Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मग घाला फडणवीस यांच्या गळ्यात मंगळसूत्र; संजय राऊत यांनी भाजपच्या कोणत्या मंत्र्याला सुनावले?

कोरोना काळात लोकांचे प्राण जात असताना गुलाबो गँग भ्रष्टाचार करत होती. हा गंभीर प्रकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करणार की नाही? किरीट सोमय्या यांना मी हे पुरावे देणार आहे; असं संजय राऊत म्हणाले.

मग घाला फडणवीस यांच्या गळ्यात मंगळसूत्र; संजय राऊत यांनी भाजपच्या कोणत्या मंत्र्याला सुनावले?
sanjay raut Image Credit source: ani
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 4:15 PM

जळगाव : आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत, असं मोठं विधान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. अजितदादांनी शरद पवार यांनाही कन्फ्यूज केलं. अजितदादांच्या मनात काय कुणालाही कळणार नाही, असंही विखे-पाटील म्हणाले होते. विखे पाटील यांच्या या विधानाचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. तुमच्या मनात जर कोणी वेगळं आहे तर दुसऱ्याबरोबर संसार कसा करता? असा संसार करणं हा व्याभिचार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मंगळसूत्र घाला, अशा शब्दात संजय राऊत यांनी विखे पाटील यांना सुनावले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पाचोऱ्यात सभा आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत जळगावात आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत, असं विखे पाटील म्हणाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बसवा त्यांना. थांबवलंय कोणी? जर तुमच्या मनात कोणी वेगळं असेल आणि तुम्ही दुसऱ्याबरोबर नांदत असाल तर हा व्याभिचार आहे. हा व्याभिचार आहे खरं म्हणजे. लग्न एकाबरोबर… वरलंय एकाला अन् संसार दुसऱ्याबरोबर करताय. यासारखा व्याभिचार नाही. मग राधाकृष्ण विखे पाटलांनी मंगळसूत्र बांधावं त्यांच्या गळ्यात ना…आम्ही कुठे आडवलंय. आम्हालाही चालतील, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आधी तुम्ही राजीनामा द्या

संजय राऊत आमच्या जीवावर निवडून आले आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते. पाटील यांच्या या विधानाचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. आधी गुलाबराव पाटील यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण त्यांना आम्ही निवडून दिलंय. शिवसेना म्हणून ते निवडून आले आहेत. आधी तुम्ही राजीनामा द्या, मग आम्ही बघू, असं राऊत म्हणाले.

जळगावमध्ये गुलाबो गँग

जळगावमध्ये गुलाबो गँग आहे. ही सुवर्ण नगरी आहे. काही दिवस गुलाबराव आमच्यासोबत सोन म्हणून वावरत होते. आता कोळसा निघाले. आजच्या सभेत त्यांचा भांडाफोड करू. माझ्या हातातील कागदपत्रे पालक मंत्र्याचा भांडाफोड करणारे आहेत. कोरोना काळात अनेक साहित्य चढ्या भावाने घेतले. दोन लाखाचं साहित्य 15 लाखाला घेतलं. त्यांच्याच एका गँगच्या आमदाराने त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे सर्व प्रकरण मी बाहेर काढणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.