Sindhudurg : भाजपाचा शिवसेनेला धक्का, राणे पती-पत्नी भाजपात दाखल
प्रज्ञा राणे (Pradnya Rane) आणि त्यांचे पती कुडाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रशांत राणे (Prashant Rane) यांनी शिवसेने(Shiv Sena)ला जय महाराष्ट्र करत भाजपा(BJP)मध्ये प्रवेश केला आहे. ते गेली अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत होते. मात्र आता त्यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामधे प्रवेश केला आहे.
सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायती(Kudal nagarpanchayat)च्या माजी नगरसेविका प्रज्ञा राणे (Pradnya Rane) आणि त्यांचे पती कुडाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रशांत राणे (Prashant Rane) यांनी शिवसेने(Shiv Sena)ला जय महाराष्ट्र करत भाजपा(BJP)मध्ये प्रवेश केला आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.
शिवसेनेला झटका प्रज्ञा राणे आणि प्रशांत राणे हे गेली अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत होते. मात्र आता त्यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामधे प्रवेश केला आहे. प्रज्ञा राणे यांनी कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. 14 व प्रशांत राणे यांनी वार्ड क्र. 15मधून भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा शिवसेनेला एक प्रकारे मोठा झटका मानला जात आहे.
आधीचे पक्षप्रवेश
कुडाळ मालवण या मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो पदाधिकारी-कार्यकत्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. भाजपा खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. राज्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र खिंडार पडल्याचं चित्र आहे.
कोणाकोणाचा भाजपा प्रवेश?
राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन तेंडुलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवक, पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.