Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार महिने, सहा जीवघेणे स्फोट, रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसीत नेमकं चाललंय तरी काय?

खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीत स्फोटांची मालिका सरुच आहे (six blast in last four months in Ratnagiri Lote MIDC)

चार महिने, सहा जीवघेणे स्फोट, रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसीत नेमकं चाललंय तरी काय?
चार महिने, सहा जीवघेणे स्फोट
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 3:55 PM

रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीत स्फोटांची मालिका सरुच आहे. त्यात एम.आर.फार्मा कंपनीत नुकताच स्फोट झालाय. वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे लोटे एमआयडीसीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय. गेल्या सहा महिन्यातील इथल्या केमिकल कंपनीमधील हा सहावा स्फोट आहे. यापूर्वी कंपन्यांमध्ये स्फोट होऊन कामगारांचा मृत्यू देखील झालाय. त्यामुळे या स्फोटांची मालिका कधी थांबणार? असा सवाल आता उपस्थित केला जातोय (six blast in last four months in Ratnagiri Lote MIDC).

एमआयडीसी ठरलीय स्फोटांचं केंद्र

मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील लोट परिसरात ही एमआयडीसी आहे. केमिकल कंपन्या या परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. औद्योगिक विकासासाठी 1980 मध्ये ही एमआयडीसी वसवण्यात आली. मात्र आता ही एमआयडीसी स्फोटांचं केंद्रबिंदू ठरु लागलीय. याच एमआयडीसीतील एम.आर.फार्मा कंपनीत स्फोट झाला. धुराचं प्रचंड लोळ आकाशात उसळले. या आगीत सुदैवानं जीवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालीय.

अनेक कंपन्यांना बंद करण्याची नोटीस, कारवाई मात्र नाहीच

वारंवार होणाऱ्या या स्फोटांमुळे एमआयडीसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. इथल्या सर्व कंपन्या जुन्या झाल्या. त्यामुळे त्यांचं ऑडीट होणं गरजेचं आहे. वारंवार होणाऱ्या स्फोटामुळे इथे एक प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एमआयडीसीतील प्रदुषणामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागतोय. याठिकाणी लोकप्रतिनिधी येतात आणि आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात कोणतीच अंमलबजावणी होताना दिसत नाही. यात काही कंपन्या अशा आहेत की प्रशासनानं बंद करण्याचा नोटीस दिल्या आहेत. मात्र त्या अद्याप सुरुच आहेत. एमआयडीसी जवळच प्रदुषण नियमक मंडळाचं कार्यालय आहे. मात्र कारवाई होताना दिसत नाही.

चार महिन्यात सहा स्फोटांच्या मोठ्या दुर्घटना

13 जानेवारी 2021 – दुर्गा फाईल्स कंपनीत आग लागली 16 जानेवारी 2021 – डेरा पेन्ट्स कंपनीत आग 15 मार्च – सुप्रिया केमिकमध्ये स्फोट 20 मार्च 2021 – घरडा केमिकल कंपनीत स्फोट 5 कामागारांचा मृत्यू 18 एप्रिल 2021 – समर्थं केमिकल कंपनीत स्फोट 4 मृत्यू 28 एप्रिल – एम आर फार्मा कंपनीत स्फोट

केमिकल कंपन्यांमुळे हवेसोबत पाणीही दुषित

लोटे एमआयडीसत वारंवार होणाऱ्या स्फोटामुळे इथल्या कामगारांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण झालाय. इथल्या केमिकल कंपन्यांमुळे इथली हवा प्रदुषित तर झाली आहेच, पण पाणी देखील इथलं दुषित झालंय. आता या एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांमध्ये वारंवार स्फोट होऊन आग लागतेय. यापूर्वी स्फोटामुळे लागलेल्या आगीत कामगारांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

स्फोटांची श्रृंखला थांबणार कधी? इथल्या कंपन्यांच ऑडीट झालंय का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. वारंवरा होणाऱ्या स्फोटांमुळे ही एमआयडीसी खरोखर सुरक्षित आहे का? प्रशासन याकडे गाभिर्यानं का लक्ष देत नाही? की आणखी मोठी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहतेय? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत (six blast in last four months in Ratnagiri Lote MIDC).

आमदार योगश कदम यांचा इशारा

लोटे एमआयडीसीत घडत असलेल्या स्फोटांच्या मालिकेनंतर आमदार योगश कदम यांनी या सगळ्या प्रकरणांची गंभीर दखल घेतली आहे. “या कपन्यांवर तात्काळ कारवाई करावी, नियमांची पायमल्ली करत असलेल्या कंपन्या बंद कराव्यात अशी आपली स्पष्ट भूमिका आहे. या सगळ्याबाबत आपण उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याजवळ स्वतः बोलणार आहोत. करवाईची मागणी करणार आहे. अधिवेशनातही सरकारचे लक्ष वेधणार आहोत. कामगारांचे बळी घेणाऱ्या अशा कपन्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवावे लागेल”, असा इशारा आमदार कदम यांनी दिला आहे.

हेही वाचा : लोटे एमआयडीसीत भीषण स्फोट, चार कामगारांचा मृत्यू

सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.