Tv9 मराठीचे नांदेडचे प्रतिनिधी राजीव गिरी उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्काराने गौरवित
'टीव्ही 9 मराठी'चे नांदेडचे प्रतिनिधी राजीव गिरी यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल पुरस्कार देवून गौरवण्यात आलं आहे.
नांदेड : ‘टीव्ही 9 मराठी’चे नांदेडचे प्रतिनिधी राजीव गिरी यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल पुरस्कार देवून गौरवण्यात आलं आहे. राजीव गिरी हे ‘टीव्ही 9 मराठी’चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालत निर्भिडपणे पत्रकारिता केली. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आलं आहे.
राजीव गिरी यांना नांदेडच्या दुर्गादास सराफ प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठित अशा पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. संबंधित पुरस्कार सोहळा हा कंधार इथे पार पडला. राजीव गिरी यांना यावेळी उकृष्ठ पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आलं.
यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. विशेष म्हणजे पत्रकारिता क्षेत्रातील आणखी काही दिग्गज पत्रकारांना यावेळी गौरवण्यात आलं. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार विलास आठवले, रवींद्र तहकीक यांचादेखील समावेश आहे. पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज पत्रकारांच्या गौरवाच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावलेली होती.
दरम्यान, आपल्याला उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आल्याने राजीव गिरी यांनी दुर्गादास सराफ प्रतिष्ठानचे आभार मानले आहेत. या पुरस्काराने गौरवण्यात आल्याने राजीव गिरी यांना आणखी चांगलं काम करण्यासाठी स्फुर्ती मिळाली आहे. ‘टीव्ही 9 मराठी’च्या संपूर्ण परिवाराकडूनही राजीव गिरी यांचं या निमित्ताने अभिनंदन करण्यात आलं आहे.