रोहित पाटील यांची प्रकृती बिघडली, उपोषणस्थळी डॉक्टरांचं पथक दाखल

शरद पवार यांच्या गटाचे डॅशिंग युवा नेते रोहित पाटील यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आलीय. रोहित पाटील यांचं पाणी प्रश्नावरुन आज सकाळपासून उपोषण सुरु आहे. या दरम्यान त्यांची आज दुपारी तब्येत बिघडली आहे.

रोहित पाटील यांची प्रकृती बिघडली, उपोषणस्थळी डॉक्टरांचं पथक दाखल
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 5:18 PM

शंकर देवकुळे, Tv9 मराठी, सांगली | 2 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे युवानेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. रोहित पाटील यांचं सकाळपासून उपोषण सुरु आहे. उपोषणस्थळी रोहित पाटील यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना ताप आल्याने डॉक्टर उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. टेंभू योजनेत तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करा, या मागणीसाठी रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांचं सकाळपासून उपोषण सुरु आहे.

डॉक्टरांच्या पथकाकडून रोहित पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येतेय. रोहित पाटील यांना 102 डिग्री इतका ताप आहे. रोहित पाटील यांच्या अंगात ताप आल्याने ते उपोषणस्थळी सध्या झोपले आहेत. रोहित पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांची बहीण स्मिता पाटील या सुद्धा घटनास्थळी बसून आहेत. पाणी प्रश्नासाठी रोहित पाटील, आमदार सुमनताई पाटील यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आंदोलनस्थळी जावून आमदार सुमनताई पाटील यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय.

उपोषणाआधीच एक मागणी मान्य

आमदार सुमनताई पाटील यांनी उपोषणाला सुरुवात करण्याआधीच सरकारने त्यांची एक महत्त्वाची मागणी मान्य केलीय. टेंभू विस्तारित योजनेसाठी 8 टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यायला महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी देण्यात आलीय. सुमनताई पाटील यांच्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी उपोषण सुरू होण्याआधीच मान्य झाली. मात्र टेंभू योजनेच्या अहवालाला तृतीय सुधारित मान्यता मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, अशी सुमनताई यांची भूमिका आहे.

भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांचा आंदोलनाला पाठिंबा

सांगलीमध्ये आर. आर. आबा गट विरुद्ध खासदार संजय काका पाटील यांच्यात पाण्यावरून संघर्ष पेटला आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांच्या उपोषणावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र भाजपाचे नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सुमनताई आणि रोहित पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

उपोषण स्थळी पृथ्वीराज देशमुख यांनी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला आहे. एका बाजूला भाजपचे खासदार उपोषणाला विरोध करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्याच खासदारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जाहीर पाठिंबा देत असल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.