‘ज्यांनी जिंकली लोकांची मने…’ आठवलेंच्या कवितेची पुन्हा एकदा चर्चा, भाजप उमेदवाराचा प्रचार करताना सभा जिंकली

सभेत बोलताना मी इथे आलो नाही मिरवण्यासाठी, मी इथे आलोय निवडणूक जिंकण्यासाठी, ज्यांनी जिंकली लोकांची मने, त्यांचे नाव सुभाष साबणे, असे म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली.

'ज्यांनी जिंकली लोकांची मने...' आठवलेंच्या कवितेची पुन्हा एकदा चर्चा, भाजप उमेदवाराचा प्रचार करताना सभा जिंकली
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 4:42 PM

मुंबई : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच इतर पक्ष आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी जिवाचं रान करत आहेत. तर दुसरीकडे भाजप तसेच मित्रपक्षांनीदेखील उमेदवार सुभाष साबणे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. साबणे यांच्या प्रचारासाठी आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले मैदानात उतरले आहेत. त्यांनी आपल्या मजेदार कवितांच्या माध्यमातून साबणे यांच्या प्रचारसभेत धम्माल उडवून दिली. कवितेच्या माध्यमातून त्यांनी जनतेला साबणे यांनाच मतदान करा असे आवाहन केले.

ज्यांनी जिंकली लोकांची मने, त्यांचे नाव सुभाष साबणे

रामदास आठवले यांनी सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ सभेला संबोधित केले. यावेळी त्यांचे कवित्त्व जागे झाले. सभेत बोलताना मी इथे आलो नाही मिरवण्यासाठी, मी इथे आलोय निवडणूक जिंकण्यासाठी, ज्यांनी जिंकली लोकांची मने, त्यांचे नाव सुभाष साबणे, असे म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली.

तुम्ही आम्हाला सोडून गेलात ती गद्दारी नाही का ?

तसेच पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. मी आणि फडवणीस एकत्र आलो की सीट जिंकून येते. शिवसेना सुभाष साबणे यांना गद्दार म्हणते. मग तुम्ही आम्हाला सोडून गेलात ती गद्दारी नाही का ? असा रोखठोक सवाल आठवले यांनी केला. तसेच ज्या शिवसेनेने केलाय घात, त्यांचा तोडून टाकावा लागेल हाथ अशी कवितेची ओळ म्हणून दाखवली. त्यांची ही तुफान फटकेबाजी ऐकून सभेमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

…म्हणून माझे संबंध त्यांच्याशी बिघडले

पुढे बोलताना जायला नको तिथे उद्धवजी गेले म्हणून माझे संबंध त्यांच्याशी बिघडले. संजय राऊत म्हणतात सरकार पाच वर्षे टिकेल तर मग आम्ही काय करायचे. शेतकऱ्यांप्रति सरकारला कळवळा नाही. मराठा आरक्षणा देण्याची संधी असूनही ते देत नाहीत. 50 टक्केच्या पुढे जाता येत नसेल तर सत्ता सोडा; आम्ही बघतो असेदेखील आठवले म्हणाले.

आमच्या हाथात आहे झेंडा निळा

रामदास आठवले यांनी पुढे बोलताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तसेच काँग्रेसवर टीका केली. आम्ही संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही तर काँग्रेसला बदलू. मैने पार्लांमेट में नरेंद्र मोदी को हसाया है और राहुल गांधी को फसाया है. आमच्या हाथात आहे झेंडा निळा आणि काँग्रेसच्या तोंडाला लावणार आहोत काळा. सुभाष साबणे तुम्ही निवडून येणार. ह्या सरकारने लवकर खड्डे बुजवले नाही तर हे ते खड्यात जाणार, अशा मिश्किल कवितेच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांवर टीकेचे आसूड ओढले.

इतर बातम्या :

VIDEO: समीर वानखेडेंसह सहा जणांवर अपहरण, खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करा, ज्येष्ठ वकिलाची पोलिसांकडे तक्रार

Video : महापालिकेनं बनवलेला सायकल ट्रॅक नगरसेवकानं उखडून टाकला! नेमकं कारण काय?

Kiran Gosavi | नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, पोलिसांना चकवणारा किरण गोसावी आहे तरी कोण?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.