Palghar Murder : पालघरमध्ये जमिन आणि पैशाच्या वादातून इसमाची हत्या

डहाणू तलासरी मार्गावरील आंबेसरी जवळील बहारे डोंगरीपाडा पुलाखाली बुधवारी दुपारी हत्या करून मृतदेह टाकण्यात आला होता. तलासरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

Palghar Murder : पालघरमध्ये जमिन आणि पैशाच्या वादातून इसमाची हत्या
पालघरमध्ये जमिन आणि पैशाच्या वादातून इसमाची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 12:11 AM

पालघर : जमिन व्यवहार व पैशाच्या वादातून 43 वर्षीय इसमाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील डहाणूमध्ये घडली आहे. गिरीश जयंतीलाल पटेल असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी तलासरी पोलिस (Talasari Police) ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तलासरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात दोन आरोपींना ताब्यात घेतले. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. (Murder of a man in a land and money dispute in Palghar)

दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डहाणू तलासरी मार्गावरील आंबेसरी जवळील बहारे डोंगरीपाडा पुलाखाली बुधवारी दुपारी हत्या करून मृतदेह टाकण्यात आला होता. तलासरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात करत मृतदेहाची ओळख पटवली. तसेच पोलिसांनी वेगाने तपास करीत दोघांना ताब्यात घेतले.

पिंपरी चिंचवडमध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

हिंजवडीत मुळा नदीत चार महिन्यापूर्वीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह महिलेचा असल्याचे हिंजवडी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अंगावर गाऊन परिधान केल्यान तो महिलेचा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालंय. अंदाजे चार ते पाच महिन्यांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. प्रथमदर्शनी आत्महत्या केल्याचं दिसून येतं, मात्र तसा कोणताही पुरावा तिथं आढळून येत नाहीये. त्यामुळे ही हत्या असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. (Murder of a man in a land and money dispute in Palghar)

इतर बातम्या

नागपूर पोलिसांकडून अल्पवयीन चोराला अटक, दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Virar Worker Death : विरारमध्ये तिसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड मारताना मजुराचा पडून मृत्यू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.