Maharashtra Live Updates : ‘मी राजीनामा देतो, तुम्ही राजीनामा द्या, हे बालिशपणाचे वक्तव्य’, भाजप नेत्याचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा

| Updated on: Feb 05, 2023 | 6:04 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates : 'मी राजीनामा देतो, तुम्ही राजीनामा द्या, हे बालिशपणाचे वक्तव्य', भाजप नेत्याचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा
Maharashtra News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई: मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे शिंदे यांच्याकडून ठाण्यात शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Feb 2023 10:45 PM (IST)

    कसबा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी

    – कसबा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी – उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसचे इच्छुक उमेदवार बाळासाहेब दाभेकर नाराज – बाळासाहेब दाभेकर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार

  • 04 Feb 2023 08:18 PM (IST)

    ‘एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचं आव्हान स्वीकारावं’ संजय राऊत यांचं आवाहन

    मुंबई : 

    – ‘एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचं आव्हान स्वीकारावं’ संजय राऊत यांचं आवाहन

    – एकनाथल शिंदे यांनी 32 वर्षांच्या तरुणचं आव्हान स्वीकारावं, संजय राऊत यांचं वक्तव्य

  • 04 Feb 2023 08:05 PM (IST)

    तब्बल 8 तासांनंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू माध्यमांसमोर

    पुणे :

    – तब्बल 8 तासांनंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप प्रसार माध्यमांसमोर

    – शंकर जगताप हे या पोटनिवडणुकी साठी इच्छुक होते मात्र भारतीय जनता पार्टी कडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना दिली उमेदवारी

    –  जगताप कुटुंबीयांमध्ये उमेदवारीवरून वाद असल्याच्या चर्चा

    – दुपारी अश्विनी जगताप यांनी या वादा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत पडदा टाकला होता आता शंकर जगताप काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलं आहे

  • 04 Feb 2023 08:02 PM (IST)

    ‘मी राजीनामा देतो, तुम्ही राजीनामा द्या, हे बालिशपणाचे वक्तव्य’

    अहमदनगर :

    राम शिंदे यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका

    आदित्य ठाकरे बालिश असून ते बालिशपणाचे वक्तव्य करत आहे

    ‘मी राजीनामा देतो, तुम्ही राजीनामा द्या, हे बालिशपणाचे वक्तव्य’

    ‘ते बालिश जरी असले तरी माजी मंत्री आहेत, त्यांनी असं वक्तव्य करायला नको होतं’

    ‘आदित्य ठाकरे जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांना भाजपने पाठिंबा दिला होता’

  • 04 Feb 2023 07:11 PM (IST)

    पुन्हा सुरु करा तुमची विमा पॉलिसी

    एलआयसीची विमाधारकांसाठी खास मोहिम

    बंद पडलेली विमा पॉलिसी सुरु करता येणार

    1 फेब्रवारी 2023 ते 24 मार्च 2023 यादरम्यान विशेष मोहिम

    विलंब शुल्कावर सवलत ही मिळणार

    जोखिमयुक्त पॉलिसीसाठी ही योजना लागू नाही

  • 04 Feb 2023 06:21 PM (IST)

    एलआयसीची अदानी समूहासोबत बैठक

    पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता

    पुढील आठवड्यात अदानी व्यवस्थापनासोबत बैठक

    अदानी समूहात एलआयसीची एकूण 36,474.78 कोटींची गुंतवणूक

    एलआयसीच्या शेअरवर ही मोठा परिणाम

    एलआयसीच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची घसरण

  • 04 Feb 2023 05:30 PM (IST)

    आरएसीएल गियरटेकच्या शेअरची कमाल

    दोनच वर्षात गुंतवणूकदार मालामाल

    एप्रिल 2020 मध्ये एका शेअरची किंमत 53.80 रुपये

    आज या शेअरची किंमत 765.75 रुपयांवर

    दोन वर्षांपूर्वी गुंतविलेल्या 1 लाख रुपयांचे आत 14 लाख

  • 04 Feb 2023 04:44 PM (IST)

    सिगारेटनंतर आता गुटखा, पान मसाल्याचा नंबर

    लवकरच कराचा बोजा पडण्याची शक्यता

    जीएसटी परिषद घेऊ शकते कर वाढविण्याचा निर्णय

    सिगारेटवर केंद्रीय अर्थसंकल्पात 16 टक्के कर वाढ

    आता गुटखा आणि पान मसाल्यावर कर वाढविण्याची शिफारस

  • 04 Feb 2023 03:45 PM (IST)

    Pune Live- मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून २ दिवसीय पुणे दौऱ्यावर

    कसबा विधानसभा पोटनिवडणूक मनसे लढवणारच

    सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करणार

    राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना घेणार शहर कार्यकारणी मधील नेत्यांची बैठक

    शहर कार्यकारणी यांनी तयार केलेली इच्छुकांची यादी राज ठाकरे तपासणार

  • 04 Feb 2023 02:22 PM (IST)

    Pune- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अपडेट

    भाजपाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली

    राष्ट्रवादी चे पदाधिकारी मात्र घड्याळ चिन्हावर लढण्यास इच्छुक असल्याने राजेंद्र जगताप यांचे नाव पुढे येत आहे.

    -जगताप विरुद्ध जगताप अशी ही पोटनिवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

  • 04 Feb 2023 02:20 PM (IST)

    दिल्लीत येत्या 5 एप्रिल रोजी कामगार, शेतकरी आणि शेतमजुरांचं एल्गार आंदोलन

    शेती मालाला रास्त भाव मिळावा, दुधाला एफआरपी मिळावा, असंघटित कामगारांना हक्क देण्याची केली मागणी

    नाशिकमधील सीटू भवन येथे झाले राज्यव्यापी परिषदेचे आयोजन

    5 एप्रिल रोजी दिल्ली येथे होणाऱ्या एल्गार आंदोलनाच्या तयारीसाठी झाली परिषद

    संपूर्ण देशभरातून हजारो श्रमिक दिल्लीला जाणार

    किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिली माहिती

    केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार सातत्याने श्रमिकांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप

  • 04 Feb 2023 02:05 PM (IST)

    5 एप्रिल रोजी कामगार, शेतकरी आणि शेतमजूर दिल्ली येथे करणार एल्गार आंदोलन

    नाशिक : शेती मालाला रास्त भाव मिळावा, दुधाला एफआरपी मिळावा, असंघटित कामगारांना हक्क देण्याची केली मागणी,

    नाशिकमधील सीटू भवन येथे झाले राज्यव्यापी परिषदेचे आयोजन,

    5 एप्रिल रोजी दिल्ली येथे होणाऱ्या एल्गार आंदोलनाच्या तयारीसाठी झाली परिषद,

    संपूर्ण देशभरातून हजारो श्रमिक दिल्लीला जाणार,

    किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिली माहिती,

    केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार सातत्याने श्रमिकांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप.

  • 04 Feb 2023 11:13 AM (IST)

    मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 52 हजार 619 कोटींचा

    महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला महापालिकेचा अर्थसंकल्प

    अर्थसंकल्पाचं आकारमान 52 हजार 619 कोटींचं

    गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्प 6770 कोटींनी वाढला

  • 04 Feb 2023 10:42 AM (IST)

    सिगारेट महागली, कंपनीत फायदात

    आयटीसीच्या शेअरमध्ये मोठी उसळी

    बजेटनंतर एनएसईवर शेअर वधारला

    कंपनीला वर्षाआधारीत 21 टक्के नफा

    तिमाही निकालानंतर गुंतवणूकदारांना लाभांश

    गुंतवणूकदारांना 6 रुपये प्रति शेअर लाभांश

  • 04 Feb 2023 10:38 AM (IST)

    30 तास तर सोडाच पण 30 मिनिटे अदानींची चौकशी करा

    30 तास तर सोडाच पण 30 मिनिटं अदानींची चौकशी करा- संजय राऊत

    मोदीजी, तुम्ही राणेंसारख्या खोटारड्या माणसाला मंत्रिमंडळात कसं काय ठेवता?; संजय राऊतांचा सवाल

    राणे यांना न्यायालयात खेचणार- संजय राऊत

  • 04 Feb 2023 10:02 AM (IST)

    सोमवारी आमदार आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर

    नाशिक : देवळाली गावात आदित्य ठाकरे यांची होणार जाहीर सभा,

    माजी नगरसेविका कै.सत्यभामा गाडेकर यांच्या घरी जाणार असल्याची माहिती,

    हेमंत गोडसे यांच्यावर आदित्य ठाकरे जाहीर सभेतून हल्लाबोल करण्याची शक्यता.

  • 04 Feb 2023 09:59 AM (IST)

    पाच न्यायाधीशांच्या नावांना केंद्र सरकारकडून लवकरच मंजुरी मिळणार

    कॉलेजियमनं डिसेंबर महिन्यात पाच नावांची शिफारस केली होती

    मात्र यावरून केंद्र सरकार आणि कॉलेजियममध्ये मतमतांतरे आहेत

    मात्र लवकरचं मंजूरी दिली जाईल असं सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने सांगितलं आहे

    केंद्राकडून होत असलेल्या विलंबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली

    एस के कौल आणि न्या. ए एस ओक यांच्या खंडपीठासमोर अँटर्नी जनरल आर वेंकटरमणी यांनी दिली माहिती

  • 04 Feb 2023 09:29 AM (IST)

    आदित्य ठाकरे सोमवारी नाशिक दौऱ्यावर…

    सोमवारी आदित्य ठाकरे नाशिकमध्ये

    देवळाली गावात आदित्य ठाकरे घेणार जाहीर सभा

    माजी नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांच्या घरी जाणार असल्याची माहिती

  • 04 Feb 2023 08:52 AM (IST)

    साईबाबांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल

    शिर्डी : चुकीच्या माहितीवर, विकृतपणे अत्यंत वाईट शब्दात केली होती साईबाबांची बदनामी..

    धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल..

    साईबाबांचे समकालीन वंशज शिवाजी गोंदकर यांची गिरिधर स्वामी आणि हिरालाल काबरा राहणार हैद्राबाद यांनी बदनामी केली होती

    त्यांच्या विरोधात शिर्डी पोलिसांत तक्रार, यूट्यूबवर गिरिधर स्वामी यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत केली साईबाबांची बदनामी.

    साईभक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याप्रकरणी भादवि कलम १५३ (अ) , २९५ (अ) व २९८ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल.

    शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांची माहिती.

  • 04 Feb 2023 08:45 AM (IST)

    कोल्हापुरातील पिरवाडी इथं शीतपेय घेऊन जाणारा टेम्पो उलटला

    शीतपेयांच्या बाटल्या घेऊन जाण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड

    कोल्हापूरहून गोव्याला जात होता टेम्पो

    पहाटेच्या सुमाराची घटना

  • 04 Feb 2023 08:44 AM (IST)

    कांदळगावात भाजपच्या सभेचे बॅनर्स अज्ञातांकडून फाडण्यात आले

    सिंधुदुर्ग : ब्लेड मारून भाजपच्या सभेचे बॅनर्स फाडण्यात आले,

    कांदळगावात फाडले बॅनर्स फडण्यात आल्याने राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता,

    याठिकाणी शिवसेनेचे वैभव नाईक स्थानिक आमदार आहेत,

    मालवणात राजकिय संघर्ष वाढण्याची शक्यता.

  • 04 Feb 2023 08:42 AM (IST)

    पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेला जोरदार घसरण

    डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल 73.39 डॉलर प्रति बॅरल

    ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 79.94 डॉलर प्रति बॅरल

    मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर

    अमरावतीत 107.23 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर

    औरंगाबाद 106.75 पेट्रोल आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर

    नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर

    नाशिकमध्ये पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर

    कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

    पुण्यात पेट्रोलचा भाव 105.77 आणि डिझेल 92.30 रुपये प्रति लिटर

  • 04 Feb 2023 08:26 AM (IST)

    सत्यजित तांबे आज पत्रकार परिषद घेणार

    सत्यजित तांबे आज पत्रकार परिषद घेणार

    नाशिकमध्ये संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार

    निवडणूक निकालानंतर सत्यजित तांबे आज पहिल्यांदा येणार जाहीरपणे माध्यमांसमोर

    पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार

    झालेल्या आरोपांवर सत्यजित काय उत्तर देणार याकडे लक्ष

  • 04 Feb 2023 08:11 AM (IST)

    महापालिका पुन्हा एकदा राबविणार ढोल बजाओ मोहीम

    नाशिक : 50 हजारांवरील थकबाकीदारांच्या घरासमोर वाजविला जाणार ढोल,

    आर्थिक वर्ष संपण्यासाठी जेमतेम दोन वर्ष बाकी,

    मनपाची थकीत घरपट्टी, पाणीपट्टी तीनशे कोटींवर.

  • 04 Feb 2023 08:07 AM (IST)

    म्हाडाने काढलेल्या घराच्या सोडतीसाठी 20 दिवसांची मुदतवाढ

    अर्ज भरण्यासाठी मुदत आता 25 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे

    अर्ज भरताना संभ्रम, अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आलंय

    या सोडतीसाठी आतापर्यंत 28 हजार 720 अर्ज आले असून 16 हजार 892 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे

    म्हाडाकडून पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5,990 सदनिका विक्री करता काढल्या आहेत

  • 04 Feb 2023 08:06 AM (IST)

    पुण्यानंतर आता औरंगाबादेतही कोयत्याचा धाक

    शाळेच्या वाचमनवर गुंडाकडून कोयत्याने सपासप वार

    औरंगाबाद शहरातील बेगमपुरा परिसरातली धक्कादायक घटना

    बीएफसीआय या शाळेच्या वॉचमनवर कोयत्याने हल्ला

    अभिषेक शिंदे असं कोयत्याने वार करणाऱ्या गाव गुंडाचे नाव

    तर नितीन कोरडे असं जखमी वाचमनचे नाव

    पोलिसांकडून मात्र आरोपीवर जुजबी कारवाई

    कडक कारवाई करण्याची जखमीच्या नातेवाईकांची मागणी

  • 04 Feb 2023 07:09 AM (IST)

    नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे आज पत्रकार परिषद घेणार

    नाशिक : दुपारी चार वाजता कालिका मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात सत्यजित तांबे यांची पत्रकार परिषद

    अपक्ष आमदार सत्यजित तांबे आज भूमिका मांडणार

    कॉंग्रेसने अन्याय केला की कुणी व्यक्तीने सत्यजित तांबे काय बोलणार ?

    नाना पटोले यांच्या आरोपासह निलंबनाच्या कारवाईवर सत्यजित तांबे मत मांडणार

    बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल सत्यजित तांबे भूमिका मांडणार का ?

  • 04 Feb 2023 06:23 AM (IST)

    मालवणमधील आंगणेवाडीच्या भराडीदेवीची आज यात्रा

    यात्रेनिमित्ताने भाजपचे नेते नितेश राणे यांनी घेतला सभेच्या तयारीचा आढावा

    सभेच्या पाहणी दरम्यान नितीन राणे यांचा घावणे, पुरणपोळी आणि रश्यावर ताव

    यात्रेनिमित्ताने आंगणेवाडीला प्रचंड गर्दी

  • 04 Feb 2023 06:20 AM (IST)

    मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार

    पहिल्यांदाच प्रशासक असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार

    सत्ताधारी आणि विरोधकांविना म्हणजे लोकप्रतिनिधीविना सादर होणारा पहिला अर्थसंकल्प

    मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणार अर्थसंकल्प

    गेल्यावर्षी 45,949 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा अर्थ संकल्प 47 कोटीच्या आसपास असण्याची शक्यता

  • 04 Feb 2023 06:16 AM (IST)

    खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काल आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन

    ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशन येथे एक आगळावेगळा कार्यक्रम करण्यात आला

    श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस गणवेशाचे वाटप करण्यात आले

    बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते राहुल लोंढे यांनी राबवला कार्यक्रम

    नौपाडा पोलिस ठाण्यामध्ये उपायुक्त गणेश गावडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सोनाली ढोले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित

    श्रीकांत शिंदे यांचा सत्कार करत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला

  • 04 Feb 2023 06:11 AM (IST)

    तुर्भे डम्पिंग ग्राउंडला आग भीषण आग

    अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या

    एक ते अडीच तासानंतर आग नियंत्रणात

    येथील नागरिकंना धुराचा त्रास झाला नाही

    कारण अग्निशमन दलाच्या गाड्या ताबडतोब आल्या

Published On - Feb 04,2023 6:08 AM

Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.