदे गट धक्का देण्याच्या तयारीत

    पुणे : उद्धव ठाकरे गटाला शिंदे गट धक्का देण्याच्या तयारीत,

    युवा सेनेचे पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार,

    युवती सेनेच्या माजी सहसचिव शर्मिला येवलेसह युवा सेनेचे पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार,

    मुंबईत आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी होणार पक्ष प्रवेश सोहळा

  • 15 Dec 2022 10:10 AM (IST)

    नाशिकमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर आजपासून होणार गुन्हे दाखल

    नाशिक : अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर आजपासून होणार गुन्हे दाखल,

    मनपाचे अतिक्रमण विभाग आणि विभागीय अधिकाऱ्यांचे पथक शहरात फिरणार,

    संबंधित होर्डिंग्ज, बॅनर, फलक पालिका करणार जप्त,

    होर्डिंग्ज काढण्याचा खर्चही संबंधित व्यक्तीकडून केला जाणार वसूल.

  • 15 Dec 2022 09:53 AM (IST)

    पाम बीच मार्गावर वाशी येथे भीषण अपघात

    नवी मुंबई : पाम बीच मार्गावर वाशी येथे भीषण अपघात, सेलेरिओ आणि इनोव्हा कार मध्ये झाला अपघात, सेलेरिओ कार वेगाने वळण घेत असताना घडली दुर्घटना, अपघातात सेलेरिओ कारचे मोठे नुकसान तर इनोवा कार थेट नाल्यात पडली, अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती

  • 15 Dec 2022 09:47 AM (IST)

    विधानभवन परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप

    चंद्रकांत पाटील यांच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर विधान भवन परिसरात कडक पोलीस बंदोबस्त

    विधान भवन परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप

    विधान भवन परिसरात चारचाकी गाड्यांना प्रवेश नाही

    येणाऱ्या प्रत्येकाची केली जाणार तपासणी

  • 15 Dec 2022 09:14 AM (IST)

    निलेश माझिरे आज शिंदे गटात प्रवेश करणार

    पुणे : निलेश माझिरे आज शिंदे गटात प्रवेश करणार, मुंबईत वर्षा बंगल्यावर संध्याकाळी होणार पक्ष प्रवेश, निलेश माझिरे हे मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष होते, माझिरे हे वसंत मोरे यांचे खंदे समर्थक

  • 15 Dec 2022 09:00 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर

    दौऱ्यादरम्यान ठाकरे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी एकाच मंचावर येणार

    जिल्ह्यातील 750 कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा

    ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव यांना निमंत्रण

    निमंत्रण पत्रिकेत शिंदे गटाचे विविध खात्याचे 9 मंत्री तर ठाकरे गटाचे जिल्ह्यातील आमदारांची नावे

    दोन्ही गटाचे नेते एकाच मंत्रावर येणार का याची उत्सुकता

  • 15 Dec 2022 08:36 AM (IST)

    औरंगाबादेत मृतदेह आढळून आल्यानं खळबळ

    औरंगाबाद : वाळूजमध्ये बंद खोलीत आढळला मिठाच्या कपड्यात गुंडाळून पुरलेला मृतदेह, मृतदेह पुरण्यात आलेल्या ठिकाणी आढळली शेंदूर फासलेला दगड, अंधश्रद्धेतून नरबळी देण्यात आला असल्याची शंका, पोलिसांकडून अधिक तपास सुरु

  • 15 Dec 2022 08:07 AM (IST)

    बिले मंजूरी बिलंबाच्या कारणाने आरोग्य योजनेतून रुग्णालये बाहेर पडणार

    बिले मंजूरी बिलंबाच्या कारणाने आरोग्य योजनेतून रुग्णालये बाहेर पडणार

    रुग्णालयांना 2014 मध्ये ठरविण्यात आल्यानुसार जुन्याच दराने दिले जातात बिले

    भारती रुग्णालय, जहांगीर रुग्णालयाचा 31 डिसेंबरनंतर सीजीएचएस योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय

    इतर 48 रुग्णालयेही सीजीएचएस योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता

    केंद्र शासनाच्या आजी माजी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची होणार अडचण

  • 15 Dec 2022 08:06 AM (IST)

    औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यावरून माजी आमदार हर्षवर्धन जाधव आक्रमक

    औरंगाबाद : शहराचे नाव बदलण्यावरून माजी आमदार हर्षवर्धन जाधव आक्रमक

    माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला रस्त्यावर उतरण्याचा इशारा

    औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी राजपत्रच काढला नसल्याचा हर्षवर्धन जाधव यांचा दावा

    नाव बदलण्याचे नावाखाली राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप

    औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याबाबत घोटाळा झाल्याचा हर्षवर्धन जाधव यांचा आरोप

    शहराचे नाव बदलण्यासाठी मैदानात उतरण्याचा हर्षवर्धन जाधव यांचा इशारा

  • 15 Dec 2022 07:39 AM (IST)

    आंतरधर्मीय विवाहांसाठीच्या समितीला न्यायालयात आव्हान देणार

    सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक तैहसीन पुनावाला कोर्टात जाणार

    समितीमुळे राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे

    त्यामुळे या समितीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, पुनावाला यांची माहिती

  • 15 Dec 2022 07:38 AM (IST)

    नक्षलवाद्याचा नागपूरच्या रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू

    भंडारा कारागृहत होता बंदी

    नक्षलवाद्याचा 19 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला असून याप्रकरणी तब्बल 24 दिवसानंतर भंडारा शहर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली

    रमेश ऊर्फ हिडमा कोसा मडावी (47, रा. विरपुरम, ता. कोझ, जि. सुकमा, छत्तीसगढ) असे मृत नक्षलवाद्याचे नाव

  • 15 Dec 2022 06:34 AM (IST)

    हर हर महादेव चित्रपटातील वादग्रस्त प्रसंग वगळणार

    प्रसंग वगळूनचं 18 डिसेंबरला सिनेमा टीव्हीवर दाखवणार

    झी स्टुडिओचं संभाजी ब्रिगेडच्या मागणीनंतर पत्रक

    संभाजी ब्रिगेडनं हर हर महादेव टीव्हीवर प्रदर्शित करण्यास केला होता विरोध

    वकिलांनी नोटीस पाठवली होती, त्याला उत्तर देण्यात आलंय

  • 15 Dec 2022 06:30 AM (IST)

    गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटलांची कन्या जळगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

    सी. आर. पाटलांची कन्या भाविनी पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी देण्यात आलीय

    जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाविनी पाटील उभ्या

    सरपंचपदासाठी त्यांनी आपला अर्ज दाखल केलाय

    भाविनी पाटलांनी विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलाय

    गेल्या पाच वर्षांत गावात चांगली विकासकामे केल्याने आताही जनतेचा कौल मिळण्याची त्यांना आशा

  • 15 Dec 2022 06:26 AM (IST)

    मिलिंद भांबरे यांनी स्वीकारला नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार

    नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार काल मिलिंद भांबरे यांनी स्वीकारलाय

    बिपीनकुमार सिंग यांच्या जागी मिलिंद भांबरे यांची नियुक्ती करण्यात आली होती

    त्यानुसार काल त्यांनी पदभार स्वीकारला आहे

  • 15 Dec 2022 06:22 AM (IST)

    पुण्यात 68 व्या सवाई गंधर्व महोत्सवाचा शुभारंभ

    उस्ताद अमजद अली खाँ यांच्या सरोद वादनाने सवाई गंधर्व महोत्सवाची सुरुवात

    यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव 14 ते 18 डिसेंबर दरम्यान

    यंदाच्या महोत्सवात पंडित भीमसेन जोशी यांच्यावरील माहितीपटाचे होणार प्रदर्शन

    या सोबतच विविध कार्यक्रमांची पुणेकरांसाठी मेजवानी

Published On - Dec 15,2022 6:14 AM

Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.