Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीत पिवळ्या बेडकांची शाळा, नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय

सांगलीच्या बालाजी नगरमध्ये पहिल्या पावसाच्या पाण्यात साठलेल्या डबक्यात बेडकांची शाळा भरली आहे. (Sangli Heavy rain yellow frog)

सांगलीत पिवळ्या बेडकांची शाळा, नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय
sangli yellow frog
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 12:01 PM

सांगली : गेल्या आठवडाभरापासून सांगलीत पावसाचा जोर कायम आहे. यामुळे सांगलीच्या पावसात पिवळी बेडूक पाहायला मिळत आहे. सांगलीच्या बालाजी नगरमध्ये पहिल्या पावसाच्या पाण्यात साठलेल्या डबक्यात बेडकांची शाळा भरली आहे. (Sangli Heavy rain yellow frog in various Puddle of water)

सांगली जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. तर या पावसात पिवळी बेडक अवतरली आहेत. सांगलीच्या बालाजी नगरमध्ये पहिल्या पावसाच्या पाण्यात साठलेल्या डबक्यात बेडकांची शाळा भरली आहे. त्यातच हे बेडूक पिवळ्या रंगाचे आहेत. यामुळे हा कुतूहलाचा विषय बनला आहे.

सांगली शहरातील बेडकांचे अस्तित्व कमी झाले आहे. मात्र ग्रामीण भागात आजही पावसाळ्यात बेडकांचे आवाज ऐकायला मिळतात. पावसाच्या रिपरिप बरोबर वर्षभर गप्प असलेल्या बेडकांना पावसाळ्याच्या सुरुवातीला कंठ फुटला आहे.

सांगलीत मुसळधार पाऊस

पावसाचे पाणी साठलेल्या डबक्यात पिवळ्या रंगाचे बेडूक पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन दिवसापासून सांगलीत मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे  बेडकांच्या शाळेची रंगत वाढली आहे. डरांव ऽ डरांव ऽऽ आवाज करत ते आपल्या सहकाऱ्यांना साद घालत आहेत. या पिवळ्या रंगाच्या बेडकांना बुलफ्राग बेडूक असे म्हणतात. सोना बेडूक नावाची सर्वात मोठी प्रजाती आहे. यातील नर बेडूक हा प्रजनन काळात पिवळा रंग घेतो. सर्वत्र आढळणारी ही मोठी प्रजाती आहे.

बुलडाण्यात गडद पिवळ्या रंगाचे बेडूक 

दरम्यान काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसादरम्यान पिवळ्या बेडूकांचा पाऊस पडल्याची अफवा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात वाऱ्यासारखी पसरली. परिसरातील तलाव आणि पाणवठ्यांवर गडद पिवळ्या रंगाचे बेडूक अचानक आढळून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही भयभीत झाले आहेत. सदर बेडूक विषारी असल्याची अफवा असून अशा प्रकारचे बेडूक आढळल्यास अपशकून घडत असल्याची अंधश्रध्दा परिसरात आहे. त्यामुळे या बेडकांबाबत विविध शंका आणि कुशंका व्यक्त होत आहेत. पाऊस पडल्यानंतर समाधी अवस्थेतून बाहेर पडणारे हे बेडूक अजिबात विषारी नाहीत आणि पावसातून बेडूक पडत नाहीत , अशी माहिती पर्यावरण तज्ज्ञांनी दिली.

पिवळ्या बेडकांविषयी अंधश्रद्धा

कोरोना संकटाचे सावट गडद असतानाच खामगाव आणि परिसरात गडद पिवळ्या रंगाचे बेडूक आढळून आले आहेत.हे बेडूक विषारी आहेत.त्याचप्रमाणे अशाप्रकारचे बेडूक आढळून आल्यास अघटीत घडते, अशी अंधश्रध्दा ग्रामीण भागात आहे. त्यामुळे गडद पिवळ्या रंगाचे बेडूक आढळून आलेल्या परिसरात अपशकून घडते, अशी चर्चा ग्रामीण भागात होत आहे. (Sangli Heavy rain yellow frog in various Puddle of water)

संबंधित बातम्या : 

पावसातून पिवळे बेडकू पडल्याची अफवा, बुलडाण्याच्या खामगावात नागरिकांमध्ये भीती, पर्यावरणतज्ज्ञ म्हणतात…

प्राण्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर पायात रॉड बसवले, वर्ध्यात नेमके कसे उपचार केले?

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.