राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागाच्या गलथान कारभाराची जोरदार चर्चा, चुकीच्या डिजिटल फलकामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ
अहमदपूरला निघालेली बस थेट दिल्लीला निघाल्याने प्रवाश्यांमध्ये काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
परभणी : परभणीच्या गंगाखेड (Gangakhed) आगारामध्ये एक विचित्र घटना घडलीयं. परभणी अहमदपूर ही अहमदपूर आगाराची बस अहमदपूरकडे जात असताना गंगाखेड आगारामध्ये उभी होती. अहमदपूरकडे जाणारी बस लागलेली दिसल्याने बसमध्ये चढण्यासाठी प्रवाश्यांची एकच घाई सुरू झाली. मात्र, बसच्या डिजिटल फलकावर (Digital board) बस पानिपत मार्गे थेट दिल्लीला जात असल्याचे अनेकांच्या निर्देशनात आल्याने एकच गोंधळ उडाला. काही मिनिटांमध्येच बसमधील (Bus) प्रवासी खाली उतरले आणि गोंधळ सुरू झाला.
गाडी नेमकी जाणार तरी कुठे असा प्रश्न प्रवाशांसमोर उभा
अहमदपूर आगाराची परभणी ते अहमदपूर ही बस गंगाखेड आगारात दाखल झाली. गंगाखेड आगारात बस येताच बसवर लावण्यात आलेल्या डिजिटल फलकावर पानिपत ते दिल्ली या मार्गावर गाडी धावणार असल्याचे दिसून आले. त्यामुळे गाडी नेमकी जाणार तरी कुठे असा प्रश्न बसमधील प्रवाशांना पडला. अनेकांना वाटले की, आपणच चुकीच्या गाडीमध्ये बसलो आहोत.
अहमदपूरला निघालेली बस थेट दिल्लीला जाणार असल्याचे कळताच गोंधळ
अहमदपूरला निघालेली बस थेट दिल्लीला निघाल्याने प्रवाश्यांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आलायं आणि एकच चर्चा रंगू लागलीयं.
डिजिटल फलकाच्या चुकीच्या माहितीमुळे गोंधळ
अहमदपूरला जाणाऱ्या बसच्या डिजिटल फलकावर थेट पानिपत मार्गे बस दिल्लीला जाणार असे आल्याची चर्चा जोरदार होताना दिसते आहे. परभणीवरून अहमदपूरकडे निघालेल्या बसच्या डिजिटल फलकावर नेमके असे का आले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गंगाखेड आगारावरून थेट पानिपत मार्गे दिल्लीला कोणतीच बस जात नसल्याचे देखील पुढे आले आहे.