Nanded School| नांदेडमध्ये आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु, जिल्ह्यातल्या कॉलेजची स्थिती काय?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नांदेडमधील महाविद्यालये 8 जानेवारी रोजी बंद करण्यात आली होती. आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून म्हणजेच उद्यापासून नांदेडमधील महाविद्यालये सुरु करण्यात येणार आहेत.

Nanded School| नांदेडमध्ये आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु, जिल्ह्यातल्या कॉलेजची स्थिती काय?
नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा फक्त सकाळीच भरतील. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 11:29 AM

नांदेडः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर ओसरत असल्यामुळे नांदेडमधील शाळा (Nanded School) टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याची प्रक्रिया वेग घेत आहे. कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात (Effect on Education) मोठा व्यत्यय आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत औरंगाबादनंतर नांदेड (Nanded Corona) आणि लातूरमधील पॉझिटिव्हिटी रेटही विक्रमी संख्येवर पोहोचला होता. मात्र आता विषाणी संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्रशासनानेही सोमवारपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पहिली ते चौथीसाठी 7 फेब्रुवारीचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे.

24 जानेवारीपासून टप्प्या-टप्प्याने सुरु

नांदेड जिल्ह्यात 24 जानेवारीपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. त्यामुळे इतर माध्यमांच्या शाळा सुरु करण्याबाबत मागणी पुढे येत होती. त्यातच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 29 जानेवारी रोजी काढलेल्या आदेशानुसार, 31जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. तर 7 फेब्रुवारीपासून पहिली ते चौथीचे वर्गही भरणार आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शाळा सुरु झाल्या असल्या तरीही कोरोना संबंधी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. शाळेत मास्त, सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे. तसेच 15 ते 18 वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे लागणार आहे.

नांदेडमधील महाविद्यालयांची स्थिती काय?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नांदेडमधील महाविद्यालये 8 जानेवारी रोजी बंद करण्यात आली होती. आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून म्हणजेच उद्यापासून नांदेडमधील महाविद्यालये सुरु करण्यात येणार आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये सुरु होतील. कॉलेजमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्र परीक्षांना 8 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ही परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. कॉलेज सुरु झाल्यानंतर आठच दिवसात विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होत आहे.

इतर बातम्या-

VIDEO : महाराष्ट्रात BJP ची मुख्यमंत्री कधीच होणार नाही, Shivsena खासदार Sanjay Raut यांची टीका

तुम्ही प्रवेश बंदीचा निर्णय घेता, पण आमचं जगणं मुश्किल होतं; रत्नागिरी जिल्ह्यात कोल्हापूरातील व्यापाऱ्यांना प्रवेश बंदी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.