Maharashtra Breaking News Live : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडून काढले पाहिजे, हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांची मागणी

| Updated on: Mar 15, 2023 | 6:14 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडून काढले पाहिजे, हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांची मागणी
Maharashtra News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, त्यांच्या शिवसेना प्रवेशाला भाजपने विरोध केला आहे. व्हिडीओ मॉर्फ प्रकरणी शीतल म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. यासह राज्यातील विविध राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Mar 2023 09:50 PM (IST)

    12 वर्षात 77 टक्क्यांनी देशभरातील नक्षलवादी हल्ले घटल्याचा केंद्र सरकारचा दावा

    नवी दिल्ली :

    भारतात 12 वर्षात नक्षलवादी हल्ले घटले

    12 वर्षात 77 टक्क्यांनी देशभरातील नक्षलवादी हल्ले घटल्याचा केंद्र सरकारचा दावा

    नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या मृत्यूचा दर 90 टक्क्यांनी कमी आला केंद्र सरकारचा दावा

    2022 सालात देशातील 45 जिल्ह्यांमध्ये 176 पोलीस ठाण्यांना नक्षलवादी हिंसेची वर्दी प्राप्त झाली

    अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण माहिती

  • 14 Mar 2023 08:22 PM (IST)

    सोन्यातील नव्हे तर दारुतील गुंतवणूक ठरली फायद्याची

    गेल्या दहा वर्षांत असा झाला गुंतवणूकदारांना मोठा फायदा

    Whisky पाठोपाठ Wine ने दिला जादा परतावा

    गुंतवणूकदारांची आलिशान कारमधूनही झाली चांदी

    नाणी आणि इतर गुंतवणुकीतून पण झाली कमाई, वाचा बातमी 

  • 14 Mar 2023 07:29 PM (IST)

    एलआयसीच्या या योजनेत अनेक फायदे

    डेथ बेनेफिट्ससोबत मिळवा जोरदार परतावा

    एलआयसीची ही योजनाच एकदम भारी

    काही वर्षांतच जमविता येईल 22 लाखांचा निधी

    गुंतवणुकीसाठी पॉलिसीत चार पर्याय, वाचा बातमी 

  • 14 Mar 2023 05:44 PM (IST)

    शेअर बाजाराला लागली नजर, आजही बाजाराला झटके

    अमेरिकेतील घडामोडींचा मोठा परिणाम

    अदानी समूहाच्या शेअरमध्ये लागले अप्पर सर्किट

    गुंतवणूकदारांचे आजही कोट्यवधींचे नुकसान

    पाडव्यापूर्वीच गुंतवणूकदारांवर संक्रांत

    शेअर बाजारात पुन्हा धूमधडाम, वाचा बातमी 

  • 14 Mar 2023 04:53 PM (IST)

    केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारचा झटका

    महागाई भत्त्यावर सोडावे लागेल पाणी

    18 महिन्यांची थकीत रक्कम न देण्याचा घेतला निर्णय

    केंद्र सरकारने उचलले कठोर पाऊल

    अर्थराज्यमंत्र्यांनी सरकारच्या निर्णयाचे दिले स्पष्टीकरण

    केंद्र सरकारच्या तिजोरीवरील ताण होणार कमी, वाचा बातमी 

  • 14 Mar 2023 02:18 PM (IST)

    नवी मुंबईतील कोपरखैरणे विभागात गुंडगिरी वाढली

    नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात एका मुलावर कोयत्याने केले वार,

    टीशर्ट वर नाव न टाकण्याने केले वार,

    सहा मारेकरी होते,

    कोपरखैरणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • 14 Mar 2023 01:53 PM (IST)

    ODI World cup 2023 : 50 ओव्हर्सचा हा शेवटचा वर्ल्ड कप? क्रिकेटमध्ये नवीन फॉर्मेट येणार?

    ODI World cup 2023 : यंदा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंट होणार आहे. वाचा सविस्तर…..

  • 14 Mar 2023 01:32 PM (IST)

    जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शन योजनेसाठी धडकले शेकडो शासकीय कर्मचारी

    अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शासकीय कर्मचाऱ्यांचा ठिय्या आंदोलन सुरू,

    भजन म्हणत केली जात आहे जुन्या पेन्शन योजना लागू करण्याची मागणी,

    सर्व विभागातील शासकीय कर्मचारी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर.

  • 14 Mar 2023 01:22 PM (IST)

    राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडून काढले पाहिजे, हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांची मागणी

    तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आहात आणि जनेतलाच वेठीस धरत आहात

    जुनी पेंशन योजना घेऊन राज्याला अजून कर्जबाजारी करण्याचा हेतू या सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे

    त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांच्या दबावाला बळी पडू नये

    इतर राज्य काय करतंय हे महत्त्वाचं नसून आपल्या राज्याला हे शक्य आहे हे बघणे महत्त्वाचे आहे, आनंद दवे यांचं मत

  • 14 Mar 2023 01:19 PM (IST)

    IPL 2023 : देशापेक्षा ‘या’ 4 प्लेयर्ससाठी IPL स्पर्धा मोठी, कॅप्टनच स्वत: नाही खेळणार

    IPL 2023 : देश नाही, पैसा मोठा या खेळाडूंनी तेच दाखवून दिलय. वाचा सविस्तर….

  • 14 Mar 2023 01:07 PM (IST)

    नाशिक : लाल कांदा शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट?

    लासलगाव बाजार समितीत नवीन उन्हाळी कांद्याची आवक

    लाल कांद्यापेक्षाही सरासरी दोनशे रुपये अधिक बाजार भाव

    45 वाहनातून 100 क्विंटलहून अधिक नवीन उन्हाळी कांद्याची आवक

    जास्तीत जास्त 1226 रुपये, कमीतकमी 700 रुपये कांद्याला भाव

    सरासरी 1000 हजार रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळतोय

  • 14 Mar 2023 12:47 PM (IST)

    आमदार हसन मुश्रीफ तीन वाजता ईडी कार्यालयात पोहोचणार

    न्यायालयाकडून दिलासा मिळताच आमदार मुश्रीफ ईडी कार्यालयाच्या दिशेने

    आमदार हसन मुश्रीफ तीन वाजता ईडी कार्यालयात पोहोचणार

  • 14 Mar 2023 12:36 PM (IST)

    Mumbai Indians च्या टीममध्ये पोलार्ड, पंड्यापेक्षा धोकादायक खेळाडूची एंट्री, जिंकवून देईल 6 वी IPL ट्रॉफी

    IPL 2021 : कायरन पोलार्डने IPL मधून निवृत्ती घेतलीय. हार्दिक पंड्या 2021 पर्यंत मुंबई इंडियन्स टीमचा प्राण होता. आता नव्या सीजनमध्ये एक नवीन धमाकेदार खेळाडून मुंबईच्या टीममध्ये एंट्री करणार आहे. वाचा सविस्तर…..

  • 14 Mar 2023 12:33 PM (IST)

    जुन्या पेन्शनसाठी अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे तब्बल 9 हजार कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी

    जिल्हा परिषद समोर निदर्शने करत केली जुन्या पेन्शन योजनेची मागणी

    जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

    जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका

  • 14 Mar 2023 12:32 PM (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात हिंदू महासंघाची सह्यांची मोहीम

    सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात हिंदू महासंघाची सह्यांची मोहीम

    18 लाख कर्मचाऱ्यांच्या स्वार्थपेक्षा 11 कोटी जनतेचा विचार जास्त आवश्यक आहे

    सरकारने या दबावाखाली बळी पडून वर्षाला 55, 000 कोटीच्या वाढीव कर्जात राज्याला ढकलू नये ही हिंदू महासंघाची भूमिका

    आपल्याला पेन्शन मिळणार नाही याची कल्पना असून तसं लिहून देऊन नोकरी स्विकारल्यानंतर हा दबाव बेकायदेशीर आहे

    हिंदू महासंघाच्यावतीने शनीपार चौकात सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे

  • 14 Mar 2023 12:11 PM (IST)

    नवी मुंबई महानगरपालिका CBSE शाळांतील नर्सरीच्या वर्गातील प्रवेशासाठी वयोमर्यादा जाहीर

    नवी मुंबई महानगरपालिका CBSE शाळांतील नर्सरीच्या वर्गातील प्रवेशासाठी वयोमर्यादा जाहीर

    नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे, सेक्टर-11 व नेरूळ, सेकटर-50 या ठिकाणी सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा सुरु आहेत

    या शाळांमध्ये सन 2023-24 साठी नर्सरी वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांचेकडील दि. 19 जानेवारी 2023 रोजीच्या पत्रानुसार नर्सरी प्रवेशाकरिता 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत जन्म झालेल्या मुलांना म्हणजेच दि. 31 डिसेंबर 2023 रोजीचे किमान वय 3 वर्षे व कमाल वय 4 वर्षे 5 महिने 30 दिवस असलेल्या मुलांना प्रवेश देण्यात येईल.

  • 14 Mar 2023 12:07 PM (IST)

    जुन्या पेंशन योजनेसाठी शिक्षक आक्रमक

    छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शिक्षकांनी पेंशन साठी पुकारला संप,

    संप पुकारून सर्व शिक्षकांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने सुरू,

    शेकडो शिक्षक निदर्शनात सहभागी.

  • 14 Mar 2023 11:17 AM (IST)

    पाडव्यापूर्वीच सोने चांदीच्या भाव वाढीची गुढी

    किंमती वधारल्याने खरेदीदारांना फुटला घाम

    गेल्या महिन्याभरापासून दरात नव्हती मोठी वाढ

    सोमवारपासून सोन्याने घेतली हजार रुपयांची उडी

    चांदीच्या किंमतीत पण मोठी वाढ, गुंतवणूकदार हैराण, वाचा बातमी 

  • 14 Mar 2023 11:05 AM (IST)

    शीतल म्हात्रे व्हायरल व्हीडिओ प्रकरणी दोन आरोपींना न्यायालयात हजर करणार

    शीतल म्हात्रे व्हायरल व्हीडिओ प्रकरणी दहिसर पोलीस आज दोन आरोपींना न्यायालयात हजर करणार आहेत.

    पहिला आरोपी साईनाथ दुर्गे आणि दुसरा अक्षय धंदर आहे.

    अक्षय धंदरला काल पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

    अक्षय धनगरवर आरोप त्यांनी शीतल म्हात्रे यांचा व्हीडीओ शिवसेनेच्या ग्रुपमध्ये व्हायरल केला होता.

  • 14 Mar 2023 10:46 AM (IST)

    IND vs AUS : ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी, मोठा खेळाडू ODI सीरीजमधून OUT

    IND vs AUS : ऑस्ट्रेलियासाठी मोठा झटका. वाचा सविस्तर….

  • 14 Mar 2023 10:35 AM (IST)

    जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप

    जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप

    जिल्ह्यातील जवळपास 25 हजार कर्मचारी संपात सहभागी असल्याचा दावा

    नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या समोर नर्सिंग असोसिएशन तर्फे घोषणाबाजी

    जिल्ह्यातील साडेपाचशे नर्सिंग कर्मचारी सहभागी असल्याचा दावा

    नर्सिंग असोसिएशन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

  • 14 Mar 2023 10:23 AM (IST)

    महागाईच्या आघाडीवर थोडाफार दिलासा

    अन्नधान्यासह भाजीपाल्याच्या किंमती आटोक्यात

    खाद्यतेलाही आता झाले स्वस्त

    तरीही आरबीआय रेपो दरात का करणार वाढ

    नेमकी कुठे माशी शिंकतेय, पुन्हा का पडणार महागाईचा मार, वाचा बातमी 

  • 14 Mar 2023 09:42 AM (IST)

    Body Building : रोज जीममध्ये 7 तास, घर संसार संभाळून वयाच्या 41 व्या वर्षी चॅम्पियन बनली दोन मुलांची आई

    शरीरातील थायरॉइड आणि बॉडी बिल्डिंगचा काय संबंध? वाचा तिची थक्क करुन सोडणारी गोष्ट. वाचा सविस्तर…..

  • 14 Mar 2023 09:42 AM (IST)

    Team india : Sanju Samson ला पुन्हा दिला झटका, BCCI कडून अशी अपेक्षा नव्हती

    Team india : बीसीसीआयने असं करायला नको होतं. वाचा सविस्तर….

  • 14 Mar 2023 09:37 AM (IST)

     केंद्रीय पुरातत्व विभागाच पथक कोल्हापुरात

    केंद्रीय पुरातत्व विभागाच पथक कोल्हापुरात

    करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची करणार पाहणी

    अंबाबाईच्या मूळ मूर्तीची झीज झाल्याचं काही दिवसांपूर्वीच आलं होतं समोर

    राज्य पुरातत्व विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीनंतर दिला होता अहवाल

    अहवाला नंतर आता केंद्रीय पुरातत्व विभाग करणार मूर्तीची पाहणी

  • 14 Mar 2023 09:35 AM (IST)

    अदानी समूहातील गुंतवणूकीचा फायदा होणार

    एलआयसीचा किती नफा किती तोटा

    अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचा दावा काय

    प्रत्यक्षात एलआयसीला किती झाला फायदा

    ही गुंतवणूक फायदेशीर की भविष्यात ठरु शकते ताप

    विरोधकांच्या दाव्यात किती सच्चाई, वाचा बातमी 

  • 14 Mar 2023 09:25 AM (IST)

    पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग परिसरात शुकशुकाट

    बिल्डिंग परिसरात बंदचे पोस्टर्स लावण्यात आलेत

    या सेंट्रल बिल्डिंगमध्ये सर्व सरकारी कार्यालये

    इतर वेळी कर्मचाऱ्याची या परिसरात गर्दी पाहायला मिळते

  • 14 Mar 2023 09:23 AM (IST)

    कोल्हापूरमधील विशाळगडावर शिवप्रेमींकडून मद्यपींना चोप

    कोल्हापूरमधील विशाळगडावर शिवप्रेमींकडून मद्यपींना चोप

    पोलीस बंदोबस्त असताना दारू नेणाऱ्या दोघांना चोपलं

    पोलिसांच्या समोरच दारूची वाहतूक करण्याचा प्रकार

    शुक्रवारी 10 मार्च रोजीचा प्रकार

    गडाच्या पायथ्याला चेक पोस्ट करण्याची गडप्रेमीची मागणी

    दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

  • 14 Mar 2023 09:05 AM (IST)

    अमरावती : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संप

    शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुद्दत संपाचा रुग्णसेवेला बसणार मोठा फटका

    जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीसमोर आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

    अमरावती शहरातील मोठे 4 रुग्णालय व ग्रामीण भागातील 13 रुग्णालयातील कर्मचारी संपावर

    रुग्णालयातील जवळपास 1 हजार शासकीय आरोग्य कर्मचारी आजपासून संपावर

    आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडणार

    जिल्ह्यातून उपचारासाठीसाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणार

  • 14 Mar 2023 08:57 AM (IST)

    लॉंग मार्च आंदोलक आणि मुख्यमंत्र्यांसोबर होणारी आजची बैठक रद्द

    नाशिक : आजची बैठक उद्या वर ढकलली,

    आदिवासींच्या लॉंग मार्च चा आजचा तिसरा दिवस,

    थोड्याच वेळात लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघणार,

    अंबेबहुला गावातून आज पुढे निघणार लॉंग मार्च.

  • 14 Mar 2023 08:44 AM (IST)

    वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या इंधनाचा भाव

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव घसरले

    देशात पेट्रोल-डिझेल झाले का स्वस्त

    कर कपातीकडे नागरिकांनी लावले डोळे

    इंधन कपातीचा दिलासा मिळणार तरी कधी, वाचा बातमी 

  • 14 Mar 2023 08:19 AM (IST)

    IND vs AUS : BCCI विरुद्ध ICC इंदोरच्या पीचवरुन जुंपली, ICC समोर ठेवली मोठी मागणी

    किती डिमेरिट पॉइंट्स दिले? नियम काय सांगतो? वाचा सविस्तर….

  • 14 Mar 2023 08:18 AM (IST)

    Ravindra jadeja ड्रेसिंग रुममध्ये कोणाशीच बोलला नाही, प्लेयर ऑफ द सीरीज बनूनही मोडलं मन

    IND vs AUS : काय झालं रवींद्र जाडेजाच? टेस्ट मॅच संपल्यानंतर तो कोणाशीच का बोलला नाही? वाचा सविस्तर….

  • 14 Mar 2023 08:11 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका

    एका आठवड्यात दुसऱ्यांदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका

    अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

    कापणीसाठी आलेला गहू, हरभरा ज्वारी, केळी, पपई, टरबूज पिकांना मोठा फटका

    पथारीवर टाकलेली मिरची काही प्रमाणात पाण्यात भिजल्याने खराब होण्याची शक्यता

  • 14 Mar 2023 08:09 AM (IST)

    नागपुरातील काही शाळांमध्ये संपाचा परिणाम

    नागपुरातील काही शाळा, महाविद्यालयातील शिक्षक संपात सहभागी

    शिक्षक शाळेत आलेत, पण विद्यार्थ्यांना शिकवणार नाही

    जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचे कामबंद आंदोलन

    नागपूर मनपाच्या काही शाळा आणि अनुदानित शाळांमध्ये संपाचा परिणाम

  • 14 Mar 2023 07:55 AM (IST)

    मराठवाड्यातील सर्वात मोठ्या घाटी रुग्णालयातील 800 नर्स जाणार संपावर

    घाटी रुग्णालयातील 800 नर्स रुग्णालयातील ओपन स्पेसवर जमल्या एकत्र

    राज्य सरकार विरोधात नर्सेसची जोरदार घोषणाबाजी सुरू

    800 नर्सेस संपावर गेल्यामुळे घाटी रुग्णालयाला जबरदस्त फटका

    संपूर्ण मराठवाड्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडणार

  • 14 Mar 2023 07:54 AM (IST)

    राज्यातील सुमारे १७ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

    ब्रेक – राज्यातील सुमारे १७ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जात आहेत.

    या संपामुळे शासकीय रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, नगरपालिका, जिल्हा परिषदा, तहसीलदार कार्यालये, यासह अनेक सरकारी विभागांचे कामकाज जवळपास ठप्प होणार आहे.

  • 14 Mar 2023 07:47 AM (IST)

    आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पाथर्डी शहर बंद

    अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पाथर्डी शहर बंद

    व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई करवी शिवप्रेमींची मागणी

    तर घटनेच्या निषेधार्थ आज पाथर्डी बंदचे शिवप्रेमींकडून अहवान

  • 14 Mar 2023 07:08 AM (IST)

    17 किंवा 18 मार्चला अमरावती शहर बस पुन्हा रत्यावर धावण्याची शक्यता.

    अमरावती ब्रेकिंग : कंत्राट रद्द झाल्याने 1 मार्च पासून आहे अमरावती शहर बस बंद,

    मागील 14 दिवसांपासून शहर बस बंद असल्याने अमरावती शहर वासीयांचे प्रचंड हाल,

    पूर्वीच्या कंत्राटदाने 80 लाख थकवल्याने मनपाने केला कंत्राट रद्द.

  • 14 Mar 2023 06:38 AM (IST)

    औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर करण्यात आल्याच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा

    हजारोंच्या संख्येने मनसे काढणार छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा

    खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजी नगर नावाला विरोध करत पुकारलेल्या आंदोलनाला असेल मनसेचा उत्तरमोर्चा

    16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता निघणार मनसेचा मोर्चा

    संस्थान गणपती ते विभागीय आयुक्त कार्यालय असा असेल मोर्चाचा मार्ग

  • 14 Mar 2023 06:32 AM (IST)

    राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी संपावर

    कर्मचारी संपावर गेल्याने सरकारी कार्यालयासह प्रशासकीय कामकाजावर ताण येण्याची शक्यता

    जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर कर्मचारी संपावर

    शिंदे- फडणवीस यांच्या बैठकीतही जुन्या पेन्शनवर तोडगा नाही

    प्रशानाचं संप मागे घेण्याचं आवाहन कर्मचाऱ्यांनी धुडकावून लावलं

  • 14 Mar 2023 06:20 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेतील 20 टक्के विद्यार्थी निरक्षर

    जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेकडून केलेल्या पडताळणीतून धक्कादायक माहिती उघड

    जिल्ह्यात प्रथामिक शिक्षणाची गुणवत्ता ढासळली

    पुणे जिल्ह्यातील 653 शाळेतील 20 टक्के विद्यार्थांना वाचन करता येत नसल्याची माहिती

    विशेष अभ्यासक्रमाद्वारे गुणवत्ता सुधारण्याचे मुख्यधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश

  • 14 Mar 2023 06:16 AM (IST)

    पुण्यातील भोर नगरपालिकेच्या विरोधात प्रहार अपंग क्रांती संघटना आक्रमक

    अपंगांसाठी तरतूद असलेला 5% निधी अपंगांवर खर्च करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी, पालिकेच्या कारभाराविरोधात प्रहार अपंग क्रांती संघटनेचं काल आंदोलन

    पालिकेसमोर ठिय्या मांडत आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी केली

    आंदोलकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जाब

    नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळीकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे

  • 14 Mar 2023 06:14 AM (IST)

    राज्य सरकारच्या मध्यवर्ती कर्मचारी संघटना संपावर ठाम

    जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी आजपासून संपावर जाण्याचा कर्मचाऱ्यानी इशारा दिलाय

    राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनांनी एक बैठक घेऊन संपावर कायम राहण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केलंय

  • 14 Mar 2023 06:11 AM (IST)

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार, कधीही अटक होण्याची शक्यता

    इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक लाहौरला पोहोचलं

    सोमवारी इम्रान खान यांच्या हजारो समर्थकांनी अटकेविरोधात मार्च काढला होता

    या हजारो समर्थकांनी फुलांचा वर्षाव करत इम्रान खान यांचं स्वागत केलं होतं

Published On - Mar 14,2023 6:06 AM

Follow us
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.