ठाकरे गटाची ऑफर स्वीकारणार का? फडणवीसांच्या कार्यक्रमात का दिसत नाही?; पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या मनात खदखद…

ग्रामविकास मंत्री असताना पंकजा यांनी मोठं काम केलं. त्या राष्ट्रीय सचिव म्हणून त्या काम करत आहेत. त्यांच्यावर मध्यप्रदेशची जबाबदारी आहे. त्यांचं नेतृत्व मोठं आहे.

ठाकरे गटाची ऑफर स्वीकारणार का? फडणवीसांच्या कार्यक्रमात का दिसत नाही?; पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या मनात खदखद...
pankaja munde Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 9:18 AM

बीड: ठाकरे गटाकडून शिवसेनेत येण्याची देण्यात आलेली ऑफर आणि देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात तिथे पंकजा मुंडे नसतात त्यामुळे रंगलेली राजकीय चर्चा यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. पंकजा मुंडे यांनी या प्रश्नावर पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. माझ्या मनात कोणतीही खदखद नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पंकजा मुंडे ठाकरे गटात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार प्रीतम मुंडे गेवराईत एकत्र आले होते. यावेळी मीडियाने पंकजा मुंडे यांना गराडा घातला.

हे सुद्धा वाचा

त्यावेळी त्यांना ठाकरे गटाच्या ऑफरबाबत विचारण्यात आले असता पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उत्तर दिलं आहे. अध्यक्षांच्या उत्तराला मी परत ओव्हरटेक करत नाही. माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं हीच मोठी गोष्ट आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मीही ती चर्चा ऐकली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे दिसत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामागचं कारण काय? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी मिश्किल उत्तर दिलं. मीही ती चर्चा ऐकली आहे. यावर वेगळी पत्रकार परिषद घेईल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी भाजपची सच्ची कार्यकर्ती

माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. त्यामुळे माझ्या मनात खदखद आहे अशा बातम्या लावण्याचं कारण नाही. फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमात मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे मी आले नाही. आज प्रदेशाध्यक्ष आले म्हणून मी आले. जेपी नड्डा आले मी आले.

मी भाजपच्या संस्कारात वाढलेली, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते. पण कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाच्याबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला कंपल्सरी नाही, असं त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे आमच्या नेत्या

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमचे मागच्या 22 वर्षापासून संबंध आहेत. त्यांच्या रक्तारक्तात भाजप आहे. या कपोलकल्पित बातम्या सोडून पंकजा यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्हं उभं करण्याचं काम काही लोक करत आहेत. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत.

त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. आयुष्यात आणि स्वप्नातही भाजपला साईडला करावं किंवा आपण साईडला व्हावं असं त्यांच्या मनात येत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

भाजप त्यांच्या पाठी

ग्रामविकास मंत्री असताना पंकजा यांनी मोठं काम केलं. त्या राष्ट्रीय सचिव म्हणून त्या काम करत आहेत. त्यांच्यावर मध्यप्रदेशची जबाबदारी आहे. त्यांचं नेतृत्व मोठं आहे. आज तरी त्यांच्यावर कोणताही अन्याय मला दिसत नाही.

पण त्यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात मोठं वलंय आहे. त्यामुळे त्यांच्या पाठी आम्ही आहोत. त्यांना केंद्रीय पातळीवरील जबाबदारी आहे. आज आणि उद्याही भाजप त्यांच्या पाठी राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.