गाडलाच…! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व; 19 पैकी 11 जागा जिंकल्या; ‘आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय’ भाजपचा जल्लोष

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. 19 पैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत.

गाडलाच...! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व; 19 पैकी 11 जागा जिंकल्या; 'आता कसं वाटतंय... गार गार वाटतंय' भाजपचा जल्लोष
Sindhudurg district bank election
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 2:49 PM

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. 19 पैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. अजून मतमोजणी सुरू असून इतर जागा कुणाच्या पारड्यात जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, जिल्हा बँकेवर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. या विजयानंतर राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केली आहे. आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय… अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी द्यायला सुरुवात केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या 19 पैकी 14 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर 5 जागा महाविकास आघाडीला जिंकता आल्या आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

तेली पराभूत

या निवडणुकीत भाजपची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांचा सुशांत नाईक यांनी पराभव केला आहे. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत.

खणखणीत नाणे, नारायण राणे

भाजपच्या हाती जिल्हा बँक येताच राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खणखणीत नाणे, नारायण राणे आणि आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय… अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. तर काही जणांनी नितेश राणेंचे फोटोही व्हायरल केले आहे. या फोटोवर गाडलाच असं लिहिलं आहे.

गाडलाच… नितेश यांची पहिली प्रतिक्रिया

नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांना ते सापडून आलेले नाहीत. मात्र, आज त्यांनी एक फेसबूक पोस्ट करून विजयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नितेश यांनी त्यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यावर गाडलाच असं लिहिलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

निकाल काय?

भाजपचे प्रकाश बोडस विजयी भाजपचे दिलीप रावराणे विजयी भाजपचे मनीष दळवी विजयी भाजपचे महेश सारंग विजयी भाजपचे अतुल काळसेकर विजयी भाजपचे विठ्ठल देसाई विजयी भाजपचे बाबा परब विजयी भाजपचे समीर सावंत विजयी भाजपचे गजानन गावडे विजयी

महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी महाविकास आघाडीचे गणपत देसाई विजयी महाविकास आघाडीचे विद्याप्रसाद बांदेकर विजयी

संबंधित बातम्या:

संतोष परब हल्लाप्रकरणातील संशयित मनिष दळवी विजयी, राजन तेली पराभूत; भाजपचा 8 तर महाविकास आघाडीचा 5 जागांवर विजय

राजकारणासाठी मोदी शिवाजी महाराजांचे नाव घेतात, मग बेळगावमध्ये तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा का ? संजय राऊतांचा हल्ला

Election: मार्च महिन्यात राज्यातील 18 महापालिकांची निवडणूक, मुंबई आणि औरंगाबादची प्रक्रिया लांबणीवर?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.