VIDEO : परभणीत सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीकडून रोड रोमिओला चोप, सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

मुलीची हिम्मत पाहून सर्व स्तरावर तिचा कौतुक होत आहे. दरम्यान, सेलू शहरातील भर रस्त्यातवर अचानक घडलेल्या घटनेने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्या घटनेचा व्हीडिओ जिल्ह्यात व्हायरल होत आहे. नेमके दोन्ही विद्यार्थी कुठल्या वर्गात शिकत होते आणि कुठल्या कॉलेजला होते याबाबत माहिती मिळू शकली नाही.

VIDEO : परभणीत सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीकडून रोड रोमिओला चोप, सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल
परभणीत सततच्या छेडछाडीला कंटाळलेल्या मुलीकडून रोड रोमिओला चोप
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 8:39 PM

परभणी / नजीर खान : सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन युवतीने मुलाला भररस्त्यात चोप दिल्याची घटना परभणी जिल्ह्यातील सेलू (Selu) येथे घडली. सेलू तालुक्यातील तळतुंबा या गावात राहणाऱ्या मुलीची तिच्याच कॉलेजला शिकत असलेल्या रवळगाव येथे राहणारा मुलगा दररोज छेड काढत त्रास देत होता. सुरुवातीला युवतीने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओ (Road Romio)ची त्यामुळे हिम्मत वाढत असल्याचे पाहून शेवटी त्या बहाद्दर मुलीने रोड रोमिओला चांगलीच अद्दल घडवली आहे. छेड काढणाऱ्या त्या रोमिओला भररस्त्यात गाठून तिने बेल्टने चांगलाच प्रसाद दिला. सेलू पोलिसात मात्र अशा कुठल्याच घटनेची नोंद झालेली नाही . त्यामुळे प्रकरण समोपचाराने मिटल्याची चर्चा सर्वत्र होतेय. (Road Romeo beaten by a girl who is fed up with constant harassment in Parbhani)

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुलीची हिम्मत पाहून सर्व स्तरावर तिचा कौतुक होत आहे. दरम्यान, सेलू शहरातील भर रस्त्यातवर अचानक घडलेल्या घटनेने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्या घटनेचा व्हीडिओ जिल्ह्यात व्हायरल होत आहे. नेमके दोन्ही विद्यार्थी कुठल्या वर्गात शिकत होते आणि कुठल्या कॉलेजला होते याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र मुलीने दाखवलेल्या हिम्मतीने कॉलेजला जाणाऱ्या अनेक मुलींची हिंमत वाढली असेल हे नक्की. दरम्यान नागरिकांच्या प्रयत्नानंतर प्रकरण शांत झाले आणि दुर्गेचा रूप धारण केलेल्या त्या बहाद्दर मुलीच्या तावडीतून मुलाची सुटका झाली आणि घटनेवर पडदा पडला. आजच्या घटनेनंतर किमान सेलू तालुक्यातील रॉड रोमिओ शाळकरी मुलींना छेडताना दहा वेळा विचार करतील हे मात्र नक्की.

धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड करणारे गुंड पोलिसांच्या ताब्यात

हातात धारदार शस्त्र नाचवत गाड्यांची तोडफोड करुन नागरिकांना दमबाजी करणाऱ्या पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हातात कोयते-तलवारी नाचवत गुंडांच्या एका टोळक्याने भर रस्त्यात गाड्यांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. या टोळक्याने जवळपास 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केली. तसेच नागरिकांना दमबाजीही केली. पोलिसांनी या प्रकरणी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती आहे. (Road Romeo beaten by a girl who is fed up with constant harassment in Parbhani)

इतर बातम्या

Thane Crime : क्लासला जाते म्हणून निघाली अन् थेट बंगालला गेली, मोबाईल गेमच्या नादात अल्पवयीन मुलीनं सोडलं घर

Pimpri Chinchwad crime | इंस्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन’च्या 40 पेक्षा जास्त अकाऊंटबाबत पिंपरी पोलिस उचलणार ‘हे’ पाऊल

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.