VIDEO | इंग्लिशमध्ये सांगू की… एका मिनिटात मस्ती उतरवेल; खासदार हेमंत पाटील यांची तहसीलदाराला दमबाजी

माणसं राहतात ना इथे. काय करता तुम्ही माणसांसाठी? प्रत्येकवेळी कायद्याची चौकट सांगता. लोकांसाठी आहोत आपण एवढं लक्षात ठेवा. काय या काय...? काल तुम्हाला मुख्यमंत्री बोलत असताना काय तुम्ही शहाणपणा करत होता.

VIDEO | इंग्लिशमध्ये सांगू की... एका मिनिटात मस्ती उतरवेल; खासदार हेमंत पाटील यांची तहसीलदाराला दमबाजी
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 10:51 AM

हिंगोली | 26 जुलै 2023 : शेतकऱ्यांच्या सममस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तहसीलदाराला शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी चांगलेच खडसावले. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या. त्यांच्या समस्यांकडे कानाडोळा करू नका. तुम्हाला हे कितीवेळा सांगायचं? आता हे इंग्लिशमध्ये सांगू की वेगळ्या पद्धतीने? कशाची चरबी आली रे तुला? एका मिनिटात तुझी मस्ती उतरवेल, अशी दमबाजीच खासदार हेमंत पाटील यांनी या तहसीलदाराला केली. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसमोरच पाटील यांनी तहसीलदाराला खडेबोल सुनावले. त्यांचा हा दमबाजी करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

हिंगोलीत पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेममंत पाटील हे माहुर तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी शेतशिवाराची पाहणी केली. यावेळी माहुरचे तहसीलदार किशोर यादव यांच्याबाबत शेतकऱ्यांनी प्रचंड तक्रारी केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन पाटील यांनी थेट किशोर यादव यांनाच गाठले. यावेळी पाटील यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या सर्वांसमोरच हेमंत पाटील यांनी यादव यांचा पाणउतारा केला आणि त्यांना दमबाजी केली. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ते तहसीलदार यादव यांना सुनावताना दिसत आहेत.

ब्रिटिशांची औलाद आहात काय?

या लोकांच्या तक्रारीची दखल तुम्ही कधी घेतली? इंग्लिशमध्ये सांगू की वेगळ्या पद्धतीने सांगू? 100 लोकांच्या तक्रारी आहेत तुमच्याबद्दल. नीट राहा आणि नीट लोकांचं काम करा. मस्ती येऊ देऊ नका अंगात. एका मिनिटात मस्ती उतरवेन मी. सगळे लोकं तक्रारी करतात तुमच्याविरोधात. कुठली चरबी आली हो? लंडनहून शिकून आलात? इंग्रजांची औलाद आहात का? असा शब्दात हेमंत पाटील यांनी यादव यांना सुनावले.

हे सुद्धा वाचा

जास्त मस्ती आणि चरबी आहे तुम्हाला

माणसं राहतात ना इथे. काय करता तुम्ही माणसांसाठी? प्रत्येकवेळी कायद्याची चौकट सांगता. लोकांसाठी आहोत आपण एवढं लक्षात ठेवा. काय या काय…? काल तुम्हाला मुख्यमंत्री बोलत असताना काय तुम्ही शहाणपणा करत होता. कुठली चरबी आली तुम्हाला एवढी? दोन दिवसाच्या आत सर्व लोकांना मदत झाली पाहिजे. वेगळ्या पद्धतीने सांगण्याची वेळ येऊ देऊ नका. मी दोन तीनदा तुम्हाला ऑब्झर्व्ह केलंय. जास्त मस्ती आणि जास्त चरबी आहे तुम्हाला, असा दमही त्यांनी यादव यांना भरला.

समजून घ्या घुसायचं

यादव फोन उचलत नसल्याची तक्रारही कार्यकर्त्यांनी केली. त्यावरूनही त्यांनी फोन का उचलत नाही? का उचलत नाही? काय अडचण आहे? काय काम असतं? अरे 24 तास बिझी असतो का? मला सांगतो का? 40 वर्ष झाले हाच धंदा करतो. ये नाही आला ना, समजून घ्या घुसायचं. असंही ते म्हणाले.

मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.