AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारागाड्या ओढताना असं कधीच घडलं नव्हतं, जल्लोष सुरू होता… समतोल बिघडला अन् मोठा….

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. बारागाड्याचा समतोल गेल्याने झालेल्या दुर्घटनेत एकजण ठार झाला आहे. तर सहा ते सात जण जखमी झाले आहेत. जखमींना रावेर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बारागाड्या ओढताना असं कधीच घडलं नव्हतं, जल्लोष सुरू होता... समतोल बिघडला अन् मोठा....
Cart raceImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 24, 2023 | 8:44 AM
Share

रावेर : जळगाव जिल्ह्यातील रावेर बारागाड्या ओढतानाच्या कार्यक्रमात मोठा थरार पाहायला मिळाला. बारागाड्या ओढत असताना समतोल बिघडल्याने या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर सहा ते सातजण गंभीर जखमी झाले. त्यामुळेएकच खळबळ उडाली आहे. ऐन उत्साह भरात असतानाच ही दुर्देवी घटना घडली. रावेरमध्ये यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. पहिल्यांदाच असा प्रकार घडला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बारागाड्यांवर 10 ते 12 जण उभे होते. गाडीवर भगवा झेंडा लावला होता. गाडीच्या पुढे आणि मागे लोक धावत होते. तर गाड्याच्या दुतर्फा लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. जल्लोषात बारागाड्या ओढल्या जात होत्या. प्रचंड स्पीडने या गाड्या ओढल्या जात असतानाच अचानक बारागाड्यांचा समतोल बिघडला. त्यामुळे बारागाड्यांचं चाक निखळलं अन् या बारागाड्यांखाली दबून एका 70 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. दिनकर रामकृष्ण जैतकर असं या व्यक्तिचं नाव आहे. या दुर्घटनेत 6 ते 7 जण जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हे सातही जण गंभीर असल्याचं सांगितलं जातं.

जखमींची नावे

गाड्या ओढत असताना झालेल्या दुर्घटनेत दिनकर रामकृष्ण कोळी, मंगलाबाई प्रकाश भिल, सुभाष भील, ईश्वर भील, नामदेव भील, किशोर हरी, मोहन एकनाथ महाजन, सुनील महाजन, नारायण महाजन आदी जखमी झाले आहेत. या सर्वांना रावेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रावेरमध्ये नयनरम्य कार्यक्रम

रावेर शहरात अक्षय्य तृतीयेनिमित्त बारागाड्या ओढण्याचा नयनरम्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. रावेर शहरात अक्षय्य तृतीयेनिमित्त ऐतिहासिक असलेली बारागाड्यां ओढण्याची परंपरा आजही कायम ठेवलीआहे. अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला विधिवत पूजा करून हजारो भाविकांच्या उपस्थितीत बारागाड्या ओढण्यात आल्या. मुंजोबा महाराज की जयच्या जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज महाद्वाराजवळ मोठा जल्लोष करण्यात आला.

धुळ्यात जल्लोष

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील ऐचाळे येथे काळ भैरव यात्रा उत्सव साजरा झाला. यावेळी दरवर्षीप्रमाणे बारागाड्यांची लांगड ओढण्यात आली. ऐचाळे येथील या बहिरम देवाची यात्रा फार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ही यात्रा भरवण्यात येते. या यात्रेत बारागाड्यांची लांगड ओढली जाते. यात्रेनिमित्त सर्व चाकरमानी आपल्या गावी परततात आणि यात्रेचा आनंद घेतात. यात्रेनिमित्त खेळणी ची दुकाने आणि खाद्यपदार्थांचे दुकानानाची रेलचेल पाहायला मिळाली.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.