जठार यांच्यापाठोपाठ निलेश राणे म्हणाले, दिसेल तिथे संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू

भाजप नेते प्रमोद जठार यांच्यापाठोपाठ भाजप नेते निलेश राणे यांनीही राऊत यांचा दिसेल तिथे करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा दिला आहे. (nilesh rane)

जठार यांच्यापाठोपाठ निलेश राणे म्हणाले, दिसेल तिथे संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू
माजी आमदार निलेश राणे, शिवसेना खासदार संजय राऊत
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 4:12 PM

सिंधुदुर्ग: शिवसेना नेते आणि संजय राऊत आणि राणे पितापुत्रांदरम्यान सुरू असलेलं शाब्दिक युद्ध अद्याप थांबलेलं नाही. भाजप नेते प्रमोद जठार यांच्यापाठोपाठ भाजप नेते निलेश राणे यांनीही राऊत यांचा दिसेल तिथे करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा दिला आहे. (nilesh rane attacks sanjay raut over jan ashirwad yatra)

निलेश राणे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हा धमकी वजा इशारा दिला. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिला होता. त्यावर पलटवार करताना करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय? असा सवाल करतानाच संजय राऊत बोगस माणूस आहे. आम्ही जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

राऊतांना आव्हान

शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही. जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच, असा दावाही त्यांनी केला. शिवसेनेकडे आचार-विचार राहिले नाहीत केवळ शिवसेना अडवा अडवीची काम करते. आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही. संजय राऊत यांनी एकदा आमच्या गर्दीत उभ रहावं आणि मग साहेबांचे विचार काय आहेत ते पहावे असे थेट आव्हानही त्यांनी दिले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी नारायण राणे यांची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता याची पुष्टी देखील त्यांनी केली.

ते काहीच करू शकले नाही

केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यावरूनही निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. राणेंना अटक करायला सगळी यंत्रणा कामाला लागली. मात्र काही करू शकले नाहीत. एक दिवस तरी त्यांना ठेवायचं होतं, असं ते म्हणाले.

यात्रा अडवण्याची धमक नाही

भाजप नेते प्रमोद जठार यांनीही राऊतांवर टीका केली होती. शिवसेनेच्या दोन राऊतांना खूप उत आला आहे. त्यांचा लवकरच कार्यक्रम करू, असा इशारा जठार यांनी दिला होता. राणेंच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राणेंच स्वास्थ उत्तम आहे. आता लवकरचं विरोधकांचं स्वास्थ्य बिघडवतील. भाजपची यात्रा अडवण्याची धमक कोणामध्ये नाही, असंही ते म्हणाले. (nilesh rane attacks sanjay raut over jan ashirwad yatra)

संबंधित बातम्या:

नारायण राणेंचं कुणकेश्वराच्या साक्षीने औक्षण, उत्तम आरोग्यासाठी मंत्रपठण

VIDEO: शिवसेना-भाजपमध्ये कोण दुरावा निर्माण करतंय?; संजय राऊतांकडून पहिल्यांदाच नाव जाहीर

Video : नारायण राणेंना भर सभेत संरक्षणमंत्र्यांचा फोन, राणे म्हणाले, ‘उन्होंने हवा कर दी सर’

(nilesh rane attacks sanjay raut over jan ashirwad yatra)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.