VIDEO: हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके जायेंगे; एकनाथ खडसेंचा भाजप नेत्यांना इशारा
हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, अशा शायराना अंदाजात एकनाथ खडसे यांनी विरोधकांना इशारा दिला. (ncp leader eknath khadse slams bjp from shayari)
जळगाव: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, अशा शायराना अंदाजात एकनाथ खडसे यांनी विरोधकांना इशारा दिला.
जळगावात एका कार्यक्रमाला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, काय राहिलं आता आयुष्यात सत्तराव्या वर्षी. कशासाठी? कशासाठी हे लोकं बदनामी करत आहेत, असा सवाल खडसे यांनी केला.
ईडीला घाबरत नाही
यावेळी त्यांनी ईडीचा विषय पुन्हा एकदा छेडला. आता ईडीचा विषय संपला आहे. त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही. आता प्रकरण कोर्टात आहे. मी फक्त कोर्टाला घाबरतो, असं त्यांनी सांगितलं. काहीही एक संबंध नसताना माझ्या जावयाला यांनी आत टाकले. आज मी ज्या पक्षांमध्ये आहे तो पक्ष राष्ट्रवादी माझ्या पाठीमागे खंबीर पणे उभा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
खडसेंच्या अडचणीत वाढ
दरम्यान, खडसे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिल्याने खडसे यांच्या अडचणीत पुन्हा चांगलीच वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांच्या विरोधात दाखल केलेल्या पोलीस तक्रारीची कुठलीही दखल पोलीस घेत नसल्याने याबाबत अंजली दमानिया यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून खडसे यांच्याबाबत कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
खडसे यांनी 2 सप्टेंबर 2017 रोजी मुक्ताईनगर येथे आपल्या वाढदिवसा प्रसंगी बोलताना दमानिया यांना उद्देशून वक्तव्य केले होते. या प्रकरणी 7 सप्टेंबर 2017 रोजी विक्रोळी दमानिया यांनी विक्रोळी पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान कुठलीही कार्यवाही होत नसल्याने दमानिया यांनी 27 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दिली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणाची दखल घेत जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांना खडसे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
संबंधित बातम्या:
ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झाले, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार?, फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच; नाथाभाऊंचा गंभीर आरोप
ठाण्यात उद्यापासून शाळा सुरू होणार; जिल्हाधिकारी म्हणतात, मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करा
(ncp leader eknath khadse slams bjp from shayari)