जाळं टाकलं अन् नशीब पालटलं, एका माशामुळे मच्छीमार झाला लखपती !
मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या हरणे बंदरावर एका मच्छीमाराला लाखो रुपये किंमत असणारा मासा सापडला. या माशाला लिलावात तब्बल दोन लाखांची बोली लागली आहे. राऊफ हजवा असे लखपती झालेल्या मच्छीमार तसेच बोटमालकाचे नाव आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीमधील एक मच्छीमार फक्त एका माशामुळे लखपती झाला आहे. मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या हरणे बंदरावर मच्छीमाराजवळ असलेल्या माशाला तब्बल दोन लाखांची बोली लागली आहे. राऊफ हजवा असे लखपती झालेल्या मच्छीमार तसेच बोटमालकाचे नाव आहे. (ratnagiri fishermen found rare croaker ghol fish sold for 2 lakh rupees)
जाळ्यात घोळ मासा अडकला अन् राउफ लखपती झाले
मिळालेल्या माहितीनुसार मच्छीमाराच्या जाळ्यात अडकलेल्या माशाचे ना घोळ असे आहे. घोळ मासा हा अत्यंत चविष्ट असतो. तसेच त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. याच कारणामुळे या माशाची किंमत लाखो रुपये असते. घोळ मासा सहजासहजी जाळ्यात सापडत नाही. मात्र, एकदा का हा मासा सापडला की त्याला विकून मच्छीमार लखपती होतो हे मात्र निश्चित असते. असंच काहीसं राउफ हजवा यांच्या बाबतीत झालं. हवजा यांच्या बोटीवर काही मच्छीमार मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात हा घोळ मासा आला.
एका घोळ माशाला तब्बल 2 लाखांची बोली
घोळ मासा जाळ्यात अडकल्याचे समजताच आता आपली लॉटरी लागली हे हवजा यांना समजले. त्यांनी रत्नागिरीच्या हरणे या प्रसिद्ध बंदरावर त्या माशाची विक्री केली. या घोळ माशाला तब्बल 2 लाखांची बोली लागली. एका माशामुळे राउफ हवजा लखपती झाले आहेत.
पालघर जिल्ह्यात मच्छीमार झाले कोट्यधीश
दरम्यान असाच एक प्रसंग काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात घडला. मुरबे येथील हरबा देवी ही मासेमारी बोट वाढवणच्या समोर समुद्रात मासेमारीला गेली असता 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या जाळ्यात 157 घोळ मासे सापडले. त्या माश्याचे मांस आणि त्याच्या पोटातील भोत(ब्लॅडर) यांची विक्री करुन त्या मच्छीमार ग्रुपला सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये मिळाले होते.
157 घोळ मासे सापडल्यानं नशीब फळफळले
मुरबे येथील चंद्रकांत तरे आणि त्याचे सहकारी असलेल्या अन्य आठ सहकाऱ्यांसह 28 ऑगस्ट रोजी आपली बोट मासेमारीसाठी घेऊन रवाना झाले. डहाणू-वाढवण च्या समोर समुद्रात साधारणपणे 20 ते 25 नॉटिकल समुद्रात हरबा देवी बोटीतून समुद्रात जाळी टाकण्यात आली.वागरा पद्धतीची जाळी समुद्रात सोडल्यावर काही तासाच्या प्रतिक्षे नंतर बोटीतील मच्छीमारांनी समुद्रात सोडलेली आपली जाळी बोटीत घेण्यास सुरुवात केली.त्या जाळ्या मध्ये एकूण 157 घोळ आणि दाढे मासे सापडल्याने त्याचे नशीब फळफळले.
इतर बातम्या :
तुम्हाला ताप आहे का? तुमचा ताप डेंग्यू किंवा इतर व्हायरल आहे हे कसे ओळखावे?, वाचा!
Ganesh Chaturthi 2021 : पुणेकरांनी ऑनलाईन माध्यमातून गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, गणपती मंडळांचं आवाहन
Ganesh Chaturthi 2021 : पूजा विधी, व्रत विधी, मंत्र आणि बरेच काही जाणून घ्या या विशेष सणाबद्दलhttps://t.co/U3iHzk2l0k#GaneshChaturthi2021 |#Celebration |#Pooja |#Ritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2021
(ratnagiri fishermen found rare croaker ghol fish sold for 2 lakh rupees)