Raigad: राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर होळीच्या माळावर उतरणार, शिवप्रेंमीनी आक्षेप का घेतलेला? नेमकं कारण काय

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chh. Shivaji Maharaj) समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडवर (Raigad) 6 डिसेंबर रोजी येत आहेत.

Raigad: राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर होळीच्या माळावर उतरणार, शिवप्रेंमीनी आक्षेप का घेतलेला? नेमकं कारण काय
होळीचा माळ
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 8:58 AM

रायगड: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chh. Shivaji Maharaj) समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडवर (Raigad) 6 डिसेंबर रोजी येत आहेत. या भेटीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं हेलिकॉप्टर रायगडावरील होळीच्या माळावर उतरणार आहे. जिल्हा प्रशासनानं होळीच्या माळावर (Holicha Mal) राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णयावर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. अखेर जिल्हा प्रशासनानं शिवप्रेमींसोबत बैठक घेत वादावर पडदा टाकला आहे. आता राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर रायगडावरील होळीच्या माळावरचं उतरणार आहे. खासदार संभाजी छत्रपती ( Sambhaji Chhatrapati) यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं.

होळीच्या माळावर हेलिकॉप्टर उतरवण्यास विरोध का?

रायगडावरील नगारखान्याच्या बाजूला होळीचा माळ आहे. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. 1996 पूर्वीपर्यंत त्याजवळ हेलिपॅड होते. हेलिकॉप्टर उतरण्याच्या वाऱ्यानं धूळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जायची. शिवप्रेमींनी यामुळं आंदोलन करुन होळीच्या माळावरील हेलिपॅड काढायला लावलं होतं. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यावेळी हेलिपॅड होळीच्या माळावर तयार करण्याचं निश्चित झाल्यानंतर शिवप्रेमींनी विरोध केला होता. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानंतर होळीच्या माळावरुन हेलिपॅड काढून टाकावे, अशी मागणी शिवप्रेमींनी केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1671 मध्ये याठिकाणी होळीचा सण साजरा केल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे.

Holicha Mal Raigad 1

रायगड नकाशा

जिल्हा प्रशासनाकडून शिवप्रेमींच्या संतापाची दखल

रायगडावरील होळीच्या माळावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनानं शिवप्रेमींच्या संतापाची दखल घेत त्यांच्याशी तातडीनं चर्चा केली. शिवप्रेमींसोबत झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर होळीच्या माळावर उतरवण्याच निश्चित झालं. तर, राष्ट्रपतींच्या दौऱ्यानंतर हेलिपॅड काढून टाकणार असल्याचं लेखी पत्र प्रशासनानं द्यावं अशी मागणी शिवप्रेमी संघटंनाकडून करण्यात आली आहे.

माणगाव ते पाचाड रस्ता पर्यटकांना बंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडला भेट देण्यासाठी येणार असल्यानं पोलीस दलानं सुरक्षेसाठी कंबर कसलीय. पोलीस दलाकडून सुरुक्षेच्या दृष्टीनं पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. पर्यटकांना रायगडावर येण्यास 3 ते 7 डिसेंबर या काळात प्रवेश बंदी करण्यात आलीय. तर, रायगड पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे. माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेत नातेगाव ते पाचड मार्ग देखील सुरक्षेसाठी पर्यटकांना बंद करण्यात आला आहे.

राष्ट्रपतींची भेट गौरवास्पद

खासदार संभाजी छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे. राष्ट्रपती 6 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणं ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे, असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले आहेत.

इतर बातम्या:

Weather Forecast : कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस, पावसाळी वातावरण कधी संपणार? आयएमडीनं दिली माहिती

सर्वांना सोबत घेत कारभार केला, जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळावं, भाजप आमदाराची शरद पवारांसमोर इच्छा, सूत्रांची माहिती

Raigad District Administration meeting with Shivpremi Organizations and take decision of President Ramnath Kovind Helicopter land at Holicha Mal

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.