Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं म्हणजे सुहाने… काय डोंगार, काय झाडी फेम शहाजी बापू पाटील यांनी सुनावलेच

काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवण्याचे काम केले आहे. उद्धव साहेब आणि संजय राऊत यांचे भविष्य काय असणार हे सांगण्या इतपत मी मोठा नाही.

राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं म्हणजे सुहाने... काय डोंगार, काय झाडी फेम शहाजी बापू पाटील यांनी सुनावलेच
shahaji bapu patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 12:03 PM

पंढरपूर : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख करणारी पोस्टर मुंबईत काही ठिकाणी लागली. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही भावी मुख्यमंत्री उल्लेख करणारी पोस्टर लागली होती. सुप्रिया सुळे यांच्या पोस्टरनंतर राष्ट्रवादीचे दोनचार जण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर शिवसेना नेते आणि आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत टीका केली आहे. राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने म्हणजे सुहाने सपने आहेत, असा टोला शहाजी बापू पाटील यांनी लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

राष्ट्रवादीमध्ये 4-5 भावी मुख्यमंत्री आहेत. अजून काही जणांची सुप्त इच्छा आहे. हे सर्व सुहाने स्वप्नं आहेत. राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघू नये, असा चिमटा शहाजी बापू पाटील यांनी लगावला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकाही केली.

हे सुद्धा वाचा

राऊत बेभान झाले

आम्ही आमदार गुवाहाटीत असताना उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी कायदेशीर लढाई जिंकलो. त्यामुळे सध्याच्या न्यायालयीन लढ्यातही आम्हाला यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच संजय राऊत यांचे नामकरण करून संजय आगलावे असे केले पाहिजे. संजय राऊत यांचा समतोल बिघडला असून बेभान होऊन ते सर्वांवर आरोप करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

राऊत मातोश्रीशी एकनिष्ठ नव्हते

राऊत हे कधीच मातोश्रीशी एकनिष्ठ नव्हते. मातोश्रीचे राजकारण उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलं. श्रीकांत शिंदे यांच्यावर राऊत यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. बेभान झालेले राऊत कसेही वागत आहेत. राऊत यांचे सगळे संपलेलेल आहे. म्हणून जाताजाता ते सगळ्यांना बदनाम करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

ठाकरेंची सुपारी घेतली

काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवण्याचे काम केले आहे. उद्धव साहेब आणि संजय राऊत यांचे भविष्य काय असणार हे सांगण्या इतपत मी मोठा नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभी केलेली बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना मोठी होणार आहे. बाळासाहेबांचे स्वप्न आणि विचार आम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत, असं ते म्हणाले. राऊत हे तोल गेलेला माणूस आहे. उद्धव साहेबांची सहानुभूती संपवण्याचे काम करत आहेत. ठाकरेंची सुपारी त्यांनी घेतली आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप.
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात.
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.