Omicron Patient In Akola | अकोला जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, दुबईहून आलेल्या महिलेला लागण, उपचार सुरु
मागील काही दिवसांपासून राज्यात ओमिक्रॉनग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरुवातीला डोंबिवली तसेच पुणे शहरापर्यंत असलेला संसर्ग आता औरंगाबाद तसेच अकोला जिल्ह्यातपर्यंत पसरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 25 डिसेंबर रोजी दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता अकोला जिल्ह्यातदेखील एका महिलेला ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या रुपाची लागण झाली आहे.
अकोला : मागील काही दिवसांपासून राज्यात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरुवातीला डोंबिवली तसेच पुणे शहरापर्यंत असलेला संसर्ग आता औरंगाबाद तसेच अकोला जिल्ह्यातपर्यंत पसरला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 25 डिसेंबर रोजी दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता अकोला जिल्ह्यातदेखील एका महिलेला ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या रुपाची लागण झाली आहे. ही महिला 18 डिसेंबरला दुबईहून अकोला जिल्ह्यात दाखल झाली होती. खबरदारी म्हणून या महिलेची कोरोना चाचणी तसेच जिनोम सिक्वेंसिंग करण्यात आले होते. त्यानंतर अहवाल समोर आल्यानंतर या महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या महिलेला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले असून उपचार सुरु आहेत.
अकोला जिल्ह्यात सहा कोरोना रुग्णांवर उपचार
अकोला जिल्ह्यात आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आजच एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अकोल्यात सध्या 6 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. राज्यातील 31 पैकी 27 रुग्णांचं निदान एकट्या मुंबईत झालं आहे.
राज्यात ओमिक्रॉनची स्थिती काय ?
राज्यात आज ओमिक्रॉनग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.दिवसभरात 31 रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक रुग्णांची म्हणजेच 27 रुग्णांची नोंद झाली आहे. ठाण्यात 2, पुणे ग्रामीण 1 आणि अकोला जिल्ह्यात 1 रुग्ण अशी ओमिक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आलीय. आतापर्यंत राज्यात 141 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 61 रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे.
मुंबईतही रुग्णवाढ, चिंता वाढली
दरम्यान, गेल्या 24 तासात मुंबईतील कोरोना रुग्णवाढही चिंताजनक मानली जाते आहे. बीएमसीनं दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 922 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण 326 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे एकूण 4295 सक्रिय रुग्ण आहेत.
इतर बातम्या :