राणे सत्तेच्या जोरावर तत्त्वज्ञान पाजळत होते, कालच्या प्रकाराने गुर्मी उतरवली; वैभव नाईकांचा घणाघात

नारायण राणे गेले कित्येक वर्षापासून पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर लोकांना तत्त्वज्ञान पाजळत होते. कायद्यापासून लांब पळत होते. (vaibhav naik)

राणे सत्तेच्या जोरावर तत्त्वज्ञान पाजळत होते, कालच्या प्रकाराने गुर्मी उतरवली; वैभव नाईकांचा घणाघात
आगामी विधानसभा निवडणुकीत मालवणमध्ये कोणाची बाजी? वैभव नाईक गड राखणार की राणेंची सरशी !
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 4:15 PM

सिंधुदुर्ग: नारायण राणे गेले कित्येक वर्षापासून पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर लोकांना तत्त्वज्ञान पाजळत होते. कायद्यापासून लांब पळत होते. कालच्या प्रकाराने राणेंची गुर्मी उतरवली, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते आमदार वैभव नाईक यांनी केली. (Shivsena leader Vaibhav Naik slams union minister Narayan Rane)

वैभव नाईक यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. नारायण राणे हे गेले कित्येक वर्ष आपल्या पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर लोकांना तत्त्वज्ञान पाजळत होते. कायद्यापासून पळत होते. मात्र हे सरकार कायद्याने चालणारे सरकार आहे. कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही हे या सरकारने राणेंना दाखवून दिलंय. त्यामुळे कालच्या प्रकरणात राणेंची गुर्मी उतरवली गेली, असा हल्ला नाईक यांनी चढवला.

परब यांची भूमिका योग्यच

यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबद्दलही प्रतिक्रिया व्यक्त केली. परब यांची भूमिका कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे. राणे आपण केंद्रीय मंत्री आहोत याचा बडेजाव दाखवत होते. परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे पोलीस कारवाई करताना त्यांच्या पाठीशी राहणं म्हणजे दबाव नाही. खरं तर ही कारवाई नाशिक पोलीसांनी केलीय. पालकमंत्री म्हणून पोलिसांच्या पाठीशी राहण त्यांच काम आहे, असं नाईक यांनी स्पष्ट केलं.

चंद्रकांत पाटलांवर टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवरही त्यांनी भाष्य केलं. गेल्या पाच वर्षापासून चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांची सगळ्यांना कोर्टात खेचू,  ईडी लावू हीच भूमिका राहिली आहे. त्यामुळे लोकांनीच यांना सत्तेतून बाहेर फेकलं. आता पुढच्या काळात भाजपला सत्तेच्याच बाहेर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर फेकण्याची लोकांची भूमिका आहे हे चंद्रकांत पाटीलांनी ध्यानात घ्यावं, असा इशाराही त्यांनी दिला.

आशीर्वाद मिळत नसेल म्हणून यात्रा बंद

सिंधुदुर्गातील जमावबंदीवरही त्यांनी भाष्य केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदीचा आदेश का लागू केला हा त्यांचा विषय आहे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असू दे किंवा कोव्हिडचा काळ असू दे, त्याबाबतची भूमिका जिल्हाधिकारी ठरवतात. मात्र राणेंच्या यात्रेला कोणी अडवलं नाही. त्यांनी यात्रा का बंद ठेवली हा त्यांचा प्रश्न आहे. लोकांचा आशिर्वाद या यात्रेला आता मिळत नसेल म्हणून यात्रा बंद ठेवली असेल, असा टोला नाईक यांनी लगावला. (Shivsena leader Vaibhav Naik slams union minister Narayan Rane)

संबंधित बातम्या:

शरद पवारांना कानशिलात मारली, तरीही त्यांनी संयम पाळला, राणेंना डिफेंड करण्यासाठी शेलारांकडून दाखला

मुख्यमंत्र्यांचं अज्ञान, अनिल परबांचा दबाव, राणेंच्या अटकेमागची CBI चौकशी करा, Video दाखवून भाजपची मागणी

कुणाची कोथळा काढण्याची भाषा तर कुणाची एन्काऊंटरची; राणेंना शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या धमक्या

(Shivsena leader Vaibhav Naik slams union minister Narayan Rane)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.